संस्कृती म्हणजे काय? | संस्कृती मराठी माहिती | Sanskruti In Marathi Information

संस्कृती म्हणजे काय? – संस्कृती मराठी माहितीSanskruti In Marathi Information : नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला संस्कृती बद्द्ल संपूर्ण माहिती सांगणार आहे म्हणून पोस्ट पूर्ण वाचा आणि आवडल्यावर तुमच्या मित्रांना शेयर करायला विसरु नका धन्यवाद..

संस्कृती म्हणजे काय? - संस्कृती मराठी माहिती - Sanskruti In Marathi
Sanskruti In Marathi

संस्कृती म्हणजे काय? – संस्कृती मराठी माहिती – Sanskruti In Marathi

मानव समाजाचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे संस्कृती होय. कारण एक जैविक प्राणी या अर्थाने सर्वच समाजांमधील मानवाची शरीर रचना सामान आहे. अन्न वस्त्र, निवारा, कामवासना यांसारख्या मूलभूत गरजा समान आहेत. असे असूनही अमेरिकन समाज भारतीय समाजापेक्षा वेगळा आहे. असे आपण म्हणतो कारण या दोन समाजांची संस्कृतीचं भिन्न आहे. दोन्ही समाजांमध्ये कुटुंब व अन्य समामाजिकी संथा आहेत. परंतु, पती, पत्नी, आजी, आजोबा, व अन्य कुटुंब सदस्यांचे अधिकार, कर्तव्ये व परस्परसंबंध, इत्यादी कुटुंब संस्थेशी निगडित सर्व बाबी दोन्ही समाजाच्या संस्कृती नुसार निश्चित झाल्या आहेत. दोन समाजांमधील कुटुंबसंस्थेच्या स्वरूपातील हा फरक त्या समाजाच्या संस्कृतीमधील फरकामुळेच निर्माण झालेला असतो. म्हणून समाजाचे अध्ययन करणाऱ्या समाजशास्त्राला त्या समाजाच्या संस्कृतीचे अध्ययन करावे लागते. संस्कृतीचा संबंध केवळ समाजाशी आहे, व्यक्तीच्या सामाजिक जीवनाशी नाही. असेदेखील म्हणता येतनाही, कारण सर्वच समाजांमधील सदस्यांच्या व्यक्तीच्या बहुतांश वर्तनक्रिया या सांस्कृतिक स्वरूपाच्या असतात. उदाहरणार्थ, शुभ व महत्वपूर्ण कार्याचा प्रारंभ करण्याच्या प्रसंगी श्रीफळ फोडण्याच्या कृती अशिक्षितांपासून सुशिक्षितांपर्यंत सर्वच भारतीय हिंदू व्यक्ती करीत असतात. आपल्यापेक्षा वयाने किंवा ज्ञानाने जेष्ठ असणाऱ्या व्यक्तीच्या प्रति खाली वाकून नमस्कार करण्याची वर्तनकृती सर्वच भारतीयांकडून होत असते. थोडक्यात कोणत्याही समाजातील व्यती व्यक्तींच्या परस्परसंबंधांवर त्या समाजाच्या संस्कृतीचा प्रभाव असतो. मानव समाजाचे सर्वात महत्वपूर्ण वैशिष्ट्य असणाऱ्या संस्कृतीचे अध्ययन केवळ समाजशास्त्रातच केले जाते असे देखील नाही. इतिहास, तत्वज्ञान मानवशास्त्र यांसारख्या अनेक सामाजिक शास्त्रांमध्ये संस्कृतीचे अध्ययन केले जाते. म्हणूनच संस्कृती म्हणजेच काय याबाबत विविध प्रकारची मते व्यक्त केली जातात.

संस्कृतीचे वैशिष्ट्य :

सामाजिक विचारवंतांनी समाजशास्त्रीय अध्ययनाच्या आधारे संस्कृतीची ठळक वैशिष्ट्य पुढीलप्रमाणे स्पष्ट केली आहेत.

१) मानवनिर्मित : भौतिक वस्तूंप्रमाणेच प्रथा, लोकाचार, प्रमाणके, मूल्ये या सर्व अभौतिक बाबीदेखील मानवनिर्मित आहेत. उदाहरणार्थ, बालविवाह व सती जाणे या प्रथा भारतीय समाजातच निर्माण झाल्या. समाजहितविरोधी असणाऱ्या या प्रथांच्या उच्चाटनाचे कार्यदेखील भारतीयांनीच केले. यावरून प्रत्येक समाजाची संस्कृती हि त्याच समाजाच्या सदस्यांनी निर्माण केलेली असते. हे स्पष्ट होते.

२) हेतुपूर्वक निर्मिती : व्यक्ती तसेच समूहाला आपल्या सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागते. समुद्रकिनाऱ्याजवळील प्रदेशांमध्ये राहणारे बहुतांश लोक मासे खातात. याउलट सपाट व सुपीक प्रदेशांमधील बहुतांश लोक शाकाहारी असतात. बर्फाळ व वाळवंटी प्रदेशात लोकांचा पोशाख व त्यांची घरेदेखील नैसर्गिग परिस्थितींशी जुळवून घेता येईल अशीच असतात अशा प्रकारे प्रत्येक समाजाच्या संस्कृतीची निर्मिती हेतुपूर्वक झालेली असते.

३) स्वयंशिल : संस्कृती हि समाजाचा वारसा या स्वरूपात प्राप्त होत असली तरीही प्रत्येक नवीन पिढी त्यात भर टाकीत असते अशा प्रकारे संचय होत होत समाजाची संस्कृती समृद्ध होत आहे.

४) समाइकता : रामायण व महाभारत हि महाकाव्ये, भरतनाट्यम व कुचीपुडीसारखे नृत्यप्रकार, इडली व डोसा यांसारखे खाद्यपदार्थ योगासनांचे विविध प्रकार यांसारख्या विविध गोष्टी कोणत्याही एका व्यक्तीच्या अथवा समूहाच्या मालकीच्या नाहीत म्हणूनच संस्कृती हि सर्व समाजसदस्यांसाठी समाईक असते अथवा संस्कृती सर्व समाजसदस्यांसाठी सामाजिक वारसा असते असे म्हणता येते.

५) प्रतीकात्मक : समाजाची संस्कृती प्रतीकात्मक स्वरूपात असते. कारण समाजातील वस्तू म्हणजे संस्कृती नाही. भौतिक वस्तूंना मानवाद्वारे जो प्रतीकात्मक अर्थ प्राप्त करूंदीला जातो त्यामुळे त्या वस्तूंना सांस्कृतिक अर्थ प्राप्त करून दिला जातो. उदाहरणार्थ, स्वस्तिक या चिन्हाला व नारळ या वस्तूला मांगल्याचे प्रतीक असा अर्थ भारतीय समाजात प्राप्त झाला आहे. शहरी व ग्रामीण क्षेत्रातील लोकांच्या दृष्टीने कवड्या या वस्तूला फारसे मूल्ये नसते. तरीही आदिवासी जमातींमध्ये त्यांना प्रतीकात्मक स्वरूपाचा अर्थ प्राप्त झाला आहे. अशा प्रकारे प्रतीकात्मक स्वरूप हे प्रत्येक समाजाच्या संस्कृतीचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे.

६) परिवर्तनशीलता : सर्व समाजाच्या संस्कृतीचे मूळ रूप जसेच्या तसे कधीच कायम राहत नाही. संस्कृतीच्या मूळ रूपात अनेकविध परिवर्तने होत असतात. संस्कृती हि व्यक्तीच्या आणि पर्यायाने समाज्याच्या विविध गरजांची पूर्ती करण्यासाठी हेतुपूर्वक निर्माण झालेली असते. त्यामुळे व्यक्ती व समाज्याच्या गरजांमध्ये बदल झाल्यास संस्कृतीमध्येही परिवर्तन घडून येते. उदाहरणार्थ, उत्तर भारतात परकीयांच्या आक्रमणामुळे स्त्रियांना सुरक्षित ठेवणे हि तत्कालीन व्यक्तीची व समाजाची गरज होती. हि गरज भागविण्यासाठी उत्तर भारतातील अनेक जातिसमूहांमध्ये विवाहित स्त्रीने आपला चेहरा दिसणार नाही या पद्धतीने डोक्यावर पदर घेण्याची प्रथा अस्तित्वात आली. वर्तमानकाळात परकीय आक्रमणांची भीती नसल्यामुळे हि प्रथा हळूहळू लोप पावत आहे. थोडक्यात, सर्व समाजांमध्ये प्रथा वर्तनप्रकार, भाषा, प्रमाणके आदींमध्ये बदल होत असतो. म्हणून संस्कृती हि परिवर्तनशील असते असे म्हटले जाते.

७) प्रसरण : एका समुहापासून दुसऱ्या समूहामध्ये किंवा एका देशामधील समाजापासून दुसऱ्या देशांमधील समाजापर्यंत संस्कृतीचे प्रसारण होते. उदाहरणार्थ, स्वातंत्र्यपूर्वी ब्रिटिशांच्या संपर्कात आल्यानंतर अनेक भारतीयांना उदारमतवादी विचारप्रणाली पाश्चिमात्यांसारखी वेशभूषा, केशभूषा व पोशाखपद्धती जेवणासाठी टेबल खुडच्यांचा उपयोग करण्याची पद्धती आदींचा स्वीकार केला पाश्चिमात्य देशांमधील काही व्यक्तींनी आयुर्वेदातील औषधे व उपचारपध्दती, योगासनांचे प्रकार, इत्यादींचा स्वीकार केला आहे. लॉन टेनिस, टेबल टेनिस, डिस्को डांस हा नृत्याचा प्रकार इत्यादींचा स्वीकार अनेक देशांमधील लोकांनी केला असल्याचे दिसून येते. या सर्व उदाहरणांवरून एका समाजापासून दुसऱ्या समाजामध्ये संस्कृतीचे प्रसरण होते हे स्पष्ट होते. संस्कृतीच्या प्रसरणाची प्रक्रिया प्राचीन काळापासून सुरु असली तरीहि आधुनिक काळात जलद वाहतुकीच्या साधनांमुळे दोन देशांमधील जनतेच्या परस्परसंपर्कांचे प्रमाण पूर्वीपेक्षा अधिक वाढले आहे. यामुळे आधुनिक काळात संस्कृतीच्या प्रसरणाला अधिक वेग प्राप्त झाला आहे.

संस्कृतीचे महत्व :

व्यक्ती व समाज या दोघांच्याही दृष्टीने संस्कृतीला महत्व आहे. संस्कृतीची उपयुक्त कार्ये खालीलप्रमाणे आहेत.

१) व्यक्तिमत्व घडण : व्यक्तीचे व्यक्तिमत्व घडवण्यात संस्कृतीचे योगदान अतिशय महत्वपूर्ण आहे. सांस्कृतिक अनुभव हा व्यक्तिमत्वाचा जडणघडनमधील महत्वपूर्ण घटक आहे. व्यक्तीचे सांस्कृतिक अनुभव हे ती कोणत्या गटाची, समुदायाची व समाजाची सदस्य आहे यावर अवलंबून असतात. उदाहरणार्थ, कष्ट करण्याची सवय, लैंगिक संबंधाबाबतच्या नीतिकल्पना कर्तव्यपूर्तीची जाणीव इत्यादी व्यक्तिमत्वामधील गुणांचे स्वरूप ती व्यक्ती ज्या समाजाची सदस्य आहे त्या समाजाच्या संस्कृतीवर अवलंबून असते. व्यक्तिमत्व हे संस्कृतीसापेक्ष असते, असे विचारवंतांनी आपल्या अध्ययनातून स्पष्ट केले आहे.

२) सामाजिकीकरण : संस्कृतीमुळे सामाजिकीकरणाची प्रक्रिया सुलभ झाली आहे. जर समाजा जवळ संस्कृतीचा समृद्ध वारसा नसता तर प्रत्येक पिढीला चकमकीपासून अग्नी निर्माण करण्यापासून अनेकविध गोष्टी पुन्हा पुन्हा शिकवाव्या लागल्या असत्या. संस्कृतीचा समृद्ध वारसा आपल्या जवळ असल्यामुळेच चकमकीचा उपयोग करून अग्नी निर्माण करण्याची पाळी आपल्यावर येत नाही. असे म्हणता येईल.

३) गरजांची पूर्तता : समाजसदस्यांनी आपल्या आर्थिक गरजांची पूर्ती कोणत्या मार्गानी करावी यासंबंधीचे मार्गदर्शन त्यांना समाजाच्या संस्कृतीद्वारे प्राप्त होत असते. उदाहरणार्थ, घनदाट जंगलामध्ये राहणाऱ्या आदिवासी जमातींना जंगली पदार्थ गोळा करणे, शिकार करणे, वनऔषधींचा उपयोग, इत्यादी मार्गांनी आर्थिक गरजांची पूर्ती करण्यासंबंधीचे मार्गदर्शन त्या जमातींची संस्कृतीचं करीत असते. असेच नागरी समाज, ग्रामीण समाज यांच्याबाबतही म्हणता येईल. समाजाच्या संस्कृतीने निर्धारित व निश्चित केलेल्या मार्गानेच सदस्यांनी आपल्या आर्थिक गरजांची पूर्ती करावी यावर समाजाचा कटाक्ष असतो.

४) सामाजिक नियंत्रण : समाजसदस्यांना संस्कृतीनुसार वर्तन करावयास भाग पाडून सामाजिक नियंत्रण घडवून आणण्याचे महत्वपूर्ण कार्य संस्कृतीद्वारे होत असते. ज्या गोष्टी समाजाच्या संस्कृतीने निषिद्ध ठरविल्या आहेत, त्या करावयास समाजसदस्य सामान्यपणे तयार नसतात. कारण असे वर्तन केल्यास अन्य समाजसदस्य आपल्यावर टीका करतील अशी भीती व्यक्तीच्या मनात असते.

५) सभयतेचा विकास : मानवी समाजात सभेतच विकास व प्रगती घडवून आणणे देखील संस्कृतीचे एक महत्वपूर्ण कार्य आहे. सभ्यता व संस्कृती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असेदेखील म्हटले जाते. ज्या गोष्टी समाजासाठी उपयुक्त आहेत व ज्यांचा उपयोग केल्याने समाजाच्या कार्यक्षमतेत वाढ होते, त्यांचा समावेश सभ्यतेमध्ये होतो. सभ्यतेचा संबंध प्रगती व सुधारणेशी आहे. सभ्यता आणि संस्कृती यांमध्ये फरक आहे असेदेखील काही विचारवंतांना वाटते. थोडक्यात संस्कृतीचा सभ्यतेवर आणि सभ्यतेचा संस्कृतीवर परिणाम होतो असे म्हणणे योग्य होईल.

FAQ

[sc_fs_faq html=”true” headline=”h2″ img=”” question=”संस्कृती म्हणजे काय?” img_alt=”” css_class=””] संस्कृती म्हणजे काय : मानव समाजाचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे संस्कृती होय.! [/sc_fs_faq]

also read :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *