समाज कसा तयार होतो Samaj Kasa Tayar Hoto In Marathi
समाज कसा तयार होतो Samaj Kasa Tayar Hoto In Marathi : नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला समाज कसा तयार होतो याबद्द्ल संपूर्ण माहिती सांगणार आहे म्हणून पोस्ट पूर्ण वाचा आणि आवडल्यावर तुमच्या मित्रांना शेयर करायला विसरु नका धन्यवाद..

समाज कसा तयार होतो? Samaj Kasa Tayar Hoto In Marathi
स्त्री, पुरुष, मुले, मुली, वृद्ध, प्रौढ हे सर्व मिळून समाज तयार होत असतो.
समाजव्यवस्था :
भारतीय समाज हा गुंतागुंतीचा आहे. त्यात अनेक धर्म जातीचे लोक आहेतच. शिवाय ते विकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत. त्यांच्यात स्टार आहेत. अशा समाजात खालच्या स्तरावरील लोकांनी वर चढण्याची धडपड करणे स्वाभाविक म्हणावे लागेल. राज्यव्यवस्थेने विकासात त्यांना अग्रक्रम धावा अशी आग्रही मागणी होताना दिसते. राखीव जागा, सवलती, इत्यादी त्याचे व्यक्तरूप आहे. राजकीय सत्ता संपादन करून सामाजिक प्रगती करण्याचे या गटांचे प्रयत्न राज्यव्यवस्थेस सामावून घ्यावे लागतात.
विसाव्या शतकात भारतीय समाजास आधुनिकतेच्या प्रश्नांना तोंड द्यावे लागले आहे. त्यातून कुटुंबव्यवस्था ग्रामीण ग्रामीण पातळीवरील समाजव्यवस्था यांच्यात प्रचंड ताणतणाव निर्माण झाले आहेत. त्यातून एकीकडे पूर्वीचे उपेक्षित, वंचीत घटक (दलित, स्त्रिया) राज्यव्यवस्थेने त्यांच्या स्वातंत्र्यासाठी कायदे करावेत, योजना आखाव्यात अशी मागणी करताहेत. तर या आग्रहामुळे ज्यांच्या हितसंबंधास बाधा पोहोचते ते राज्यव्यवस्थेने परंपरा उचलून धराव्यात असा आग्रह धरत आहेत. व्यवस्था टिकून राहण्यासाठी या भूमिकांत समन्वय साधने, निदान होणारे बदल शांतमय मार्गाने, पेचप्रसंग निर्माण न होता घडून येतील असे मार्ग शोधणे राज्यव्यवस्थेस भाग आहे. त्या पार्शवभूमीवर स्त्रीमुक्त चळवळ, धर्मांतर, धार्मिक मूलतत्ववाद आणि त्यांना राज्यव्यवस्थेची प्रतिक्रिया या गोष्टी पाहाव्या लागतील.
सामाजिकीकरण :
समाजाचा सदस्य म्हणून जीवन जगण्यासाठी व्यक्तींमध्ये काही सामाजिक गन असणे आवश्यक ठरते. प्रेम, सहकार्य, राग, द्वेष, संघर्ष इत्यादी सामाजिक जीवनाशी संबंधित गुणांना सामाजिक गुण असे संबोधले जाते. या सामाजिक गुणांमुळेच एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी संबंध प्रस्थापित करू शकते. विशेष बाब म्हणजे हे सर्व सामाजिक गन उपजत किंवा अनुवांशिक स्वरूपाचे नाहीत. जन्मानंतर इतर व्यक्तींशी येणाऱ्या सामाजिक संपर्कातून अथवा संबंधातून प्रत्येक व्यक्ती कळत नकळत अनेक गोष्टी शिकते. मानव हा अन्य सजीव प्राण्यांपेक्षा काही वैष्ट्यांमुळे त्यांच्यापेक्षा वेगळा ठरतो. उदाहरणार्थ, अन्न , सजीव प्राणी भाषा बोलू शकत नाही. मनुष्य भाषा बोलतो, वाचतो व लिहितो. समाजामुळेच व्यक्तीला भाषा शिकण्याची क्षमता प्राप्त होते. सर्व सजीव प्राण्यांमध्ये केवळ मानवाजवळच भूत, वर्तमान व भवीष्य अशा तीनही काळाचा एकाच वेळेस विचार करण्याची क्षमता आहे. हि क्षमतादेखील समाजामुळेच मानवामध्ये निर्माण होते. अशा प्रकारे समाजात वाढल्यामुळे मानव किती गोष्टी शिकतो याची यादी तयार करतो म्हटले तर ती लांबलचक होईल. जन्मानंतर समाजात राहून कळत नकळत पणे विविध गोष्टी शिकण्याची प्रक्रिया म्हणजे सामाजिकीकरण होय.
हे देखील वाचा: