माझी शाळा भाषण मराठी Speech On My School In Marathi : नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला माझी शाळा या विषयावर मराठी भाषण लिहून दिलेले आहे. म्हणून पोस्ट पूर्ण वाचा आणि आवडल्यावर तुमच्या मित्रांना शेयर करायला विसरु नका धन्यवाद..

Speech On My School In Marathi
Speech On My School In Marathi माझी शाळा भाषण मराठी
विद्येचे व ज्ञानाचे मंदिर म्हणून ओळखली जाते ती शाळा. प्रत्येक मुलाच्या आयुष्यात शाळा एक मोठी भूमिका बजावते. प्रत्येक मूल हे शाळेत जाण्यापूर्वी घरातल्या छोट्याश्या जगात असते. आणि बाहेरील मोठ्या जगाशी परिचय हा शाळेमुळेच होतो.
आपण जन्माला आल्यानंतर आपणाला घडविण्यात तीन गोष्टींचा मोठा वाटा असतो. आपले आई बाबा आपला परिसर आणि आपली शाळा. त्याचप्रमाणे मा\झ्या आयुष्यात माझ्या शाळेचा मोठा वाट आहे.
माझ्या शाळेचे नाव सौ कमलाबाई माणिकचंद कासलीवाल विद्यालय आहे. माझ्या शाळेचा परिसर अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहे. शाळेमध्ये १ ते १० चे वर्ग, संगणकाची लॅब, वाचनालय, खेळण्यासाठी मोठे ग्राऊंड, लॅबोरेटरी, एक मोठे सभागृह, सभोवताली फुलझाडे अशी माझ्या शाळेची रचना आहे.
माझ्या शाळेत शिस्तीचे फार महत्व आहे. शाळेची पहिली घनता झाली कि सर्व मुले आपापल्या वर्गात असतात आणि दुसरी घंटा झाली कि प्रार्थना सुरु होते. शाळेची प्रार्थना सुरु झाली कि सर्व मुले एकत्र प्रार्थना म्हणत असतात. तेव्हा तिथले वातावरण अत्यन्त शांत आणि उत्साहवर्धक झालेले असते.
माझ्या शाळेत फक्त अभ्यासच नव्हे तर थोर नेत्यांची जयंती, सर्व सण, त्यावरचे कार्यक्रम, भाषणे, स्पर्धा असे विविध उपक्रम राबविले जातात. माझ्या शाळेचे शिक्षक अत्यंत हुशार आणि मनमिळावू आहेत. अभ्यासासोबतच ते आम्हाला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करतात.
आणि त्या स्पर्धा परीक्षांची तयारी सुद्धा ते आमच्याकडून करून घेतात. माझ्या शाळेच्या वाचनालयाचे वातावरण अत्यंत शांत व रमणीय असते. वाचनालयामध्ये विविध प्रकारची विविध भाषेतील पुस्तके उपलब्ध आहेत.
शाळेच्या लॅबोरेटरी मध्ये शिक्षक आम्हाला वेगवेगळे वैज्ञानिक प्रयोग करून दाखवतात. विज्ञानातील चमत्कार तिथे आम्हाला पहायला मिळतात. माझ्या शाळेमध्ये अभ्यासासोबतच खेळालाही महत्व दिले जाते. शाळेत खास खो खो चे प्रशिक्षण दिले जाते.
माझ्या शाळेत मला खूप चांगले मित्र मिळाले हे माझे खूप मोठे भाग्य आहे.मी माझ्या शाळेचा आदर करतो मला माझ्या बशाळेचा अभिमान आहे म्हणून माझी शाळा मला खूप आवडते.