Skip to content

समाज म्हणजे काय संपूर्ण माहिती मराठीत | Samaj Meaning In Marathi | Samaj Mhanje Kay In Marathi

    समाज म्हणजे काय मराठीसमाज म्हणजे काय व्याख्याSamaj Meaning In MarathiSamaj Mhanje Kay In Marathiसमाज कसा तयार होतोसमाज कार्य म्हणजे काय : नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला समाजा बद्द्ल संपूर्ण माहिती सांगणार आहे म्हणून पोस्ट पूर्ण वाचा आणि आवडल्यावर तुमच्या मित्रांना शेयर करायला विसरु नका धन्यवाद..

    समाज म्हणजे काय मराठी - समाज म्हणजे काय व्याख्या - Samaj Mhanje Kay In Marathi - Samaj Meaning In Marathi - समाज कसा तयार होतो - समाज कार्य म्हणजे काय

    Samaj Meaning In Marathi

    Samaj Meaning In Marathi

    Samaj चा मराठीत अर्थ “समाज” च होतो. आणि Samaj चा इंग्रजीत अर्थ “Society” असा होतो.

    समाज म्हणजे काय मराठी Samaj Mhanje Kay In Marathi | What Is Society In Marathi?

    समाज म्हणजे काय?: समाज म्हणजे सामाजिक संबंधाचे जाळे. समाज या संज्ञेची समाजशास्त्र समाजशास्त्र व्याख्या केली जाते समाजाचे सदस्य असणाऱ्या व्यक्ती विविध कारणामुळे परस्परांच्या संपर्कामध्ये येतात. परस्परांशी विविध प्रकारच्या आंतरक्रिया करतात. त्या आंतरक्रियांमधूनच त्यांना परस्परांशी जोडणाऱ्या सामाजिक संबंधाची संबंधाची निर्मिती होते. होते. अशा सामाजिक संबंधाचे जाळे म्हणजे समाज होय. म्हणून समाजाचा अभ्यास म्हणजे सामाजिक संबंधाचा अभ्यास होय. थोडक्यात, समाजशास्त्राच्या अभ्यासाचा मुख्य विषय समाजातील व्यक्ती नसून समाजसदस्य असणाऱ्या व्यक्ती व्यक्तींमधील सामाजिक संबंध हा आहे. अमेरिका किंवा अन्य कोणत्याही देशातील समाजशास्त्र भारतीय समाजाचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा तो आप्तसंबंध, जातिसमूहाच्या अंतर्गत असणारे संबंध जाती जातींमधील संबंध, नेता अनुयायी संबंध यांसारख्या विभिन्न सामाजिक संबंधाचा अभ्यास करतो.

    समाजसदस्य असणाऱ्या सर्वच व्यक्तींचा कधी ना कधीतरी मृत्यू होतो. तरीही समाजाचे अस्तित्व व सातत्य कायम असते. म्हणूनच सामाजिक संबंधाच्या चाकोरीला अथवा व्यवस्थेला समाज असे संबोधने योग्य ठरते. भारतीय, अमेरिकन किंवा नागरी, ग्रामीण, आदिवासी यांसारख्या कोणत्याही समाजात समाजसदस्यांमधील सामाजिक संबंधाची चाकोरी वेगवेगळी असते. याच अर्थाने भारतीय समाज, ग्रामीण समाज, आदिवासी समाज असे शब्दप्रयोग समाजशास्त्रात केले जातात. थ्यडक्यात एक व्यक्ती आपले सामाजिक जीवन जगत असतांना अन्य व्यक्तीशी या ना त्या संबंधाने जोडलेली असते. उदाहरणार्थ: अ हि व्यक्ती समाजाचे सदस्य असणाऱ्या अन्य व्यक्तींशी भाऊ, पती, वडील, मालक, नोकर, व्यवसायांमधील सहकारी, मित्र यांसारख्या निरनिराळ्या नात्यांनी व संबंधांनी जोडलेली असते. म्हणून सामाजिक संबंधाचे जाळे किंवा सामाजिक संबंधाची चाकोरी म्हणजे समाज होय. असे मानणे उचित ठरते.

    समाज म्हणजे काय व्याख्या | समाजशास्त्राच्या व्याख्या

    1) मॅक आयव्हर व पेज यांच्या मते समाजशास्त्र हे सामाजिक संबंधाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे.

    सामाजिक संबंध हाच समाजशास्त्राचा अभ्यासविषय आहे हे या व्याख्येवरून स्पष्ट होते. शिक्षक विद्यार्थी, मालक नोकर, दुकानदार ग्राहक, पती पत्नी, नेता अनुयायी हि सर्व सामाजिक संबंधाची उदाहरणे आहेत. समाजसदस्य असणाऱ्या दोन व्यक्तीमधील परस्परसंबंध म्हणजे सामाजिक संबंध होय. समाजसदस्यांमधील सामाजिक संबंध हे सहकार्य, प्रेम, तिरस्कार, संघर्ष, इत्यादी विविध प्रकारचे असू शकतात. सामाजिक संबंधाच्या अभ्यासावरून समाज संघटनेचा तसेच समाजात होणाऱ्या परिवर्तनाचा बोध होतो. म्हणून सामाजिक संबंध हाच समाजशास्त्रीय अभ्यासाचा केंद्रबिंदू आहे, असे मॅक आयव्हर व पेज यांचे मते आहे.

    2) फेअरचाईल्ड यांच्या मते मानव आणि मानवनिर्मित वातावरण यांच्यामधील संबंधाचे अध्ययन म्हणजे समाजशास्त्र होय.

    नैसर्गिक वातावरणाप्रमाणेच मानवनिर्मित वातावरणदेखील आहे उदाहरणार्थ, विवाहासाठी जोडीदार पद्धती, विवाहाचे वय, विवाह समारंभ साजरा करण्याची पद्धती विवाहानंतर पती व पत्नी यांचे परस्परांबाबतचे अधिकार व करतत्वे, इत्यादी बाबतीत प्रत्येक समाजात भिन्न स्थिती आहे. विवाहाच्या संदर्भातील ही भिन्नता म्हणजे मानवनिर्मित वातावरण होय. ब्राम्हण जात श्रेष्ठ आणि पूर्वापार अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या महार, मांग, खाटीक, इत्यादी जाती कनिष्ठ हि सामाजिक विषमतादेखील मानवनिर्मित आहे. मानवनिर्मित वातावरणाचा प्रभाव आणि मानवनिर्मित वातावरण हाच समाजशास्त्राचा अभ्यासविषय आहे, असे फेअरचाईल्ड यांना वाटते.

    3) गिन्सबर्ग यांच्या मते व्यक्ती व्यक्तींमधील आंतरक्रिया आणि त्यातून निर्माण होणारे परस्परसंबंध याच्या कारणांचे व परिणामांचे अध्ययन करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र होय.

    समाजसदस्य एकमेकांच्या सहवासात राहतात. त्यांच्यात क्रिया प्रतिक्रिया व आंतरक्रिया निर्माण होतात. उदाहरणार्थ: दुकानदार ग्राहकाला या साहेब असे म्हणतो. ग्राहकाच्या प्रश्नांची नम्रतेने व गोड शब्दांत उत्तरे देतो. दुकानदाराच्या या क्रियेमुळे तो चांगला आहे. अशी ग्राहकांची प्रतिक्रिया निर्माण होते. त्याने उत्तम दर्जा असणारी व योग्य किमतीमध्ये वस्तू दिली की ग्राहकाला त्याच दुकानातून पुन्हा वस्तू खरेदी करावी असे वाटते. अशा प्रकारे दुकानदार व ग्राहक यांच्यातील क्रिया प्रतिक्रिया व आंतरक्रिया यांच्या साखळीतून त्यांचे परस्परसंबंध निश्चित होत जातात. म्हणून आंतरक्रिया व परस्परसंबंध यांची कारणे व परिणाम यांचा अभ्यास करणे हेच समाजशास्त्राचे कार्य आहे. असे मत गिन्सबर्ग यांनी व्यक्त केले आहे.

    4) हॅरी जॉन्सन यांच्या मते सामाजिक समूह गट त्यांची संघटन पद्धती किंवा त्यांचे अंतर्गत स्परूप तसेच समूहाचे संघटन टिकवून ठेवण्याच्या पद्धती, समूहामध्ये परिवर्तन घडवून आणणाऱ्या प्रक्रिया आणि समूहांमधील परस्परसंबंध या सर्वांचे अध्ययन करणारे शास्त्र म्हणजे समाज शास्त्र होय.

    प्रत्येक समाजात कुटुंब, शेजार, नातेसमूह, मित्रमंडळ, विद्यार्थी, कामगार, शेतकरी सन्घटना यांसारखे लहान किंवा मोठा आकार असणारे अनेक समूह असतात. कुटुंब या समूहाचे अंतर्गत स्परूप मित्रमंडळ, विद्यार्थी संघटना व अन्य कोणत्याही समूहापेक्षा भिन्न असते. प्रत्येक समाजसदस्य एकाच वेळेस कुटुंब, शेजारी, मित्रमंडळ, खेडे किंवा नगर यांसारख्या अनेक समूहांचा सदस्य असतो. म्हणून सामाजिक समूह हाच समाजशास्त्राच्या अभ्यासाचा केंद्रबिंदू आहे असे हॅरी जॉन्सनचे मत आहे.

    5) जॉर्ज सीमेल यांच्या मते समाजशास्त्र हे मानवी परस्परक्रियांच्या स्वरूपाचे अध्ययन करणारे शास्त्र आहे.

    समाजसदस्यांमध्ये सातत्याने परस्परक्रिया घडून येतात. उदाहरणार्थ: शिक्षक विद्यार्थी, आई मुलगी, बहीण भाऊ, अधिकारी कर्मचारी इत्यादी सदस्यांमध्ये परस्परक्रिया घडून येतात. या परस्परक्रियांचे स्वरूप सहकार्य वर्चस्व प्रधान संघर्ष यांसारख्या कोणत्या तरी प्रकारचे असते. म्हणून मानवी परस्परक्रियांचे स्वरूप समजून घेण्याचे कार्य समाजशास्त्राने केले पाहिजे, असे जॉर्ज सीमेल यांना वाटते.

    समाजशास्त्राची प्रमुख वैशिष्ट्ये

    1) सामाजिक शास्त्र :

    नैसर्गिक किंवा भौतिक शास्त्रांच्या अभ्यासविषयांपेक्षा समाजशास्त्राचा अभ्यासविषय भिन्न आहे. समाजशास्त्र समाजसदस्यांच्या सामाजिक संबंधाचे अध्ययन केले जाते. म्हणून समाजशास्त्राचे स्वरूप हे सामाजिक शास्त्राचे आहे असे म्हणता येईल.

    2) अनुभवप्रामाण्यवादी शास्त्र :

    समाजशास्त्रात सामाजिक संबंध, सामाजिक संघटना इत्यादींचे तात्विक स्वरूपाचे किंवा कल्पनाशक्तीवर आधारित असलेले विवेचन केले जात नाही. समाजसदस्यांच्या सामाजिक संबंधांचा अभ्यास करतांना आदर्श स्वरूपाचे सामाजिक संबंध कोणते? सामाजिक संबंधाचे स्वरूप कसे असावे? यांसारख्या प्रश्नांचे विवेचन करण्यामध्ये समाजशास्त्राच्या अभ्यासकाला रस नसतो. कारण अशा प्रकारच्या प्रश्नांची चर्चा कल्पनाशक्तीच्या आधारावर तसेच नैतिक दृष्टिकोनातून करता येते. समाजशास्त्राचे अभ्यासक सामाजिक संबंध, सामाजिक घटना इत्यादींचे अध्ययन करतांना पुरावा देता येईल अशा स्वरूपाची अनुभवप्रामाणित तथे संकलित करतांना. निरीक्षण मुलाखती, प्रश्नावली, इत्यादी साधनांद्वारे अभ्यासविषयाबाबतची माहिती एकत्रित करतात. या माहितीची सत्यता वारंवार तपासून पाहतात त्या आधारावर समाजशास्त्रीय तत्वे व सिद्धांत मांडतात. म्हणून समाजशास्त्र हे अनुभवप्रामाण्यवादी शास्त्र आहे.

    also read :