कलम 304 ब मराठी माहिती 304 B IPC In Marathi | Kalam 304 B In Marathi हुंडाबळी कलम माहिती : नमस्कार मित्रांनो, 304 कलम म्हणजे काय? या बद्द्ल संपूर्ण माहिती सांगणार आहे म्हणून पोस्ट पूर्ण वाचा जेणेकरून तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती मिळेल आणि पोस्ट आवडल्यावर तुमच्या मित्रांना शेयर करायला विसरु नका धन्यवाद..

कलम 304 ब मराठी माहिती 304 B IPC In Marathi | Kalam 304 B In Marathi हुंडाबळी कलम माहिती
(Kalam 304 B In Marathi)

कलम 304 ब मराठी माहिती 304 B IPC In Marathi | Kalam 304 B In Marathi | हुंडाबळी कलम माहिती

304 ब हुंडाबळी.

ज्या वेळी एखाद्या विवाहित स्रीचा मृत्यू विवाहापासून सात वर्षाचे आत घडून आला आहे आणि तो जाळपोळ करून, दुखापती करून, अगर नेहमीपेक्षा इतर परिस्थितीत घड़न आलेला आहे आणि असे दाखवून देण्यात आले की तिच्या मृत्यूपर्वी तिला क्रूरपणे वा्गविले जात होते अगर जाच, छळवणूक होत होती आणि तो तिचा नवरा, अगर नातेवाईक करत होते आणि त्यामागे हुंड्याची मागणी होती. तर अशा मृत्यूस हुंडाबळी असे म्हटले जाईल आणि नवच्याने आणि नातेवाइकांनीच तो मृत्यू घडवून आणला आहे असे मानले जाईल.

स्पष्टीकरण : या पोटकलमाच्या प्रयोजनार्थ हुंडा’ याचा अर्थ हुंडा प्रतिबंध अधिनियम, १९६१ याच्या कलम २ प्रमाणे राहील. (२) जो कोणी हुंडाबळीचा अपराध करील त्याला करमीतकमी सात वर्षेपरयंत कारावास होईल. परंतु अशी शिक्षा जन्मठेपेची (आजन्म कारावासाची) देखील होईल.

टीप १ : हुंडाबळी हे कलम दिनांक १९ नोव्हेंबर १९८६ पासून अमलात आले आहे आणि त्यांच तारखेला भारतीय पुरावा कायद्यात ११३-ब है कलम अनुमान काढण्याकरता घातले आहे. सदरची दोन्ही कलमे सन १९८६ च्या हुंडा -प्रतिबंधक कायदा (दुरुस्ती) नुसार घातली आहेत आणि लगेच ९ सप्टेंबर १९८६ च्या भारताच्या गझेटमध्ये भाग २ विभाग १ म्हणून पृष्ठ क्रमांक १ ते ५ वर प्रसिद्धी देण्यात आली. त्यानंतर नोटीफिकेशन नुसार कायद्याची अंमलबजावणी तारीख जाहीर होणार होती. ते नोटीफिकेशन केंद्र सरकारने G.S.R. No, ११८५ (E) दिनांक ५ नोव्हेंबर १९८६ रोजी प्रसिद्ध केले आणि त्यानुसार मग आय. पी. सी-क्रि. प्रो. कोड पुरावा कायदा यातील दुरुस्त्या १९ नोव्हेंबर १९८६ पासून अमलात आल्या आहेत.

टीप २ : वरील कलमाचे दोन भाग आहेत, तसेच एक स्पष्टीकरण आहे. पहिल्या भागात हुंडाबळी म्हणजे काय हे स्पष्ट केले आहे, तर दुसच्या भागात शिक्षा दिली आहे, तर स्पष्ट्ीकरणात “हुंडा’ म्हणजे काय हे स्पष्ट केले आहे. या कलमामधील महत्त्वपूर्ण शब्द आहेत की “”आणि असे दाखवून देण्यात आले आहे की’ त्यामुळे परिस्थिती दाखविण्याची जबाबदारी प्रथमतः सरकारी पक्षावरच असते आणि ती दाखविल्यानंतरच मंग पुरावा कारयद्याप्रमाण कलम ११३ ब प्रमाणे अनुमान काढता येते.

टीप ३ : कलमाची फोड : पुढीलप्रमाणे आहे :
१. ख्ीचा मृत्यू तीन कारणांनी घडला पाहिजे : (अ) जाळपोळ करून, (ब) शारीरिक दुखापती करून, (क) अगर नेहमीपेक्षा इतर परिस्थितीत, २. मृत्यू, विवाहापासून सात वर्षाच्या आत. ३. तिला नवरा- नातेवाइकाकडून क्रूर वागणूक जाच-त्रास होतो. ४. अशी वागणूक – जाच – त्रास हुंड्यापोटी. ५. मृत्यू घडण्यापूर्वी अशी क्रूर वागणूक जाच-त्रास नजीकच्या काळात होतो.

टीप ४ : हंडा म्हणजे काय? : या कलमात जाच-त्रास वगैरे हुंडा मिळविण्याकरता असतो. तसेच स्पष्टीकरणात हुंडा म्हणजे काय, तर हंडा प्रतिबंधक अधिनियम, १९६१ मधील व्याख्या असे सागितले आहे. त्यामुळे हुंडा म्हणजे काय? हे पाहणे महत्त्वाचे उरेल, “हुंडा प्रतिबंधक अधिनियम, १९६१ कलम २ मध्ये हुंडा याची व्याख्या दिलेली आहे. हंडा याचा अर्थ (अ) विवाहातील एका पक्षाने अन्य पक्षास अगर (ब) वकिवा विवाहातील कोणत्याही पक्षाच्या आई-वडिलांनी अगर अन्य व्यक्तींनी दुसच्या पक्षास कोणतीही मिळकत अगर किमती दस्तऐवज देणे, अगर देण्याचे उरविणे. मग समक्ष देवो अगर अप्रत्यक्ष देवो. मग हे देणे लग्नापूर्वी – लग्नानंतर अगर लग्नाच्या वेळी अगर नंतर केव्हाही असते. पण यात ज्या व्यक्तींना व्यक्तगत मुस्लिम कायदा (शरीयत) लागू आहे. त्या व्यक्तींच्या बाबतीत दहेज किवा महर यांचा समावेश होत नाही. किमती दस्तऐवज याचा अर्थ आय. पी.सी. कलम ३০ प्रमाणे चेक- करारनामा = खरिदीखत वगरे सर्व प्रकार येतात. त्यामुळे हुंड्याचे पोटी जंगम- स्थावर मिळकत – चेक – करारनामा- खरेदीखत वगैरे घेणे यांचा समावेश आहे. केवळ हुंड्याची मागणी करणे पण कलम ४ प्रमाणे गुन्हा आहे. तर हुंडा देणे-घेणे कलम ३ प्रमाणे गुन्हा आहे.

टीप ५ :धरून चालण्यात येईल [SHALL BE DEEMED] : कलम ३०४-ब मधील ही शब्दरचना विशेष प्रथमच आय.पी.सी. मध्ये केलेली आहे. इतर कोणत्याच गुन्ह्याकरता अशी DEEMING PROVISION नाही. इतर दिवाणी महसूल आकारणी कायद्यात अशी तरतूद दिसत. पुष्कळ वेळा हुंडाबळी घटनेत घडलेला मृत्यू मुद्दामच मनुष्यवधाचा अगर आत्महत्येचा देखील असू शकेल त्यामुळे आरोपीस कायद्याच्या कचाट्यात पकडण्याकरता हुषारीने मुद्दामच अशी शब्दयोजना दिसते.

टीप ६ : कलम भारतीय राज्य घटनेच्या विरोधात आहे का? : नाही. या संदर्भात सुप्रीम को्टाने बरीच चर्चा केली आहे.भा.रा. घ. च्या अनुच्छेद २० (२) आणि इतर तरतुदींचा विचार केला. तसेच संबंधी नवीन कलम आय. पी.सी. ४९८-अ विचारात घेण्यात आले आणि नवीन कलम ३०४ -ब हे अवैध नसून राज्य घटनेच्या विरोधात नाही असे म्हटले आहे. पाहा : “इंदरराज मलीक वि. श्रीमती सु्नीता मलीक १९८६ GL.J १५१० आणि या संदर्भात सु्रीम कोर्टानि “चिरनजीतलाल चौधरी वि. भारत सरकार A.1.R, १९५१ S.C. ४१ या जुन्या केसचा दाखला दिला होता.

टीप ७ : भा. पुरावा कायदा कलम ११३- ब : हुंडाबळीच्या कलमाबरोबरच भारतीय पुरावा कायद्यात कलम ११ ३ -ब अनुमान काढण्याकरता घातले आहे. ते त्याच तारखेला १९-११-८६ रोजी घातले अहे. त्यात कोर्ट गृहीत धरील SHALL- PRESUME असे म्हटले आहे. कलम ११३ (ब) म्हणते “कोर्टपुढे जेक्हा असा प्रश्न असतो की आरोपीने हुंडाबळीचा अपराध केला आहे का? आणि असे दाखविण्यात आले आहे की तिच्या मृत्यूचे अगदी आधीच त्या ख्रीला क्रपणे वागविले होते अगर तिला जाच-त्रास दिला जात होता आण त्यामागे हुंडयाची मागणी होती तर कोर्ट असे गृहीत धरील[|SHALL PRESUME] की त्या व्यक्तीने हुंडाबळीचा अपराध केला आहे.”

स्पष्टीकरण – या कलमाचे प्रयोजनार्थ हुंडाबळी याचा अर्थे आय.पी.सी. कलम ३०४-ब मध्ये दिल्याप्रमाणे घेणे आहे. वरील अनुमान सक्तीचे आहे त्यामुळे त्यात दाखविलेले घटक सिद्ध झाले अनुमान आज्ञधारकपणे |Mandatory] पाळावे लागणारे (Obligatory) आहे, आणि
मग कोर्टास दुसरी निवड आणि पर्याय नसतो, तर आरोपीने गुन्हा केलेलाच आहे असे अनुमान काढावे लागते. अरथात विरुद्ध पक्षाला ते अनुमान खोड़ून काढता येते म्हणजे त्याचे स्वरूप |REBUTTABLE] असते म्हणजे आरोपी पुरावा देऊ शकतो.

टीप ८ : काही न्यायनिवाडे : रीराला रॉकेलचा वास येणे : एका घटनेत मृत ख्व्रीच्या शरीराला आाणि केसांना रॉँकलचा वास येत होता. त्यामुळे नवन्याचे बहिणीचे निवेदन- ती अचानक चहा करताना पेटली- हे पटत नाही. अपघात नव्हता तर हुंडाबळी होता. पाहा अशोक कुमार वि. राजस्थान सरकार A.IR. १९९० S.C. २१३४. घाईगर्दीत प्रेताचा अंत्यसंस्कार करणे : एका घटनेत र्रीचा मृत्यू घडल्यावर
तिच्या आई-वडिलांना, भावांना कळविले नाही, तर घाईगर्दीत तिचा अंत्यसंस्कार उरकला. त्यामुळे पुरावा कायदा कलम ११३-ब प्रमाणे आरोपीविरुद्ध अनुमान निघते. कलम ३०४-ब प्रमाणे इतर पुरावा क्रूर वागणूक – हुंड्याची मागणी वगैरे मुदरूयावर होता. त्यामुळे आरोपीचा बचाव ख्रीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला हे पटत नाही. त्यामुळे हुंडाबळीची घटनाच शाबीत झाली आहे.

टीप ९: कलम ४९८- अ आणि ३०४ ब : हे दोन स्वतंत्र वेगळे गुन्हे आहेत, तरी देखील जर कलम ३०४ ब चा अपराध शाबीत झाला नाही. तर कलम ४९८-अ प्रमाणे शिक्षा देता येते. कारण दोन्ही कलमात क्रूरपणा आहे. कलम ४९८ अ मध्ये त्यांची व्याख्या-खुलासा आहे. तर कलम ३०४ -ब मध्ये नाही, तरी तोच अ्थे अभिप्रेत आहे. पाहा : “परमाबेन शांबलभाई पटेल वि. गुजरात राज्य” १९९१ (१) S.C.C. 9.

टीप १० : हुंडाबळी स्वतंत्र नवीन गुन्हा आहे : दि. १९-११-८६ पूर्वी जर घटना अशा प्रकारची हुंडाबळीची असेल तर अपराध होणार नाही. कारण हा नवीन स्वतंत्र अपराध आहे. भारतीय राज्यघटना अनुच्छेद २० (१) प्रमाणे शिक्षा देताना तो कायदा अस्तित्वात चालू पाहिजे, तरच शिक्षा देता येते. पाहा : “सोनी देवराजभाई वि. गुजरात राज्य’ १९९ १ CrL.J. ३१२५ S.C.

टीप ११ : कार्यपद्धती : अपराध दखलपात्र बिगर जामिनाचा- सेशन्स कमिट आहे. हुंडाबळी (क, ३०४ -ब) यावरील सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा : (१) हुंडाबळीचे घटक सर्वोच्च न्यायालयाने क, ३०४ ब चे तीन घटक सांगितले आहेत. १) हुंडयाची मागणी असली पाहिजे व त्या कारणास्तव आरोपीने मयत व्यक्तीला जाच केला होता.

२) विवाहित स्त्री मृत्यू पावली आहे. ३) विवाह झाल्यापासून ও वर्षांचे आत तिचा अनैसर्गिक कारणाने मृत्यू जर उपरोक्त घटक विश्वासाह आणि संयक्तिक पुराव्याने सिद्ध झाले असतील तरच भारतीय पुरावा कारयदा क. ११३-ब खालील हुंडाबळीची संकल्पना पूर्ण होते. (पाहा : पवनकुमार वि. हरियाणा राज्य २००६ Cr.L.J. %o9o (SC)) (२) आरोपी नवच्याने त्याची पत्नी आणि तिच्या आईवडिलांकडे घरखर्चासाठी आणि खत आणण्यासाठी पैशांची मागणी केली. त्याच्यावर क. ३०४-ब खाली हुंडा मागणीचा दावा दाखल करण्यात आला. परेतु सर्वच्व न्यायालयाने आर्थिक अडचणीमुळे केलेली पैशांची मागणी ही हुंडा मागणी होऊ शकतनाही आणि त्यामुळे आरोप क. ३०४ -ब खाली दोषी नाही, असे मत नोंदवून त्याचे अपील संमत केले. (पाहा : आप्पासाहेब वि. महाराष्ट्र राज्य AIR २००७ SC ४६३ परंतु शोभा राणी वि. मधुकर रेद्वी AR १९८८C १२१ या केसमध्ये नवच्याने किंवा त्याच्या आईवडिलानी त्याच्या पत्नीकड़े किंवा तिच्या आईवडिलांकड़े गरजेच्या वेळी काही हजार रुपयांची केलेली मागणी हुंडा मानून नवच्याला या कलमाखालील गुन्ह्यासाठी दोषी ठरविण्यात आले.

(३) आरोपीने वारंवार हुंड्याची/ पैशांची मागणी करून तिला आत्महत्या करण्यास चिथावर्णी दिली असा त्याच्यावर आरोप ठेवष्यात आला. ही बाब पंचायतीकडे नेण्यात आलेली होती, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. आत्महत्येपूर्वी एक महिना अगोदर नवच्याने आणि त्याच्या आईवडिलांनी तिला घराबाहेर काढले होते आणि पैसे घेऊन येईपर्यंत परत यायचे नाही, अशी ताकीद दिली होती. ही घटना घडली त्यावेळी ती गरोदर होती व तिला १५ महिन्यांचा एक मुलगा होता. साक्षीदारांच्या पुराव्यावरून हे निःसंशय सिद्ध झाले की, मयत व्यक्तीला तिचा नवरा आणि सासू -सासरे छळत असत. त्या सगळ्यांनी तिचे जीवन दुःखी केले होते आणि म्हणून तिने आत्महत्येचा मार्ग चोखाळला. सर्वच्च न्यायालयाने आरोपीला क. ३०४-ब खाली दिलेली शिक्षा योग्य ठरविली व त्यात हस्तक्षेप करण्याचे नाकारले, (पाहा : देवेंदरसिंग आणि अन्य वि. पंजाब राज्य २० ०५ Cr.L.J. REO (SC)

(४) अरोपीने राजूशी लग्न केले, त्यापूर्वी १५ वर्षे अगोदर त्याचे वडील वारलेले होते. तो आईबरोबर राहत होता. आरोपी आणि त्याची पत्ली
दोघेही बेकार होते. घटनेच्या दिवशी काही कामासाठी अरोपी बाहेर गेलेला होता व दुपारी जेव्हा तो परतला तेव्हा त्याला आपले घर पेटलेले दिसले, बरेच लोक ते विझविण्याचा प्रयत्न करीत होते. त्याला कळले की त्याची बायको आगीत जळून मेली आहे, भाजल्यामुळे झालेल्या जखमांमुळे ती गुदमरून मेली. तिच्या वडिलांनी साक्षीत सांगितले की आरोपीने तिला मारून टाकले. ती अडाणी असल्यामुळे (आणि तिचा नवरा सुशिक्षित असल्यामुळे) त्यांचप्रमाण हुं्यासाठी तिचा छळ होत होता. आरोपीने तक्रारदाराचे (तिच्या वडिलांचे) संगळे म्हणणे नाकारले. जवळजवळ ११ आरोपी तपासण्यात आे, पण सत्र न्यायालयाला, आरोपीविरुद्ध कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही. त्यामुळे त्यांची सुटका झाली. जरी ही घटना लग्न झाल्यापासून ७ वर्षांचे आत घडली, तरी मयत तिच्या सासरी १२ महिने होती आणि त्या काळात तिला कोणीही माहेरी न्यायला आले नाही. यावरून असे म्हणता येणार नाही की, ही हंडाबळीची केस आहे.त्याबाबत कोणताही ठोस पुरावा नाही. असे सत्र न्यायालयाचे मत होते. उच्च न्यायालयात झालेल्या अपीलात, आरोपीचा हावरेपणा, हुंड्याची सतत माग्णी, छळ आणि त्रास यावरून निष्कर्ष काढला गेला की, ही हंडाबळीची केस अाहे आणि आरोपी दोषी आह. सर्वोच्च न्यायालयातील अपीलात उच्च न्यायालयाचे म्हणणे ग्राह्य धरण्यात आले आणि आरोपीना क, ३०४ -ब खाली दोषी उरवूनशिक्षा देण्यात आली, (पाहा : प्रेमकुमार वि, राजस्थान राज्य AIR २० ०९ SC १ २४२)

(५) मणिबेन वि. गुजरात राज्य (२००९) ८ SCC ७९ ६. सासू सुनेच्या भांडणानंतर सासूने सुनेच्या अंगावर जळती वात फेकली त्यामुळे सून ६०% भाजली व आठ दिवसानतर तिचा मृत्युू झाला. न्यायचौकशी करणाच्या न्यायालयाने क, ३०४ भाग २ अन्वये ५ वर्षाची शिक्षा दिली. अपीलात उच्च्च न्यायालयाने ती शिक्षा के. ३०२ भाग २ खालील दोषसिद्धीत रूपांतरित केली. न्यायालयाचा दृष्टिकोन असा होता की, मृत व्यक्तीला झालेल्या जखमा सर्वसाधारण निस्गक्रमानुसार मृत्यू घडवून आणण्याजोग्या नव्हत्या. सर्वोच्च न्यायालयाने हे मत आ्राह्या धरले. मात्र आरोपीचे ८५ वर्षाचि वय विचारात घेऊनपाच वर्षाची शिक्षा योग्य आहे असे म्हटले.

(६) उत्तरप्रदेश राज्य वि. दिनेश (२००९) ११ SCC ५६६ उत्तरवादी आरोपी यांच्याबरोबर (मृत) सहआरोपी यांनी मृत व्यक्तीला एकाहाताने प्रतिबंध करीत असतानाच आरोपीपैकी प्रत्येकाने दुसच्या हाताने गावठी पिस्तुलातून त्याच्यावर गोळ्या झाडल्या. परिणामी तो मृत्यू पावला. मृतावर अगदी जवळून गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. चार प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांपेकी एकाने साक्षीत केलेल्या विधानाबाबत तो पक्का नक्हता, दुसरा मृत व्यक्तीचा नातेवाईक होता, तिसरा घटनेच्या जागी उपस्थित होता ही गोष्ट संभवनीय वाटत नाही, तर चौथ्या साक्षीदाराच्या बाबतीत विसंगती आढळन आली. वैद्यकीय पुराव्यातही सांगितल्याप्रमाणे जखमा झाल्याचे नाकारण्यात आले होते. सर्व जखमा वरवर कापलेल्या स्वरूपाच्या होत्या. एकही जखम तीक्ष्ण हत्याराने केल्याचे आढळून आले नाही. प्रेत शवागारात पाठविण्याच्या वेळेबाबतही विसंगती आढळन आली. म्हणून उच्च न्यायालयाच्या निर्णयात सर्वोच्च न्यायलयाने हस्तक्षेप न करता उत्तरवादी आरोपीला सोडून देण्यात आले.

#TAGS: कलम 304 ब मराठी माहिती, 304 B IPC In Marathi, Kalam 304 B In Marathi, हुंडाबळी कलम माहिती.