पीएफ कसा काढायचा – EPF Withdrawal Rules in Marathi

पीएफ कसा काढायचा PF Kasa Kadava – EPF Withdrawal Rules in Marathi, EPFO चे पैसे काढने आता भरपूर सोपे झाले आहे. नमस्कार, आज आपन जाणून घेणार आहोत ईपीएफ चे पैसे ऑनलाइन कसे काढायचे.

पीएफ कसा काढायचा - EPF Withdrawal Rules in Marathi

PF Withdrawal Rules in Marathi पीएफ काढायचे नियम

  • पीएफ काढण्यासाठी तुमच्या खात्याची KYC झालेली पाहिजे.
  • आपले नाव जन्म तारीख आधार कार्डावर जसे आहे तसे पीएफ खात्यात मॅच झाले पाहिजे.
  • तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असने गरजेचे आहे कारण पीएफ काढताना त्यावर ओटीपी येतो.
  • तुमच्या पीएफ खात्याला बँक एकाउंट लिंक असणे गरजेचे आहे त्याच्यातच तुमचे पीएफ चे पैसे येतात.

PF Kasa Kadava पीएफ कसा काढायचा?

सगळ्यात आधी तुम्हाला गूगल क्रोम किंवा मोझीला फायरफॉक्स ब्राउजर मधे EPFO सर्च करायचे आहे. तुमच्या समोर ईपीएफओ ची ऑफिशीयल वेबसाइट ओपन होईल खाली स्क्रीनशॉट मधे पाहू शकता.

PF Kasa Kadava पीएफ कसा कढायचा?

त्यानंतर तुम्हाला Online Claims Member Account Transfer या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. आणि आपला UNA पासवर्ड टाकल्या नंतर कॅपचा भरून लॉग इन करायचे आहे.

पीएफ कसा काढायचा - EPF Withdrawal Rules in Marathi

लॉगइन झाल्यानंतर तुमच्या समोर उजव्या बाजूला तुमची प्रोफाइल दिसेल ज्यात तुमचा UNA, नाव, जन्म तारीख, बँक एकाउंट, मोबाइल नं आणि आधार कार्ड वेरीफाय आहे की नाही हे दिसेल.

तुम्हाला डाव्या बाजूला वरती काही ऑप्शन्स दिसतील Home, View, Manage, Account, Online Services तुम्हाला पीएफ काढण्यासाठी Online Services वर कर्सर नेल्यानंतर CLAIM (FORM-31,19,10C&10D) वर क्लिक करायचे आहे.

पीएफ कसा काढायचा - EPF Withdrawal Rules in Marathi

तुमच्या समोर एक नवीन वेब पेज खुलेल तुम्हाला तुमचा पूर्ण बँक एकाउंट नंबर टाकायचा आहे जो तुम्ही पीएफ खात्याला लिंक केलेला आहे. टाकल्या नंतर Verify बटनावर क्लिक करायचे आहे. Verify बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर खाली एक नवीन ऑप्शन दिसेल Proceed For Online Claim यावर क्लिक करायचे आहे.

PF Withdrawal Rules in Marathi

तुमच्या समोर नवीन पेज ओपन होईल इथे तुम्हाला PF ADVANCE (FORM-31) हे ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे. हे ऑप्शन सिलेक्ट करताच खाली काही अजून ऑप्शन्स ओपन होतील त्यात तुम्हाला तुमची माहीती भरायची आहे जसे पीएफ काढण्याचे कारण, किती पीएफ कढायचा आहे, तुमचा पत्ता.

PF Kasa Kadava

PF Kasa Kadava

नंतर तुम्हाला Choose File या ऑप्शन वर क्लिक करून चेक/ किंवा बँकीच्या पासबुकचा फोटो अपलोड करायचा आहे त्या फोटो ची साइज 500 KB पेक्षा कमी असावी आणि फोटो JPG किंवा JPEG फॉरमॅट मधे असावा. खाली चेक मार्क वर क्लिक करायचे आहे चेक मार्क वर क्लिक केल्यानंतर Get Aadhar OTP हा ऑप्शन खुलेल या वर क्लिक करायचे आहे. मग तुमच्या आधार कार्ड ला लिंक असलेल्या मोबाइल नंबर वर एक ओटीपी येईल तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. Otp टाकल्या नंतर तुमचा पीएफ 10 ते 15 दिवसात तुमच्या बँक एकाउंट मधे जमा होईल. धन्यवाद..

SEO म्हणजे काय? | Business Ideas in Marathi

1 thought on “पीएफ कसा काढायचा – EPF Withdrawal Rules in Marathi”

Leave a Comment

x