पुरातत्वीय साधनांमध्ये कोणत्या साधनांचा समावेश होतो?

नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला पुरातत्वीय साधनांमध्ये कोणत्या साधनांचा समावेश होतो याबद्दल माहिती सांगणार आहे म्हणून पोस्ट पूर्ण वाचा आणि आवडल्यावर तुमच्या मित्रांना शेयर करायला विसरु नका धन्यवाद..

पुरातत्वीय साधनांमध्ये कोणत्या साधनांचा समावेश होतो

इतिहासाची साधने प्रकार?

(१) प्रथम दर्जाची साधने

(२) दुय्य्म दर्जाची साधने

पुरातत्वीय साधनांमध्ये कोणत्या साधनांचा समावेश होतो?

पुरातत्वीय साधनांमध्ये लिखित साधनेभौतिक साधने यांचा समावेश होतो.

1.लिखित साधने

  • धार्मिक ग्रंथ स्थानमाहात्म्ये
  • चरित्रे, आत्मचरित्रे
  • कागदपत्रे शासकीय खाजगी पत्रव्यवहार
  • प्रवासवर्णने परकीय इतिवृत्तते
  • नाटक, कथा, कादंबरी
  • तवारिखा करीन कुळकरी, इत्यादी.

2.भौतिक साधने

  • दंतकथा (मौख्यिक)
  • शिलालेख, ताम्रपट
  • नाणी शिक्के धातूच्या वस्तू
  • स्थापत्य स्मारके
  • शिल्पावशेष मृणमय मूर्ती, दगडी वस्तू
  • मातीची खापरे, मातीची भांडी, विविद्ध धातूंची भांडी

इतिहासाच्या साधनांचे बदलते स्वरूप :

इतिहासाची साधने हि कालानुरूप सतत बदलत गेली आहेत. लक्षावधी वर्षांपूर्वीच्या रानटी अवस्थेतल्या माणसाजवळ दगडी, हत्यारे अवजारे आणि फार तर दगडी वाड्ग्याशिवाय काहीच नव्हते. साहजिकच इतिहासपूर्व काळातील मानवी जीवनाची वाटचाल शोधताना दगडी पुरावे आणि अस्थी अवशेष प्राप्त होतात. कालांतराने समाज संगठीत झाला.

सुसंस्कृत अश्या समाजजीवनाचे असंख्य पुरावे उत्खननातून उपलब्ध होऊ लागले. हडप्पा मोहन्जो दारो येथील उत्खननातून तर अगदी नेलपेंट आणि लिप्स्टिकसारख्या अत्याधुनिक सौंदर्यप्रसाधनांचीही उपलब्धी झाली. तात्पर्य, संपन्न समाजजीवनाचे पुरावे सापडू लागले. ताम्रपट, दिले गेले, शिलालेख कोरले गेले. नाणी प्रचारात आली. मूर्ती कोरल्या गेल्या. लेणी, मंदिरे, आकाराला आली. धर्मभक्तीबरोबर कलासक्तीचाही प्रभाव जाणवू लागला. प्राचीन कालखंडाच्या वाटचालीचा मग घेतांना आता वेगळ्या प्रकारचे पुरावे सापडू लागले. शिलालेख, ताम्रपट, शिल्प स्थापत्य अवशेष, नाणी या पुराव्यांना अनन्यसाधारण महत्व आले.

वाड्मयीन परंपरांतून इतिहास धुंडाळला जाऊ लागला. तालपत्रांचा शोध घेतला गेला. मध्ययुगात इतिहासाच्या साधनांचे स्वरूप बदलले. शिलालेख, ताम्रपट सापडत परंतु त्याचे प्रमाण कमी झाले. कारण कागद वापरात आला. हस्तलिखित कागदपत्रे हे इतिहासाचे प्रमुख स्थान बनले. मंदिर मठांच्या लादण्यांमधून हस्तलिखित ग्रंथ धुंडाळले गेले. जहागीरदार वतनदारांच्या दफतरखाण्यातील ऐतिहासिक कागदांतून आता इतिहास दडलेला होता. करीने शकवल्या, तवारिखा, सनदा या स्वरूपाचा पुरावा मराठ्यांच्या इतिहासासाठी सापडू लागला.

