समाजशास्त्र म्हणजे काय? What is Sociology In Marathi | Sociology Information In Marathi | Sociology Meaning In Marathi

समाजशास्त्र म्हणजे काय? What is Sociology In MarathiSociology Meaning In Marathi : नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला समाजशास्त्रा बद्द्ल संपूर्ण माहिती सांगणार आहे म्हणून पोस्ट पूर्ण वाचा आणि आवडल्यावर तुमच्या मित्रांना शेयर करायला विसरु नका धन्यवाद..

समाजशास्त्र म्हणजे काय? What is Sociology In Marathi
What is Sociology In Marathi

Sociology Meaning In Marathi

Sociology चा मराठीत अर्थ “समाजशास्त्र” असा होतो.

समाजशास्त्र म्हणजे काय? What is Sociology In Marathi | Sociology Information In Marathi

समाजशास्त्र म्हणजे : माणसाचा समाजा सोबत जो संबंध असतो त्या संबंधाचा अभ्यास करणे म्हणजेच समाजशास्त्र होय.

समाजशास्त्राची प्रमुख वैशिष्ट्ये :

समाजशास्त्राच्या उदयकाळापासून आजपर्यंत या शास्त्राचा झालेला विकास लक्षात लक्षात घेतला तर समाजशास्त्राच्या स्वरूपासंबंधीची काही प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे स्पष्ट करता येतील.

१) सामाजिक शास्त्र : नैसर्गिक किंवा भौतिक शास्त्रांच्या अभ्यासविषयांपेक्षा समाजशास्त्राचा अभ्यासविषय भिन्न आहे. समाजशास्त्र समाजसदस्यांच्या सामाजिक संबंधांचे अध्ययन केले जाते. म्हणून समाजशास्त्राचे स्वरूप हे सामाजिक शास्त्राचे आहे असे म्हणता येईल.

२) अनुभवप्रामाण्यवादी शास्त्र : समाजशास्त्र सामाजिक संबंध, सामाजिक घटना, इत्यादींचे तात्विक स्वरूपाचे किंवा कल्पनाशक्तीवर आधारित असलेले विवेचन केले जात नाही. समाजसदस्यांच्या सामाजिक संबंधांचा अभ्यास करतांना आदर्श स्वरूपाचे सामाजिक संबंध कोणते? सामाजिक संबंधांचे स्वरूप कसे असावे? यांसारखे प्रश्नांचे विवेचन करण्यामध्ये समाजशास्त्राच्या अभ्यासकाला रस नसतो. कारण अश्या प्रकारच्या प्रश्नांची चर्चा कल्पनाशक्तीच्या आधारावर तसेच नैतिक दृष्टिकोनातून करता येते. समाजशास्त्राचे अभ्यासक सामाजिक संबंध सामाजिक घटना, इत्यादींचे अध्ययन करतांना पुरावा देता येईल अशा स्वरूपाची अनुभवप्रामाणित तत्थे (माहिती) संकलित करतात. निरीक्षण, मुलाखती, प्रश्नावली, इत्यादी साधनांद्वारे अभ्यासविषयांबाबतची माहिती एकत्रित करतात. या माहितीची सत्यता वारंवार तपासून पाहतात. त्या आधारावर समाजशास्त्रीय तत्वे व सिद्धांत मांडतात. म्हणून समाजशास्त्र हे अनुभवप्रामाण्यवादी शास्त्र आहे.

३) वर्णनात्मक शास्त्र : सामाजिक संबंध, सामाजिक संथा, सामाजिक परिवर्तन, इत्यादी अभ्यासविषयाशी संबंधित बाबींचे विश्लेषणात्मक वर्णन समाजशास्त्रात केले जाते. जातिसंस्थेचे अध्ययन करतांना समाजशास्त्राच्या अभ्यासकांचा उद्देश जातिव्यवस्थेचे समर्थन करणे किंवा जातिव्यवस्थेला विरोध करणे हा नसतो. तो जातिव्यवस्थेच्या उदयाचे व विकासाचे ऐतिहासिक दृष्टीने वर्णन करण्यावर भर देत नाही. जातिव्यवस्थेबाबत वास्तवता काय आहे, जातीव्यवस्था का टिकून आहे, समाजसदस्यांच्या वर्तनावर व परस्परसंबंधांवर जातिव्यवस्थेचा कोणता प्रभाव पडतो, समाजदृष्ट्या जातिव्यवस्थेची प्रकार्ये कोणती? यांसारख्या प्रश्नांचे स्पष्टीकरणात्मक वर्णन करण्यावर समाजशास्त्राच्या अभ्यासकांचा प्रमुख भर असतो. याच दृष्टीने समाजशास्त्र हे वर्तनात्मक शास्त्र आहे असे म्हणले जाते. जातिव्यवस्थेचे आदर्श स्वरूप कोणते? या प्रश्नाचे विवेचन समाजशास्त्रात केले जात नाही. म्हणून समाजशास्त्राचे स्वरूप आदर्शात्मक शास्त्रासारखे नाही असे म्हणता येईल.

४) शुद्ध सैद्धांतिक शास्त्र : समाजशास्त्रात भ्रष्टाचार, काळापैसा, भिक्षावृत्ती, दहशतवाद, वैश्यावृत्ती यांसारखे अनेकविध सामाजिक समस्यांचा अभ्यास केला जातो. परंतु सामाजिक समस्यांचे निर्मूलन करणे हे समाजशास्त्राच्या अभ्यासकांचे कार्य नाही. समाजशास्त्रात सामाजिक समस्यांचे वैज्ञानिक पद्धतीने अध्ययन करण्यावर भर दिला जातो. सामाजिक समस्या निर्माण होण्याची मूळ करणे कोणती, तिची तीव्रता कमी करण्यासाठी कोणती उपाययोजना केली पाहिजे? यांसारख्या प्रश्नांचे विवेचन करण्यावर विशेष भर दिला जातो. सामाजिक समस्यांचे निर्मूलन करतांना समाजशास्त्राच्या अभ्यासकाने सुचविलेल्या उपाययोजना उपयुक्तदेखील ठरतात. असे असले तरीही सामाजिक समस्यांचे निर्मूलन करणे हे समाजशास्त्राच्या अभ्यासकांचे कार्य नाही. ते समाजसुधारकांचे व शासनाचे कार्य आहे हे लक्षात घेतले पाहिजे कारण सामाजिक समस्यांचे अध्ययन करतांना समाजाची संरचना समाजीं घेणे हा समाजशास्त्राच्या अभ्यासकांचा प्रमुख हेतू असतो. थोडक्यात, सामाजिक समस्यांच्या अध्ययनात प्रामुख्याने सैद्धांतिक स्वरूपाची चर्चा केली जाते म्हणून समाजशास्त्र हे शुद्ध सैद्धांतिक शास्त्र आहे असे म्हणता येते.

५) व्यावहारिक अथवा उपयोजित शास्त्र : समाजशास्त्रातील समाजसंबंधीच्या संघटित ज्ञानाचा उपयोग दैनंदिन समाजजीवनात होतो. उदाहरणार्थ, गुन्हेगारी, बालगुन्हेगारी, कुटुंबविघटन, यांसारख्या अनेक सामाजिक समस्यांची तीव्रता कमी करण्यासाठी उपाययोजना करताना समाजशात्रातील संघटित ज्ञानाचा उपयोग होतो. पती पत्न्नी किंवा पिता पुत्र यांच्या परस्परसंबंधातील ताण तणाव दूर करून ते कुटुंब एकसंघ ठेवण्यासाठी समाजशास्त्राचा अभ्यासक कुटुंब सल्लागार म्हणून काम करू शकतो. अशा प्रकारे समाजशास्त्रातील संघटित ज्ञानाचा उपयोग दैनंदिन समाजजीवनातील विविध प्रकारच्या अडचणी दूर करण्यासाठी होतो म्हणून समाजशास्त्र हे व्यावहारिक अथवा उपयोजित शास्त्र आहे, असे म्हणता येते.

६) संचयी स्वरूपाचे शास्त्र : समाजशास्त्राच्या उद्यकाळापासून आजपर्यंत सामाजिक संबंध, सामाजिक संथ, सामाजिक परिवर्तन, इत्यादी अभ्यासविषयाशी संबंधित घटकांबाबतच्या संघटित स्वरूपाच्या ज्ञानसंचयात वाढ होत आहे. समाजशास्त्राचे अभ्यासक आपल्या शास्त्रातील सिद्धांत, तत्वे, संकल्पना आदींचे पुन्हापुन्हा परीक्षण करतात. यामुळे समाजशास्त्रात अभ्यासविषयाबाबतच्या संघटित ज्ञानामध्ये नवीन ज्ञानाची भर सतत पडत असते. म्हणून समाजशास्त्र हे संचयी स्वरूपाचे शास्त्र आहे, असे म्हणता येते.

७) अमूर्त शास्त्र : समाजशास्त्रात सामाजिक संबंध सामाजिक संथा सामाजिक परिवर्तन आदी घटकांचा अभ्यास केला जातो. समाजशास्त्राचा अभ्यासविषय अमूर्त स्वरूपाचा आहे. आई मुलगा, भाऊ बहीण, शिक्षक विद्यार्थी, मालक नोकर, यांसारख्या विविध सामाजिक संबंधाचे स्वरूप निरीक्षणाच्या साहाय्याने व बुद्धीद्वारे समजून घ्यावे लागते. म्हणून समाजशास्त्र हे अमूर्त स्वरूपाचा अभ्यासविषय असणारे शास्त्र ठरते.

समाजशास्त्राचे महत्व :

समाजशास्त्राची वाटचाल दीडशे वर्षाची असली तरीही दिवसेंदिवस समाजशास्त्राचे महत्व वाढतच आहे. कारण आर्थिक विकासाचे अध्ययन करतांना आर्थिक घटकांप्रमाणे बिगर आर्थिक घटक म्हणजे सामाजिक व सांस्कृतिक घटक महत्वपूर्ण असल्याचे आधुनिक काळात सर्वत्र मेनी केले जाते. तसेच शासन संस्थेच्या धोरणावर व कार्यावर समाजातील लहान मोठ्या आकाराचे विभिन्न समूह, संथा, इत्यादींचा प्रभाव पडतो. हेदेखील सर्वत्र मान्य केले जाते. यामुळे समाजशास्त्रीय दृष्टिकोन, संकल्पना, सिद्धांत, अभ्यासपद्धती आदींचा स्वीकार करून आंतरशास्त्रीय दृष्टिकोनातून आर्थिक तसेच राजकीय जीवनाचे अध्ययन करण्याला विसाव्या शतकात महत्व प्राप्त झाले आहे. थोडक्यात, आर्थिक विकासाच्या सामाजिक बाजूंचे तसेच राजकीय जीवनाशी संबंधित सामाजिक बाजूचे अध्ययन करण्याला विसाव्या शतकात प्राधान्य दिले जात आहे. हक्सले, फ्रान्सिस बेकन, इत्यादी विचारवंत शुद्ध संशोधनवादी दृष्टिकोनातून समाजशास्त्राचे महत्व प्रतिपादित करतात. रॉबर्ट लिंड, स्टोअफेर इत्यादी विचारवंत उपयोगीतावादी दृष्टिकोनातून समाजशास्त्राचे महत्व प्रतिपादित करतात. या दोन्ही दृष्टीने समाजशास्त्राच्या महत्वासंबंधीचे विवेचन पुढील प्रमाणे करता येईल.

१) मानव समाजाचे वस्तुनिष्ठ आकलन : समाजशास्त्रात समाजाची संरचना निर्माण करणारे घटक सामाजिक व्यवस्था व तिच्या पूर्वावश्यकता , सामाजिक नियंत्रण, सामाजिक अनुचलन व विचलन, सामाजिक परिवर्तन, इत्यादींचे वैज्ञानिक पद्धतीने अध्ययन केले जाते. समाजशास्त्रतीय अध्ययनामुळे कोणत्याही समाजाचे वस्तुनिष्ठ आकलन करून घेणे शक्य झाले आहे.

२) सामाजिक समस्यांचे अध्ययन : भारताची लोकसंख्या प्रचंड आहे. भारतीय समाजात दारिद्र आहे. औद्योगिक व आर्थिक दृष्टीने भारत विकसनशील राष्ट्र आहे. म्हणून भारतीय समाजात सामाजिक समस्या आहेत. असा समज करून घेणे चुकीचे ठरते कारण सामाजिक समस्या नाहीत असा एकही समाज नाही. अस्पृश्यता, जातीवाद या समस्या भारतीय समाजात आहेत तर वंशभेदाची समस्या पाश्चिमात्य देशांत प्रामुख्याने अमेरिकन समाजात आहेत. सामाजिक समस्या या समाजउदभोवीत असतात. त्यांच्यामुळे सामाजिक विकासात बाधा निर्माण होते. म्हणून समाजशास्त्र सामाजिक समस्यांचे वैज्ञानिक पद्धतीने अध्ययन केले जाते. सामाजिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी किंवा त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी अशा समाजशास्त्रीय अध्ययनाचा उपयोग होतो.

३) सामाजिक नियोजन : समाजाचा एका विशिष्ट दिशेने विकास घडवून आणण्यासाठी नियोजनाला महत्व प्राप्त झाले आहे. आर्थिक नियोजनाप्रमाणेच सामाजिक नियोजनदेखील केले जाते. सामाजिक नियोजन करण्यासाठी समाजाविषयी आणि सामाजिक समस्यांविषयी वस्तुनिष्ठ माहिती नियोजनकर्त्यांजवळ असणे आवश्यक ठरते. यामुळेच सामाजिक नियोजनाच्या दृष्टीने समाजशास्त्र हे विशेष उपयुक्त ठरले आहे.

४) सामाजिक कल्याणाकरिता उपयुक्त : समानता असणे हि आदर्श स्थिती आहे. परंतु कोणत्याहि समाजात सर्व समाजघटकांची स्थिती समान नसते. निवारा, शिक्षण, सामाजिक अधिकार आदींबाबत अनेक समाजघटक दुर्बल असतात. भारतीय समाजात स्त्रिया, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या अनेक सदस्यांचा समावेश दुर्बल घटकांमध्ये होतो. दुर्बल घटक, मागासवर्गीय जाती, असंघटित क्षेत्रातील कामगार , शेतमजूर, अल्पभूधारक , लहान व्यवसाय करणारे लोक या सर्वांसाठी शासनाला विविध कल्याणकारी योजना तयार कराव्या लागतात. कल्याणकारी योजना तयार करण्यासाठी तसेच कल्याणकारी योजनांतून कोणती उद्दिष्टे साध्य झाली याचे मूल्यांकन करण्यासाठी समाजशास्त्रीय पद्धतीने केलेले अध्ययन अत्यन्त उपयुक्त ठरत आहे.

५) मानव समाजाचा विकास : सर्वच समाजांमध्ये विविध प्रकारच्या प्रथा, रूढी, अंधश्रद्धा असतात. काही समाजघटकांचे परस्परांबाबत पूर्वग्रहदेखील असतात. कालविसंगत व समाजहितविरोधी प्रथांमुळे अनेक समाजघटकांना दुःखद व असह्य जीवनस्थितीत जगावे लागते. यामुळे समाज विकासाच्या दिशेने वाटचाल करू शकत नाही. समाजशास्त्रात या गोष्टींचे वैज्ञानिक पद्धतीने अध्ययन केले जाते. अशा समाजशास्त्रीय अध्ययनातून धार्मिक परंपरा, चालीरीती, व्यावसायिक आणि भौगोलिक गतिशीलतेचा अभाव यांसारख्या कारणांमुळे काही विशिष्ट समूहांची प्रगती झाली नाही हे स्पष्ट झाले आहे. थोडक्यात, समाजशास्त्रीय अध्ययनातून समाजाच्या प्रगती व विकासाच्या प्रक्रियेतील अडथळे स्पष्ट होतात. परिणामी हळूहळू समाजसदस्य वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार करून आपली प्रगती घडवून आणण्याच्या दृष्टीने क्रियाशील होतात. यामुळे समाज विकासाच्या वाटचालीत अधिक गतिमानता येते.

समाजशास्त्राची व्याप्ती :

समाजशास्त्राची व्याप्ती निश्चित करणे याचा अर्थ त्याच्या अध्ययनविषयाची चौकट निश्चित करणे होय कोणत्याही शास्त्राच्या अभ्यासाविषयी सीमारेषा निश्चित झाली म्हणजे त्या शास्त्रामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास करण्याचा समावेश होतो आणि कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास करण्याचा समावेश होत नाही हे स्पष्ट होते. अशा प्रकारे व्याप्ती निश्चित झाली कि त्या शास्त्राला अन्य शास्त्रांपेक्षा वेगळा व स्वतंत्र अभ्यासविषय असणारे शास्त्र असे स्थान प्राप्त होते. कोणत्याही शास्त्राच्या अभ्यासविषयाची व्याप्ती निश्चित केली नाही तर त्या शास्त्रामध्ये कोणकोणत्या बाबींचा अभ्यास करावा याला मर्यादाच राहणार नाही. हे लक्षात घेणे आवश्यक ठरते. शास्त्राची व्याख्या करणे व व्याप्ती निश्चित करणे हे त्या शास्त्राच्या अभ्यासकांचेच कार्य असते. समाजशास्त्राच्या व्याख्यांवरून त्याचा अभ्यासविषय कोणता आहे याचा बोध आपणास होतो. परंतु केवळ व्याख्यांवरून समाजशास्त्राच्या अभ्यासविषयाच्या व्याप्तीचे संपूर्ण चित्र स्पष्ट होत नाही. कारण समाजशास्त्राची व्याख्या करतांना विचारवंत सामाजिक संबंध, सामाजिक समूह, मानवनिर्मित वातावरण यांसारख्या अभ्यासविषयाशी निगडित एख्याद्या पैलूलाच अत्याधिक महत्व देतात. म्हणून समाजशास्त्राच्या व्याप्तीसंबंधी काही प्रमुख विचारवंतांनी मांडलेल्या विचारांची ओळख करून घेणे आवश्यक ठरते.

शास्त्र म्हणजे काय?

एखाद्या विषयासंबंधीचा केवळ ज्ञानसंग्रह म्हणजे शास्त्र नाही. तर शास्त्र हि एक अभ्यासाची पद्धयी आहे असे म्हटले जाते. शास्त्राची व्याप्ती काही मोजक्या व ठराविक विषयांपुरतीच मर्यादित नाही. कोणत्याही घटनेचे अथवा अभ्यासविषयाचे शास्त्र होऊ शकते. त्यासाठी त्याविषयाचे एका विशिष्ट्य पद्धतीने अध्ययन केले जाते, तेव्हाच त्याला शास्त्र असे म्हणतात. अशा प्रकारे शास्त्राचा अर्थ स्पष्ट करण्याच्या व्याख्येत अभ्यासाविषयाबाबतचे संघटित ज्ञान आणि हे ज्ञान प्राप्त करण्याची पद्धतशीर पद्धती या दोन्ही घटकांना सारखेच महत्व दिले आहे. पद्धतशीर अथवा वैज्ञानिक पद्धतीमध्ये अध्ययनविषयी संबंधित सामग्रीचे पद्धतशीर पद्धतीने संकलन, वर्गीकरण, कर्मनिर्धारण, सामाणीकरण, निष्कर्षाचे प्रतिपादन या सर्व बाबींचा समावेश होतो. थोडक्यात वैज्ञानिक पद्धतीत एका क्रमबद्ध पद्धतीने अभ्यास करण्याची गरज असते. वैज्ञानिक पद्धतीत कोणताही जवळचा मार्ग नसतो. कार्ल पियर्सन यांच्या मते सत्याच्या आकलनासाठी वैज्ञानिक पद्धतीशिवाय अन्य दुसरा कोणताच पर्याय नाही. अशा प्रकारे कोणताही विषय हा शास्त्राचा अभय्यासविषय होऊ शकतो. शास्त्र होण्यासाठी त्या विषयाचे अध्ययन वैज्ञानिक पद्धतीने झाले असले पाहिजे तसेच हे अध्ययन क्रमबद्ध व नियमबद्ध असले पाहिजे.

also read :

FAQ

[sc_fs_faq html=”true” headline=”h3″ img=”” question=”समाजशास्त्र म्हणजे काय? What is Sociology In Marathi” img_alt=”” css_class=””] समाजशास्त्र म्हणजे : माणसाचा समाजा सोबत जो संबंध असतो त्या संबंधाचा अभ्यास करणे म्हणजेच समाजशास्त्र होय. [/sc_fs_faq] [sc_fs_faq html=”true” headline=”h3″ img=”” question=”Sociology Meaning In Marathi” img_alt=”” css_class=””] Sociology चा मराठीत अर्थ “समाजशास्त्र” असा होतो. [/sc_fs_faq]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *