इंटरनेट बँकिंगची माहिती Net Banking Information In Marathi

इंटरनेट बँकिंगची माहिती Net Banking Information In Marathi नमस्कार आज आपन या पोस्ट मध्ये इंटरनेट बँकिंग बद्दल सर्व माहीती जाणून घेणार आहोत इंटरनेट बँकिंग म्हणजे काय? इंटरनेट बँकिंग चे कोन कोणते फायदे आहेत आणि इंटरनेट बँकिंग कशी सुरु करावी.

इंटरनेट बँकिंगची माहिती Net Banking Information In Marathi

इंटरनेट बँकिंग म्हणजे काय?

Internet Banking सर्व लोकांना बँके कडून दिली जाणारी एक सुविधा आहे. जिचा उपयोग करून आपन आपल्या बँकेच्या खात्याला इंटरनेट ने कुठूनही एक्सेस करू शकतो.

इंटरनेट बँकिंग चे फायदे

  • इंटरनेट बँकिंग द्वारे तुम्ही तुमच्या बँकेच्या खात्यातील बॅलेन्स चेक करू शकता आणि तुमचे सगळे ट्रांसेक्शन जसे तुम्ही कुठे पैसे खर्च केले आणि तुम्हाला कुठून पैसे मिळाले हे सगळ तुम्ही यात बघू शकता. इंटरनेट बँकिंग मध्ये तुम्ही जुने आणि नवीन ट्रांसेक्शन बघू शकतात.
  • इंटरनेट बँकिंग च्या मदतीने तुम्ही घर बसल्या ऑनलाइन शॉपिंग करू शकता. काहीही खरेदी करू शकता आणि खरेदी केलेल्या वस्तुचे ऑनलाइन पेमेंट इंटरनेट बँकिंग ने करू शकता.
  • इंटरनेट बँकिंग च्या मदतीने तुम्ही तुमच्या एकाउंट मधून तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना ऑनलाइन पैसे ट्रांसफर करू शकता.
  • इंटरनेट बँकिंग च्या मदतीने तुम्ही ऑनलाइन मोबाईल रिचार्ज करू शकता आणि टेलीफोन बिल, पाण्याचे बिल, लाइट बिल भरु शकता.
  • इंटरनेट बँकिंग ने तुम्ही ऑनलाइन एटीम, चेक बुक, पासबुक साठी अप्लाई करू शकता.
  • इंटरनेट बँकिंग च्या मदतीने तुम्ही ऑनलाइन रेल्वे, बस, चित्रपटाचे टिकीट बुक करू शकता.
  • इंटरनेट बँकिंग च्या मदतीने आपन इतर प्रकार चे खाते ही ओपन करू शकतो जसे एफ डी (फिक्स्ड डिपॉजिट) आर डी (रेकरिंग डिपॉजिट) इत्यादी.
  • इंटरनेट बँकिंग च्या मदतीने आपल्या खात्यात मोबाईल नंबर, ईमेल आयडी बदलू शकतो.
  • इंटरनेट बँकिंग च्या मदतीने टॅक्स पन जमा करू शकतो.

इंटरनेट बँकिंग कशी सुरु करावी?

इंटरनेट बँकिंग सुरु करण्यासाठी आधी इंटरनेट बँकिंग ला एक्टिवेट करावे लागते. तुम्ही ह्या सुविधेला घरी बसून ऑनलाईन सुद्धा एक्टिवेट करू शकता. त्यासाठी बँकेचे काही नियम असतात जसे तुमच्या कडे एटीम कार्ड असले पाहिजे आणि तुमचा मोबाईल नंबर बँक खात्याला लिंक असने गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊया इंटरनेट बँकिंग कशी सुरु करावी.

इंटरनेट बँकिंग ला रजिस्टर करण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमच्या बँकेच्या ऑफिशीयल वेबसाइट वर जावे लागेल.

त्यानंतर Personal Banking ला सिलेक्ट करून लॉगइन बटनावर क्लिक करावे त्यानंतर New User बटनावर क्लिक करावे.

आता New User Registration Option ला सिलेक्ट करा.

एक नवीन वेब पेज ओपन होईल, तुम्ही तुमचे पासबुक जवळ ठेवावे तुम्हाला तुमच्या खात्या संबंधित माहीती भरावी लागेल.

जसे की तुमचा एकाउंट नंबर, सीआयएफ नंबर, मोबाइल नंबर, ब्रांच कोड.

Facility Required (Full Transaction Rights) या ऑप्शन ला सिलेक्ट करावे.

कॅपचा कोड भरावा आणि Submit बटनावर क्लिक करावे.

आता तुम्हाला तुमच्या रजिस्टर असलेल्या मोबाइल नंबर वर एक OTP येईल त्या ओटीपी ला एका नवीन पेज मधे तुम्हाला टाकायचा आहे आणि Confirm बटनावर क्लिक करायचे आहे.

एक नवीन वेब पेज ओपन होईल ज्यात तुम्हाला दोन ऑप्शन्स दिसतील जर तुमच्या कडे एटीम कार्ड आहे तर पहिल्या ऑप्शन ला सिलेक्ट करा, आणि जर नसेल तर I Don’t Have ATM CARD ला सेलेक्ट करा.

लक्षात ठेवा जर तुमच्या कडे एटीम कार्ड नसेल तर तुम्हाला इंटरनेट बँकिंग ला तुमच्या बँकेत जाऊन एक्टिवेट करावे लागेल.

आता तुम्हाला तुमचा एटीम कार्ड चा नंबर आणि सीवीवी भरावा लागेल.

त्यानंतर तुम्हाला तुमचा यूजरनेम बघायला मिळेल तुम्हाला एक पासवर्ड तयार करावा लागेल. ज्याने तुम्ही इंटरनेट बँकिंग ला लॉगइन करू शकाल.

इंटरनेट बँकिंग वापरतांना ह्या गोष्टीचे लक्ष ठेवावे

इंटरनेट बँकिंग चा वापर साइबर कॅफे इत्यादी जागेवर करू नये कारण तुमची माहीती लीक होउ शकते.

ज्या डिवाइस मधे तुम्ही इंटरनेट बँकिंग वापरता त्यात एक चांगला एंटीवायरस नक्की इंस्टॉल करा. म्हणजे वायरस आणि मालवेयर पासून तुमचे डिवाइस सुरक्षित राहिल आणि एकाउंट ची माहीती पन हॅक होणार नाही.

इंटरनेट बँकिंग वापरतांना कोणत्याही प्रकारची समस्या आली की तुमच्या बँकेशी संपर्क करा.

तुमच्या इंटरनेट बँकिंग चा पासवर्ड कोणालाही सांगू नका.

also read:

Rate this post

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *