खडक म्हणजे काय मराठी– Khadak Mhanje Kay Marathi – Rock Information In Marathi : नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला खडक म्हणजे काय? व खडकांचे प्रकार कोणते आहेत? याबद्दल माहिती सांगणार आहे म्हणून पोस्ट पूर्ण वाचा आणि आवडल्यावर तुमच्या मित्रांना शेयर करायला विसरु नका धन्यवाद..

खडक म्हणजे काय मराठी- Khadak Mhanje Kay Marathi
खडक म्हणजे काय? – Khadak Mhanje Kay Marathi – Rock Information In Marathi
खडक म्हणजे काय :- खडक म्हणजे साधारणपणे खनिजांचे मिश्रण होय.
खडकांचे प्रकार कोणते? Khadkanche Prakar
अग्निजन्य खडक – अतिउष्ण लाव्हारसापासून तयार झालेल्या खडकाला अग्निजन्य खडक असे म्हणतात. हे खडक भूपृष्ठावर किंवा भूकवचात लाव्हारस थंड होऊन निर्माण होतात. लाव्हारस थंड व घट्ट होणाऱ्या स्थानावरून या खडकांचे दोन प्रकार पडतात.
1) बहीनिर्मित खडक : भूपृष्ठाकडे येणार शिलारस भूपृष्ठभावर साचून तेथे लवकर थंड होऊन घट्ट होतो. या खडकांना बहिनिर्मित अग्निजन्य खडक असे म्हणतात. उदा. बेसाल्ट खडक.
2. आंतरनिर्मित खडक : जेव्हा शिलारस भूकवचातच थंड होतो, तेव्हा त्यास आनर्निर्मित खडक असे म्हणतात. त्यांचे खोलीनुसार पुढील प्रकार होतात.
- पातालिक खडक : शिलारस जेव्हा भूपृष्ठापासून बऱ्याच खोलीवर थंड होतो त्यास पातालीक खडक असे म्हणतात.
- अंतर्वेशी खडक : शिलारस खडकांतील जोडातून भ्रंशपातळीवरून किंवा निरनिराळ्या खडक थरांच्या सीमांवरून पसरतो व त्यास थंड झाल्यावर निरनिराळे आकार प्राप्त होतात. यांना अंतर्वेशी रूपे म्हणतात.
गाळाचे खडक म्हणजे काय?
गाळाचे खडक म्हणजे काय:- मूळ खडकांवर बाह्य प्रक्रियांचा परिणाम होऊन तयार झालेल्या अवसादाचे थर साचून तयार झालेल्या खडक याला गाळाचे खडक असे म्हणतात. या खडकांची निर्मिती व संघटना त्यानुसार त्यांचे पुढील प्रकार पडतात.
1) यांत्रिक पद्धतीने तयार होणारे खडक – खडकांचा अपक्षय होतो व अपक्षत पदार्थ वाहून नेऊन खोलगट भागात त्याचे संचयन होते. अशा खडकांना यांत्रिक पद्धतीने तयार होणारे खडक असे म्हणतात. यांत्रिक पद्धतीने तयार होणाऱ्या अवसादी खडकांचे कणांच्या आकारमानानुसार वर्गीकरण खंडाष्मी, वालुकामय व मृणमय खडक असे केले जाते.
२) सेंद्रिय पद्धतीचे स्तरित खडक – पाण्यामध्ये काही प्रमाणात विविध रसायने समाविष्ट असतात. अशी पाण्यात विरघळलेली रसायने स्थिर पाण्याच्या तळाशी साचून त्यापासून अश्या खडकांची निर्मिती होते. उदा. जिप्सम, चुनखडक इत्यादी.
रूपांतरित खडक म्हणजे काय?
रूपांतरित खडक म्हणजे काय:- अतिउष्णता व दाब यांच्या सानिध्यात आल्याने ज्या खडकांचे मूळचे स्वरूप बदलते अशा खडकांना रूपांतरित खडक असे म्हणतात. उदा. वाळूच्या स्तरीय खडकाचे या रूपांतर क्रियेने गारगोटीत रूपांतर होते. या खडकांचे दोन प्रकारे रूपांतर होत असल्याने त्यांचे दोन प्रकार पडतात.
१) स्पर्शजन्य रूपांतरित खडक – अति उष्णतेच्या सानिध्यात आल्याने हे खडक तयार होतात. तप्त लाव्हारसाच्या संपर्कात येणारे प्राचीन खडक एक तर वितळतात किंवा अतिशय तापतात.
२) प्रादेशिक रूपांतरित खडक – भू-हालचालींमुळे भूकवचात गाडल्या गेलेल्या मूळ खडकावर अति दाब व अंतर्गत उष्णतामुळे विस्तृत प्रदेशातील खडकात घडून येणाऱ्या रूपांतराणे या प्रकारचे खडक तयार होतात. स्पर्शजन्य रूपांतरित खडकापेक्षा या खडकांचा भूपृष्ठावर विस्तार अधिक असल्याने त्यांना प्रादेशिक रूपांतरित खडक म्हणतात. उदा. अशा खडकांत सोने, चांदी, हिरे यांसारखी मौल्यवान खनिजे सापडतात.
FAQ
[sc_fs_faq html=”true” headline=”h3″ img=”” question=”खडक म्हणजे काय?” img_alt=”” css_class=””] खडक म्हणजे साधारणपणे खनिजांचे मिश्रण होय. [/sc_fs_faq] [sc_fs_faq html=”true” headline=”h3″ img=”” question=”खडकांचे प्रकार कोणते?” img_alt=”” css_class=””] खडकांचे दोन प्रकार पडतात 1) बहीनिर्मित खडक 2) आंतरनिर्मित खडक. [/sc_fs_faq] [sc_fs_faq html=”true” headline=”h3″ img=”” question=”गाळाचे खडक म्हणजे काय?” img_alt=”” css_class=””] मूळ खडकांवर बाह्य प्रक्रियांचा परिणाम होऊन तयार झालेल्या अवसादाचे थर साचून तयार झालेल्या खडक याला गाळाचे खडक असे म्हणतात. [/sc_fs_faq] [sc_fs_faq html=”true” headline=”h3″ img=”” question=”रूपांतरित खडक म्हणजे काय?” img_alt=”” css_class=””] अतिउष्णता व दाब यांच्या सानिध्यात आल्याने ज्या खडकांचे मूळचे स्वरूप बदलते अशा खडकांना रूपांतरित खडक असे म्हणतात. [/sc_fs_faq]
Tags: खडक म्हणजे काय, खडकांचे प्रकार कोणते, गाळाचे खडक म्हणजे काय, रूपांतरित खडक म्हणजे काय..