मोगल कालखंडात तवारिखा लिहिल्या गेल्या, चरित्रे आत्मचरित्रे लिहिले गेली. त्या स्वरूपात पुरावे सापडू लागले. युरोपीय व्यापाऱ्यांच्या वखारी स्थापन झाल्या. या वखारीतून कागदपत्रांचा वापर काढला. वखारींनी आपल्या मायदेशी पत्रव्यव्हार केला. स्थानिक सत्तांशी त्यांचे संबंध आले. या संबंधांची कागदपत्रे पुरावे म्हणून सापडू लागले. इंग्रज, डच, पोर्तुगीज, फ्रेंच या व्यापारी सत्तांच्या वखारीतून त्या त्या भाषेतील कागदपत्रे कार्यालयीन पद्धतीने फाईल होऊ लागली. मराठी दफतरखाण्यांतून मोडी लिपीतील कागद साचू लागला. त्याचबरोबर अरेबिक, पर्शियन आणि उर्दू कागदपत्रेही पुराव्याच्या स्वरूपात सापडू लागली. मध्ययुगीन इतिहासाची हि सर्व महत्वपूर्ण साधने, मोडी, अरेबिक, पर्शियन लिपीतली फ्रेंच इंग्रजी, पोर्तुगीज, डच भाषेतलीही. तत्कालीन इतिहासाचा शोध या पुराव्याआधारे घेतला गेला, नव्हे अजूनही घेतला जातोय. तात्पर्य मध्ययुगीन इतिहासाचे पुरावे प्रामुख्याने पुराभिलेखीय आहेत.

क्वचित पुरातत्वीय पुरावेही सापडतात. मध्ययुगीन काळासंदर्भात विशेष अशी ऊतखानने झाली नसली तरी मध्ययुगीन शस्त्रास्त्रे, चिलखते, ढाली, पोशाख, इतर वस्तू नाणी शिक्के यांसारखी पुरातत्वीय साधने आज अभ्यासकांसाठी वस्तुसंग्रहालयांतून उपलब्ध आहेत.

आधुनिक काळात इतिहासाच्या संसाधनांचे स्वरूप बदलले. प्रिंटिंग प्रेसचा वापर सुरु झाल्यामुळे वृत्तपत्रे निघाली. वृत्तपत्रे हे आधुनिक इतिहासाचे जरी दुय्य्म साधनासलें तरी ते आधुनिक इतिहासाचे महत्वाचे साधन ठरते. टंकलेखन यंत्राचा वापर सुरु झाल्यामुळे दफतरखाण्यांतून आता हस्तलिखित कागद्पत्रांबरोबर छापील टंकलिखित गॅजेट्स सापडू लागली आहेत. सनदांच्या जागी आता गव्हर्नमेंट नोटिफिकेशन आणि गॅजेट्सच्या स्वरूपातले पुरावे सापडू लागले आहेत. या पुराव्यांवरून आधुनिक इतिहास धुंडाळला जातो.

विसाव्या शतकात टेंपरेकॉर्डरचा वापर वाढल्यामुळे आता अनेक व्यक्तींच्या मुलाखती, व्याख्याने ध्वनिमुद्रित स्वरूपात पुरावा म्हणून उपलब्ध होऊ लागली आहेत. त्याचप्रमाणे कॅमेरा वापरात आल्यामुळे छायाचित्रांच्या स्वरूपात अत्यंत विश्वसनीय असा प्रथम दर्जाचा पुरावा आधुनिक काळात उपलब्ध होतोय. ध्वनिमुद्रित फिती, फोटो यांबरोबरच आता तर ऑडिओ व्हिजुअल फिल्मसही घटनांच्या अत्यंत काळजीपूर्वक नोंदी करताहेत. ध्वनिचित्रफिती या आधुनिक काळातील प्रथम दर्जाचा श्वसनीय पुरावा होत. शिलान्यास, पायाभरणी, उदघाटन या प्रसंगानिमित्त आजही शिलालेख कोरवले जातात पण त्याचबरोबर नवीन प्रकारचे साधनेही उपलब्ध होतात.

तात्पर्य कालानुरूप इतिहासाच्या साधनांचे स्वरूप बदलत राहते. नवनवीन प्रकारची साधने वापरात येत राहतात. जुनी इतिहासाची साधने काही प्रमाणात राहतात. आधुनिक काळातही ताम्रपट दिले जातात. पण ते प्राचीन काळातल्यासारखे दानपत्र म्हणून न्हे तर गौरवपत्र म्हणून. स्वातंत्र्य सैनिकांना असे ताम्रपट दिले गेलेत. भविष्यात हि ताम्रपत्रे इतिहासाचे साधनच ठरणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *