पोलीस भरती अभ्यासक्रम | Maharashtra Police Bharti Syllabus In Marathi
पोलीस भरती अभ्यासक्रम | Maharashtra Police Bharti Syllabus (Abhyaskram) In Marathi, महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षेसाठी खालीलप्रमाणे अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला आहे.

पोलीस भरती अभ्यासक्रम | Maharashtra Police Bharti Syllabus (Abhyaskram) In Marathi
अ) सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
ब) मराठी भाषेचे व्याकरण
क) अंकगणित
ड) बुद्धिमत्ता चाचण्या
वरील अभ्यासक्रमानुसार एकच प्रश्नपत्रिका असेल. एकून प्रश्न : 100, एकून गुण 100, वेळ : 90 मिनिटे.
या परिक्षेच्या अभ्यासाविषयी थोडक्यात टिप्स पुढील प्रमाणे ―
महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल या विषयाचा अभ्यास पुढीलप्रमाणे करावा.
राज्य व देशाचे प्राकृतिक विभाग व त्याअंतर्गत पर्वतप्रणाली : सह्याद्री, कोकण किनारपट्टी, दख्खन पठार, हिमालयीन पर्वत प्रदेश, उत्तर भारतीय मैदान, किनारी मैदानी प्रदेश.
नदीप्रणाली : गंगा, ब्रम्हपुत्रा, सिंधू, यमुना या भारतीय नद्या व त्यांच्या उपनद्या गोदावरी, भीमा, कृष्णा, या महाराष्ट्र पठारावरील नद्या व त्यांच्या उपनद्या त्यांवरील धरणे, नद्यांचा संगम, प्रमुख नद्यांवरील शहरे व तिर्थक्षेत्रे तोंडपाठ करावीत.
भारत व महाराष्ट्रातील सर्व उंच शिखरे, धबधबे, अभयारन्ये, राष्ट्रीय उद्याने यांची यादी पाठ करण्याचा प्रयत्न करावा.
आर्थिक भूगोलात खनिजसंपत्ती, विविध उद्योगधंदे, ( वस्त्रोउद्योग, साखर उद्योग, लोह पोलाद उद्योग इत्यादी ) लघुउद्योग, दळणवळण ( राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे, हवाई मार्ग, जलमार्ग, बंदरे ) यांची यादी अभ्यासावी.
भारतातील प्रमुख संस्कृतिक संथा, नृत्यप्रकार, वादये व वादक यांची यादी अभ्यासावी.
संरक्षणदलाची रचना तसेच महाराष्ट्र पोलीस दलाची रचना अभ्यासावी.
जागतिक भूगोल : प्रमुख नैसर्गिक प्रदेश ( विषुववृत्तीय, सुदानी, मान्सून, उष्ण वाळवंटीय, भूमध्य सागरी, प्रेअरी, तैगा, टुंड्रा प्रदेश ) जगातील प्रमुख देश, त्यांच्या राजधाण्या, चलने, संसदगृहे, प्रमुख जागतिक आर्थिक संघटना, त्यांची स्थापणा वर्षे व सदस्य संख्या ; संयुक्त राष्ट्र संघटना (युनो) पृथ्वी, चंद्र, सूर्य, सूर्यमालेतील प्रमुख ग्रह व त्यांचे उपग्रह, नैसर्गिक आपत्ती ( भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी ), ग्रहणे.
महाराष्ट्राचा व भारताचा आधुनिक इतिहास : 1857 ते 1947. 1857 चा उठाव, राष्ट्रीय सभा, मवाळ कालखंड व त्यमधील नेते (दादाभाई नौरोजी, न्या. रानडे, नाम गोखले इत्यादी.) ; जहाल कालखंड, गांधी युग : महात्मा गांधीजी यांच्या जीवनातील महत्वपूर्ण घटना – जलियनवाला बाग, खिलाफत, असहकार, सविनय कायदेभंग, गोलमेज परिषदा, छोडो भारत चळवळ, क्रांतिकारी चळवळ, 1909, 1919, 1935 चे कायदे इत्यादी.
समाजसुधारक : राजश्री छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गो. ग. आगरकर, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केलेल्या सामाजिक सुधारणा प्रामुख्याने अभ्यासाव्यात.
भारतीय राज्यघटना : सरनामा, प्रमुख कलमे, प्रमुख घटना दुरुस्ती, संसद, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्य विधिमंडळ, मुख्यमंत्री, राज्यपाल, सर्वोच्च व उच्च न्यायालये, नियुक्त्या, राजीनामे यांवीषयी सर्व माहीती अभ्यासावी.
पंचायत राज : ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका व या सर्व संथांचे अधिकारी व पदाधिकारी.
महसूल प्रशासन : कोतवाल, तलाठी, तहसीलदार, उपजिलाधिकारी, जिल्हाधिकारी.
पोलीस प्रशासन : आयुक्तालये, परिक्षेत्रे, मुख्यालये व त्यांचे अधिकारी.
अर्थशास्त्र : पंचवार्षिक योजना, नीती आयोग, वित्त आयोग, खर्च आयोग, वेतन आयोग, कररचना, विविध समित्या, दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या यांचा अभ्यास करावा.
सामान्य विज्ञान : आरोग्यशास्त्र (रोग व आहारशास्त्र) या घटकात विविध रोग, त्यांचे कारक (जीवाणू-विषाणू) इत्यादींची माहीती अभ्यासा.
वनस्पतींचे वर्गीकरण, वनस्पती पेशी, प्रमुख वनस्पती प्रकारांचा अभ्यास करावा.
प्राणीशास्त्र या घटकात प्राण्यांचे वर्गीकरण, प्राणी पेशी, ऊती व प्रमुख प्राणीसृष्टीचा अभ्यास करावा.
भौतिकशास्त्र : सदिश, आदिश, प्रकाश, विद्युत, चुंबकत्व, उष्णता, ध्वनी, जैवतंत्रज्ञान, विविध भौतिक राषींची एकके यांची माहीती अभ्यासावी.
रसायनशास्त्र : आवर्तसारणी, विविध क्षार व त्यांची रेणूसुत्रे, काच उद्योग, आगकाडी उद्योग, साबन व अपमार्जके, उत्प्रेरके, किरनोत्सारी समस्थानिके यांचा अभ्यास करावा.
राष्ट्रीय अंतरराष्ट्रीय चालू घडामोडी : पुरस्कार, क्रीडा स्पर्धा, सौंदर्य स्पर्धा, चर्चेतील व्यक्ति, नवीननियुक्त्या, समित्या, परिषदा, अवकाश संशोधन, उपग्रह, क्षेपनास्त्रे, महोत्सवी वर्षे, घोषित वर्षे, महत्वाच्या व्यक्तीनचे निधन, जन्मशताब्दी इत्यादी.
पुरुष व् महिला उमेदवारांसाठी शारीरिक चाचणी व त्यासाठी देण्यात येणारे गुण पुढीलप्रमाणे –
मुले 1600 मी. सलग न थांबता धावणे (एकूण | मुली 800 मी.सलग न थांबता धावणे (एकूण गुण : 25 ) |
वेळ (मिनिटे) गुण | वेळ (मिनिटे) गुण |
4.50 मिनिटाच्या आत 20 | 2.40 मिनीटाच्या आत 25 |
4.50 ते 5.10 मिनिटे 18 | 2.40 ते 3.00 मिनिटे 22 |
5.10 ते 5.30 मिनिटे 16 | 3.00 ते 3.20 मिनिटे 18 |
5.30 ते 5.50 मिनिटे 14 | 3.20 ते 3.40 मिनिटे 14 |
5.50 ते 6.10 मिनिटे 12 | 3.40 ते 4.00 मिनिटे 10 |
6.10 ते 6.30 मिनिटे 10 | 4.00 ते 4.20 मिनिटे 6 |
6.30 ते 6.50 मिनिटे 8 | 4.20 ते 4.40 मिनिटे 4 |
6.50 ते 7.10 मिनिटे 6 | 4.40 ते 5.00 मिनिटे 2 |
7.10 मिनीटांच्या पुढे 0 | 5.00 मिनिटाच्या पुढे 0 |
Tags: महाराष्ट्र पोलीस भरती अभ्यासक्रम, Maharashtra Police Bharti Syllabus In Marathi, Maharashtra Police Bharti Abhyaskram Marathi, महाराष्ट्र पोलीस शिपाई अभ्यासक्रम.
One Comment