Section 353 IPC In Marathi 353 – IPC 332 In Marathi : नमस्कार मित्रांनो, 353 कलम म्हणजे काय? या बद्द्ल संपूर्ण माहिती सांगणार आहे म्हणून पोस्ट पूर्ण वाचा जेणेकरून तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती मिळेल आणि पोस्ट आवडल्यावर तुमच्या मित्रांना शेयर करायला विसरु नका धन्यवाद..

Section 353 IPC In Marathi 353, IPC 332 In Marathi
(Section 353 IPC In Marathi 353, IPC 332 In Marathi)

Section 353 IPC In Marathi 353 | IPC 332 In Marathi | 353 कलम म्हणजे काय?

३५३. लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी हमला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग करणे.

लोकसेवक असलेली कोणतीही व्यक्ती असा लोकसेवक म्हणून आपले कर्तव्य बजावत असताना अथवा असा लोकसेवक म्हणून आपले कर्तव्य पार पाडण्यास त्या व्यक्तीला प्रतिबंध करण्याच्या किंवा त्यापासून धाकाने परावृत्त करण्याच्या उद्देशाने अथवा असा लोकसेवक म्हणून आपले कर्तव्य कायदेशीरपणे पार पाडीत असताना अशा व्यक्तीने केलेल्या किंवा करण्याचा प्रयत्न केलेल्या कोणत्याही गोष्ट्रीच्या परिणामी, जो कोणी तिच्यावर हमला किवा फौजदारीपात्र बलप्रयोग करील, त्याला दोन वर्षेपर्यन्त असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षा होतील.

टीप १: हे शिक्षा कलम आहे. यात दोन प्रकारचे अपराध आहेत. एक हमला ASSAULT| आणि दोन फौजदारीपात्र बलप्रयोग |CRIMINAILFORCE] लोकसेवक त्याचे कर्तव्य करत असताना त्याला परावृत्त करणेसाठी हे दोन अपराध केले जातात. हे कलम आधीच्या कलम ३३२-३३३ प्रमाणेच तंतोतंत तसेच आहे. त्यात फ़रक इतकाच की त्या दोन कलमात अनुक्रमे साधी दुखापत, मोठी दुखापत केली जाते. तर येथे हमला अगर फोजदारी बलप्रयोग केला जातो.

टीप २ : लोकसेवक : याचा अरथ्थ आय. पी. सी. कलम २१ प्रमाणे प्रकार १ ते १२ मध्ये पडणारा कोणताही लोकसेवक होय. यात विविध खात्यामधील वरिष्ठ आणि कनिष्ठ सेवक सर्व येतात.

टीप ३ : या कलमाचे महत्त्वाचे घटक :
(१) लोकसेवक आपले कर्तव्य करत असतो अगर
(२) त्याने ते कर्तव्य करू नये म्हणून अगर
(३) त्याने ते केले म्हणून
(४) आरोपी त्याचेवर हमला करतो अगर
(५) त्याचेवर फौजदारीपात्र बलप्रयोग करतो.
थोडक्यात कोणत्याही तीन परिस्थितीमध्ये वर्तमान, भविष्य आणि भूतकाळाप्रमाणे कर्तव्याबाबत हरकत असते.

टीप ४ : कायद्याने नेमून दिलेले काम : लोकसेवक जे काम करत असतो ते कायदेशीर नेमून दिलेले पाहिजे पाहा. “दलीप (१८९६) १८ All. २४६ तसेच रमण सिंग’ (१९००) २८ Cal ४११. पण हल्ला होताना लोकसेवक खासगी काम करत असेल तर कलम ३५२ चा अपराध होतो, पाहा “सी. पी बेरार- सरकार- वि- नानेलाल (१९४६) Nag ३ ९५.

टीप ५ : मोटार सायकलला धक्का लागणे : या घटनेत फौजदाने एका आरोपीस त्याची गाड़ी थांबविण्यास सांगितली पण न थांबवता जोरात जाताना फौजदाराच्या मोटार सायकलचे मडगाडास ठोस दिली. यात आरोपीने हमला अगर फौजदारी पात्र बलप्रयोंग केल्याचा पुरावा नव्हता म्हणून अपराध नाही. पाहा. “पी. रामाराव” १९८४ Cr. L. J R9 AP.

टीप ६ : कार्यपद्धती : अपराध दखलपात्र – जामीनपात्र- प्रथम वर्ग न्यायाधीशापुढ़े चालणारा असून आपसात मिटविता येत नाही कारण तशी तरतूद क्रि. प्रो कोड कलम ३२० (१)(२) मध्ये नाही.

#TAGS: Section 353 IPC In Marathi 353, IPC 332 In Marathi.