पॉलिटिकल सायन्स म्हणजे काय? Political Science Meaning In Marathi | Political Science In Marathi

पॉलिटिकल सायन्स म्हणजे काय? Political Science Meaning In MarathiPolitical Science In Marathi : नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला राज्यशास्त्रा बद्द्ल संपूर्ण माहिती सांगणार आहे म्हणून पोस्ट पूर्ण वाचा आणि आवडल्यावर तुमच्या मित्रांना शेयर करायला विसरु नका धन्यवाद..

राज्यशास्त्र म्हणजे काय? Political Science Meaning In Marathi | Political Science In Marathi
Political Science In Marathi

Political Science Meaning In Marathi

Political Science चा मराठीत अर्थ “राज्यशास्त्र” असा होतो.

पॉलिटिकल सायन्स म्हणजे काय? What is Political Science In Marathi

एका अर्थाने राज्यसंस्थेच्या वेगवेगळ्या बाजूंचा केलेला पद्धतशीर अभ्यास याला राज्यशास्त्र म्हणता येईल. परंतु हा अभ्यास केवळ त्या संस्थेचा नाही तर तिच्याशी संबंधित व्यक्तीच्या वर्तनाचा आहे. राज्याच्या मध्यवर्ती संकल्पनेच्या अनुषंगाने व्यक्तीचे जे वर्तन होते त्याचा अभ्यास प्रामुख्याने या विषयात केला जातो.

राज्यशास्त्रातील प्रमुख संकल्पना :

१) राज्य : राज्य हि राज्यशास्त्रातील मध्यवर्ती संकल्पना आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. बळाचा वैध वापर करण्याचा एकाधिकार असणारी संथा या अर्थाने हि संथा प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. तिचे बाह्य स्वरूप बदलत गेले तरी समाजात कोणत्या ना कोणत्या रूपात वरील वैशिष्ट्य असणारी संथा नेहमीच राहत आली आहे. जगण्यासाठी माणसाला राज्य या संस्थेची गरज भासते, कारण जगात जे नीतिमान आहे त्याच्या मागे राज्य आपले बळ उभे करते. त्याला पाठबळ देते असे ऍरिस्टोटल म्हणतो. प्राचीन भारतात कौटिल्याने राज्याची सात अंगे वर्णिली आहेत. स्वामी, अमात्य, जनपद, दुर्ग, कोष, दंड आणि मित्र हि ती सात अंगे होत. पाश्च्यात्य राजकीय विचारात राज्याची चार अंगे विशद केली आहेत. सुनिश्चित भूप्रदेश त्यात राहणारी लोकसंख्या त्या लोकांचे संघटितपणे नियंत्रण करणारी शासनव्यवस्था आणि सार्वभौमत्व हि ती चार अंगे होत. राज्याच्या पाश्चात्य व भारतीय संकल्पनांत तसा फारसा फरक दिसत नाही.

राज्य हि सामाजिक संथा आहे. माणसांच्या सुखी जीवनासाठी तिची निर्मिती झाली आहे. तेव्हा एखाद्या निर्जन प्रदेशास राज्य मानता येणार नाही. अंटार्टिका खंड हे राज्य नाही. कारण तेथे मनुष्य वस्ती नाही. राज्यस्थापनेसाठी किती लोकसंख्या हवी हे सांगता येणार नाही. जगात नेपाळ, भूतान यांसारख्या लहान राज्ये आहेत तशी चीन, भारत यांसारख्या प्रचंड लोकसंखेची देखील आहे. हि लोकसंख्या एखाद्या सुनिच्छित भूभागावर कायम वस्ती केलेली हवी. भटक्या सारखे स्थलांतर करणाऱ्या लोकांचे राज्य होत नाही. त्यांची वस्ती असलेल्या प्रदेशाच्या सीमा निच्छित हव्यात. तेव्हा राज्यासाठी भूप्रदेश संकल्पनेतील दुर्ग व जनपद या घटकांत त्यांचा निर्देश होतो.

२) राष्ट्र, राष्ट्रक व राष्ट्रवाद : आजकाल सर्वसाधारण व्यवहारात राज्य व राष्ट्र या समान अर्थी संज्ञा म्हणून वापरल्या जातात. त्यांत फरक केला जात नाही. बारकाईने विचार केला तर राज्य हि कायद्याची संज्ञा आहे तर राष्ट्र हि राजकीय संज्ञा आहे. एक वस्तुनिष्ठ आहे तर दुसरी आत्मनिष्ठ. प्रत्येक राज्य हे राष्ट्र असतेच असे नाही.

जेव्हा एख्याद्या समूहातील लोकांत त्यांच्यातील समान धर्मामुळे, भाषेमुळे, वंशामुळे, ऐतिहासिक परंपरांमुळे व इतर कोणत्याही घटकांमुळे एकत्वाची भावना जागृत होते. आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत असे वाटू लागते. आणि आपले वेगळे स्वतंत्र राज्य असावे असे वाटू लागते. तेव्हा त्यांच्यात राष्ट्रभावना निर्माण होते असे म्हणता येईल. त्यांचे वेगळे राज्य थापन झाले तर त्यास राष्ट्र हि संज्ञा देणे योग्य होईल.

३) स्वातंत्र्य, हक्क व कर्तव्ये : एकीकडे राष्ट्रवादाच्या प्रेरणेने राज्याची सत्ता वाढत असतानाच दुसरीकडे राजाच्या एकाधिकाराविरुद्ध अरेरावी कारभाराविरुद्ध झगडा सुरु झाला होता. इंग्लंडमध्ये हा संघर्ष बराच आधी राजा विरुद्ध सरकार असा सुरु झाला. सरदारांनी राजावर दबाव आणून लोकांच्या हक्काची एक सनद १२१५ मध्ये मिळविली. पुढे सतराव्या शतकात या संघर्षाने उग्र रूप धारण केले. त्यात व्यापारी वर्गाने सरदारांची साथ केली. आणि पहिल्या चाल्स राज्याला पदच्युत केले. त्यानंतर नव्या राज्याकडून त्यांनी नागरी हक्काचा करार करून घेतला.

राज्यशास्त्राची व्याप्ती :

सुरुवातीस कायदे कसे असावेत, राजसंथा कशी असावी या धर्तीचे तात्विक विवेचन केले जाई. त्यातून राज्यशास्त्राची आदर्श भूमिका मांडली जाई. मानवी व्यवहारा संबंधित काही गोष्टी गृहीत धरल्या जात. आणि त्या आधारे राजकीय संकल्पनांचे विवेचन केले जाई. त्याला अनुसरून अनेक राजकीय विचारप्रणाली विकसित झाल्या. या सर्व विवेचनास राजकीय तत्वज्ञान अस म्हणता येईल.

जसे अर्थशास्त्राचा मुख्य अभ्यासविषय संपत्ती आहे किंवा मानसशास्त्राचा मानवी मन तसे राज्यशास्त्राच्या गाभ्याचा विषय सत्ता हा आहे. देशांतर्गत सत्ता मिळवू पाहणाऱ्या ती वापरणाऱ्या ज्या संथ आहेत त्यांचा व त्यांच्याशी संबंधित मानवी व्यवहारांचा अभ्यास राज्यव्यवस्था या विभागात केला जातो. शासनसंथा आणि तिचे भाग, राजकीय पक्ष गट, राजकीय चळवळी यांसारखे विषय त्यात येतात. त्यातील शासनाच्या धोरणाची अंमलबजावणी करणारी यंत्रणा, तिची रचना आणि व्यवहार यांचा बारकाईने खास अभयस केला जातो. त्या भागास राजकीय प्रशासन म्हटले जाते. शासकीय संथांचे व्यवस्थापन, त्यातील निर्णयप्रक्रिया, निर्णयाची कार्यश्रम अंमलबजावणी यांचा खास करून या भागात समावेश होतो. जगातील देशांचे परस्परांतील राजकीय व्यवहार हे सत्ता या घटकाभोवती फिरत असतात. त्यातूनच युद्ध शांतता, मैत्रीचे करार, इत्यादी प्रकारचे राष्ट्रांतील संबंध निर्माण होतात. राष्ट्राराष्ट्रांतील स्पर्धा व सहकार्य यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय कायद्याची व घटनांची निर्मिती होते. या सर्वांचा अभ्यास आंतरराष्ट्रीय संबंध या विभागात केला जातो. तेव्हा राज्यशास्त्राचे वरील चार प्रमुख विभाग मॅनटा येतील.

also read :

FAQ

[sc_fs_faq html=”true” headline=”h3″ img=”” question=”Political Science Meaning In Marathi?” img_alt=”” css_class=””] Political Science चा मराठीत अर्थ “राज्यशास्त्र” असा होतो. [/sc_fs_faq] [sc_fs_faq html=”true” headline=”h3″ img=”” question=”राज्यशास्त्र म्हणजे काय? What is Political Science In Marathi” img_alt=”” css_class=””] एका अर्थाने राज्यसंस्थेच्या वेगवेगळ्या बाजूंचा केलेला पद्धतशीर अभ्यास याला राज्यशास्त्र म्हणता येईल. [/sc_fs_faq]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *