लांडग्याची आणि बकरीची गोष्ट Landgyachi Ani Bakri Chi Goshta

लांडग्याची आणि बकरीची गोष्ट Landgyachi Ani Bakri Chi Goshta लांडगा आणि शेळी गोष्ट | नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला लांडगा आणि शेळी ची गोष्ट सांगणार आहे म्हणून पोस्ट पूर्ण वाचा आणि आवडल्यावर तुमच्या मित्रांना शेयर करायला विसरु नका धन्यवाद..

Landga Ani Bakri Chi Goshta Marathi 1
लबाड कोल्ह्याची गोष्ट

लांडग्याची आणि बकरीची गोष्ट Landgyachi Ani Bakri Chi Goshta

जंगलाच्या बाहेर एका झोपडीत एक बकरी आणि तिचे सात छोटे छोटे गोड्स पिल्ल राहत होती बकरीच आपल्या पिल्लांवर खूप प्रेम होत आणि ती त्यांच पालन पोषण काळजीपूर्वक करत होती.

बकरीला गवत आणायला अन्न आणायला बाहेर जावा लागायच आणि त्यावेळेला घरात पिल्ल एकटीच असायची बकरीला माहित होत की जंगलात लबाड लांडगे राहतात आणि त्यांचा डोळा तिच्या पिल्लांवर आहे.

त्यामूळे ती त्यांना कायम सावध करायची एकदा अशीच बकरी फळ आणि गवत आणायला बाहेर निघाली होती तेव्हा तिने मुलांना बोलावले आणि म्हणाली हे बघा मुलांनो मी बाहेर चालली आहे तुम्ही सगळे इथेच थांबा आणि दार निट लावून घ्या आणि अनोळखी कोणालाही दार उघडू नका कळल.

पिल्ल म्हणतात : हो ठीक आहे आई पण आम्ही तुला ओळखणार तरी कस आम्हाला कस कळणार की दाराच्या बाहेर तु आहेस.

बकरी : मी हे गान म्हणेल दार उघड़ा बाळांनो तुमची आई आली तुमच्यासाठी छान छान खाऊ घेऊन आली जेव्हा मी हे गान ऐकाल तेव्हाच दार उघड़ा ठीके.

पिल्ल : हो ठीके आई आम्हाला कळल.

बकरीने आपली टोकरी उचलली आणि ती निघाली पण एक लबाड लांडगा बकरी आणि तिच्या पिल्लांच बोलण लपून गपचूप ऐकत होता.

लांडगा : ओहोहो ह्यांच गुपीत मला कळलय आजतर माझी मेजवाणीचय.

लांडगा पळत पळत बकरीच्या घराजवळ गेला आपल्या भसाड्या आवाजात गाण म्हणायला लागला दार उघडा बाळांनो तुमची आई आली तुमच्या साठी छान खाऊ घेऊन आली.

पिल्ल : अरे आई आली वाटत चला आपण दार उघडूया बकरीच दुसर पिल्लू म्हणत पण आई इतक्या लवकर कशी आली बकरीच तिसर पिल्लू म्हणत दरवाजा उघडा आईने छान जेवण आणल असेल तितक्यात दुसर पिल्लू म्हणत थांबा दरवाजा नका उघडू हा आवाज मला आपल्या नाई वाटत.

आपल्या आईचा आवाज तर खूपच गोड आहे आणि हा आवाज त एका बेडक्या सारखा आहे. सगळे पिल्ल हसू लागले लगेच चौथं पिल्लू म्हणत दुसऱ्या पिल्लाला हो खरच छोटू ही आपली आई नाही मग सगळेच पिल्ल म्हणायला लागता हो आपली आई नाही.

बकरीच एक पिल्लू दरवाजा जवळ जाऊन म्हणत चालता हो इथून तू आमची आई नक्कीच नाहीस.

बाहेर उभा असलेला लांडगा वैतागला आणि म्हणाला अरे बाळा मीच तुझी आईये उघड दरवाजा. पिल्ल : नाही नाही तू आमची आई असूच शकत नाही आमच्या आईचा आवाज तर गोड आहे. आणि तुझा आवाज बेडका सारखाय चालता होय इथून.

लांडग्याला कळून चुकल पिल्लं काही सहजपणे हातात येणार नाही. मग त्यानी विचार करायला सुरुवात केली. अरे यांना तर समजल माझा आवाज पण ना काय करू आयडीया मी आता मधच खाऊन येतो.

लांडग्याला वाटलं मध प्यायल्यामुळे त्याचाही आवाज बकरीसारखा गोड होईल त्याने जंगलात मधमाशांच एक पोळ शोधल आणि त्यातला त्यानी मध प्यायला आणि परत बकरीच्या घरापाशी येऊन त्याने दार वाजवल आणि बकरी सारखा आवाज काढण्याचा खूप प्रयत्न केला दार उघडा बाळांनो तुमची आई आली तुमच्या साठी छान खाऊ घेऊन आली.

बकरीच एक पिल्लू म्हणत अस वाटतंय आई आलीय दुसर पिल्लू हो हो आवाज पण आईसारखाच गोड आहे तिसर पिल्लू चला आपण दार उघडूया आईने मस्त खायला आणल असेल नंतर एक पिल्लू म्हणत थांब आधी मला खात्री करून घेउदे बाहेर आई का दुसर कोणी.

ते पिल्लू दरवाजा जवळ गेल आणि डोकावून पाहू लागल तर त्याला काळे पाय दिसले मग ते म्हणाल ही आपली आई नाहीये तिचे पाय तर गोरेपान आहेत आणि हे पाय तर काळे कुट्टयेत ही आपली आई नाही नका उघडू दार.

ते छोट पिल्लू दरवाजा जवळ गेल आणि म्हणाल तु आमची आई नाहीयेस तुझे पाय तर काळे आहे आणि आमच्या आईचे पाय तर गोरे आहेत चालता हो इथून बाकीचे पिल्ल पण म्हणाले तू आमची आई नाहीयेस निघ इथून.

लांडगा आता जाम वैतागला आणि म्हणाला ही पिल्लतर खूपच हुशार निघाली असं म्हणत तो गावातल्या गिरणी मध्ये गेला दुपारची वेळ होती गिरणीवाला आरामात झोपला होता.

लांडग्याने हळूच त्यापिठाच्या पोत्यात आपले पाय बुडवले आता त्याचे पाय बकरीसारखेच पांढरे झाले होते.

लांडगा परत बकरीच्या घरी गेला आणि दरवाज्या समोर उभा राहून गाऊ लागला दार उघडा बाळांनो तुमची आई आली तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन आली.

पिल्ल: आता मात्र आईच असणार आवाजपण किती गोड आहे तेवढ्यात दुसऱ्या पिल्लाने फटीतून बघितल तेव्हा त्याला त्याला पांढरे पाय दिसले आणि तो दुसऱ्या पिल्लांना म्हणाला पायतर गोरेपान आहेत दुसरे पिल्ल म्हणतात चला ना दार उघडूया आईने मस्त खायला आणलं असेल चला चला.

एक पिल्लू म्हणत नाही नाही नका उघडू दार ती आई नाही दुसर कोणतरी आहे पण बाकी पिल्लांनी त्या छोट्या पिल्लाचं अजिबात ऐकल नाही आणि दार उघडल दार उघडताच लांडगा घरात आला आणि म्हणाला मीच आहे तुमची आई आणि मी तुम्हाला खाऊ द्यायला नाही तुम्हालाच खायला आलोय.

बकरीचे पिल्ल लांडग्याला पाहून खूप घाबरली आरडा ओरड सुरु झाली पिल्ले इकडे तिकडे पळू लागली लांडग्या पासून लपू लागली कोणी पडद्याच्या माग लपल तर कोणी पलंगाखाली एक पिल्लू कपाटात लपल आणि दोन पिल्ल मोठ्या टोकरीच्या खाली लपली आणि एक घाबरून तसच उभ राहील.

लांडगा : आता तुम्हाला माझ्यापासून कोण वाचवेल मी तुम्हाला पकडतोच लांडग्याने एक एक करून सगळ्या पिल्लांना शोधल आणि एका पोत्यात बांधल. आणि ते पोत आपल्या खांद्यावर टाकून मस्त गाण म्हणत तो जंगलाकडे निघून गेला.

लांडग्याची नजर चुकवून एक छोटं पिल्लू चुलीत जाऊन लपल होत लांडग्याच त्याच्याकड लक्ष गेल नाही आणि ते वाचल.

थोड्यावेळानी बकरी जेव्हा आपल्या घरी परत आली तेव्हा तिने बघितल की घराच दार तर उघडय आणि आतल सगळ सामान अस्तव्यस्त पडलंय घाबरून ती आपल्या पिल्लांना हाक मारू लागली बाळांनो माझ्या लाडक्या बाळांनो कुठे आहात तुम्ही हे बघा मी तुमच्यासाठी काय आणलंय आईचा आवाज एकूण सगळ्यात छोट पिल्लू जे होत ते बाहेर आल आणि रडू लागल.

बकरीने लगेच त्याला मिठी मारली आणि विचारल तुझी सगळी भावंडकुठेय छोट्या पिल्लाने रडत रडत सगळी गोष्ट बकरीला सांगितली ते ऐकूण बकरी रागाने लाल झाली आणि म्हणाली माझ्याबाळांना घेऊन गेला त्याची हि हिम्मत आता बगतेच त्याच्याकडे.

पिल्लाला म्हणाली चल माझ्याबरोबर त्या दृष्ट लांडग्याला शोधू आणि पिल्लाना आणूया
तिकडे जंगलात लांडगा पोत घेऊन चालतच राहिला थोड्यावेळाने तो थांबला आणि त्यानी विचार केला आता थोडा वेळ आराम करतो तसही पिल्ल कुठे पळून जाताय त्यानांतर मी एकदम चवीने खाणारचय असा करून लांडग्याने ते पोत खाली ठेवून एका मोठ्या झाडाखाली तो शांतपणे झोपला.

पिल्लांना शोधणाऱ्या बकरीने त्याच घोरण ऐकल बकरीनी पाहिल लांडगा आरामात झोपला होता तिथे असलेल्या पोत्यात पिल्ल हालचाल करत होती पिलांना जिवंत पाहून बकरीच्या जीवात जीव आला आणि ती हळूच त्या पोट्यापाशी गेली आणि ते पोत उघडल सगळी पिल्ल पोत्यातून बाहेर आली पिल्ल आईला बघून खूश झाले

तेवढ्यात सगळ्यात लहान पिल्लाने एक मोठा दगड आणला आणि त्या पोत्यात टाकला त्याच बघून ]इतर पिल्लांनी सुद्धा दगड टाकून ते पोत भरून टाकल बकरीनी दोरीने ते पोत शिवून टाकल नंतर बकरी आणि तिची सगळी पिल्ल एका झुडूपात लपून भारी गंमत पाहू लागली.

थोड्या वेळानी लांडगा जागा झाला आणि पोत उचलून चालू लागला आणि म्हणाला केवढ जड आहे हे पोत आज तर माझी मेजवानीचय पोत त्याला खूप जड झाल होत.

नदी ओलांडायला त्यानी पाण्यात पाय टाकताच त्याचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला आणि पाण्याबरोबर वाहू लागला.

बकरी आणि पिल्ल् लांडग्याची ही अवस्था पाहून जोरजोरात पोटधरून हसायला लागली.

तात्पर्य: दुष्टाचा शेवट नेहमी वाईटच होतो..!

Tags: लांडग्याची आणि बकरीची गोष्ट, Landgyachi Ani Bakri Chi Goshta, Bakri ani landga chi goshta.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *