इतिहासाची साधने कोणती आहेत संपूर्ण माहिती Itihasachi Sadhane Marathi – लिखित साधने – भौतिक साधने

इतिहासाची साधने Itihasachi Sadhane Marathiलिखित साधनेभौतिक साधने : नमस्कार मित्रांनो,, आज मी तुम्हाला इतिहासाची साधने कोणती आहेत याबद्दल माहिती सांगणार आहे म्हणून पोस्ट पूर्ण वाचा आणि आवडल्यावर तुमच्या मित्रांना शेयर करायला विसरु नका धन्यवाद..

इतिहासाची साधने, Itihasachi Sadhane Marathi, लिखित साधने, भौतिक साधने
इतिहासाची साधने

इतिहासाची साधने म्हणजे काय? Itihasachi Sadhane Marathi

इतिहास हे एक सामाजिक शास्त्र असल्यामुळे त्या शास्त्राच्या अभ्यासाची, प्रतिपादनाची एक सर्वसंमत अशी पद्धत असते. भूतकाळात म्हणजेच हजारो वर्षांपूर्वी किंवा अगदी नजीकच्या काळात म्हणजे गेलेल्या क्षणात, तासात, दिवसात, महिन्यात, वर्षात घडलेला एखादा प्रसंग किंवा घटना कशी घडली हे नेमकेपणाने इतिहास सांगतो. हे प्रतिपादन ज्यावर आधारलेले असते त्या आधारभूत गोष्टींना इतिहासाची साधने म्हणतात.

एखादा फौजदारी गुन्हा घडल्यानंतर पोलीस जेव्हा तपास करतात तेव्हा ते खरे तर भूतकाळात घडलेल्या घटनेची साधने धुंडाळत असतात. गुन्हेगाराच्या पाऊलखुणांचा शोध घेत त्याचा माग काढतात, घटना कशी घडली असेल याविषयी आधारभूत तर्कशुद्ध पद्धतीने मांडणी करतात. इतिहासाच्या प्रतिपादनातही असाच तपास असतो, पुराव्यांच्या आधारावरचा आणि फक्त फौजदारी घटनांचाच नव्हे तर गतजीवनात घडलेल्या अनेक गोष्टींचा.

इतिहासाची साधने प्रामुख्याने दोन प्रकारची असतात. पहिला प्रकार वस्तुरूप साधनांचा ज्याला ‘पुरातत्वीय साधने’ म्हणतात. दुसरा प्रकार आहे लिखित साधनांचा ज्याला ‘पुराभिलेखीय साधने’ असे म्हणतात. पुराभिलेखीय साधने प्रामुख्याने तालपत्रांचा तथा भूर्जपत्रांचा आणि खरे तर कागदाचा वापर सुरु झाल्यानंतरच उपलब्ध होऊ लागली. गेल्या सात आठशे वर्षातली पुराभिलेखीय साधने सापडतात व त्या आधारे त्या काळातल्या घडामोडींचा मागोवा घेता येतो.

पुरातत्वीय साधने मात्र लक्षावधी वर्षापूर्वीपासूनच्या कालखंडातही उपलब्ध होतात. हि लक्षावधी वर्षांपूर्वीची पुरातत्वीय साधने मुख्यतः अस्थी अवशेषांच्या आणि दगडी हत्याऱ्यांच्या स्वरूपातली असतात. हे अवशेष उत्तखननातून उपलब्ध होतात. क्वचित प्रसंगी नद्यांच्या काठावर मातीमध्ये, किंवा नद्यांच्या पत्रातही अवशेष सापडतात. पुरातत्वीय साधनांमध्ये अस्थी अवशेषांना अनन्यसाधारण महत्व आहे. या अस्थी अवशेषांवर रेडिओ कार्बन किंवा कार्बन १४ या रासायनिक प्रक्रिया केल्या जातात व त्याआधारे त्या अवशेषांचा काळ निश्चित केला जातो.

डायनासॉर या अजस्त्र प्राण्याची हाडे अलीकडेच सापडली. हा प्राणी लक्षावधी वर्षांपूर्वी पृथ्वीतलावर होता हे या रासायनिक प्रक्रियेतून स्पष्ट झाले. हि हाडे किती लाख वर्षांपूर्वीची आहेत हे या रासायनिक सांगता येते. हडप्पा मोहेंजोदारोच्या उत्तखननात सापडलेली माणसांची, प्राण्यांची हाडे त्या काळी म्हणजे १९२० च्या सुमारास अमेरिकेतील पेन्शलव्हनीया विद्यापीठात पाठवली होती व त्यांवर कार्बन १४ ची रासायनिक प्रक्रिया केली गेली. त्यातून हे स्पष्ट झाले कि हि संस्कृती ५००० वर्षांपूर्वीची आहे.

आता या रासायनिक प्रक्रिया भारतातील काही प्रयोग शाळांतुनहि होतात. व इतिहासाच्या अस्थिरुप साधनांची चिकित्सा केली जाते. अस्थी अवशेशाखालोखाल पुरातत्वीय साधनांमध्ये मातीच्या खापरांना महत्व आहे. खापरे हि पुरातत्वशास्त्राची मुळाक्षरे मानली जातात. मातीच्या भांड्यांनी गेली हजारो वर्षे माणसाची साथ केली. मातीची हि भांडी, भांड्यांची खापरे, त्यांचा पोत, रंग, बनावट व त्यांवरील पॉलिश यांवरून हि भांडी कुठली, कोणत्या देशाची कोणत्या काळातली या प्रश्नांची उत्तर पुरातत्वेते देऊ शकतात.

पुरातत्वीय साधनांमध्ये दैनंदिन जीवनातील असंख्य वस्तूंचा समावेश होतो. या वस्तू उखनांतून सापडतात. किंवा गेल्या तीनचारशे वर्षातल्या या वस्तू लोकांच्या संग्रही असतात, त्यांच्याकडून वस्तुसंग्रहालयात येतात व अभ्यासल्या जातात. हडप्पा मोहेंजोदारो येथील अश्या प्रकारच्या अवशेषांवरून सिंधू संस्कृतीतील लोकांचे सामाजिक, धार्मिक, आर्थिक जीवन रेखाटले गेले आहे. मंदिर, लेणी, किल्ले, वडे, गढ्या मशिदी, गुरुद्वारे, चर्चेस हीदेखील इतिहासाची पुरातत्वीय साधने. या इमारतींवर असलेले शिलालेख हा तर अत्यंत विश्वसनीय पुरावा. लेण्यांमधील आणि मंदिराच्या बाह्य भिंतीवरील शिल्पाविष्कार हा गतकालीन वाटचालीचा कला अभिव्यक्तीचा पुरावा. त्याआधारे प्राचीन भारतीय कलेचा इतिहास रेखाटला जातो, त्याचप्रमाणे धार्मिक इतिहासाचे स्वरूपही स्पष्ट होते.

पुराभिलेखीय साधने म्हणजे तालपत्रांवर किंवा कागदांवर नोंदवलेला पुरावा. गेल्या साताठशे वर्षांपासून अशा प्रकारची साधने उपलब्ध होतात. हि कागदपत्रे एक तर मंदिरातून, मठांतून किंवा वतनदार, जहांगीरदारांच्या लादण्यातून आढळतात. अशा कागदपत्रांचा शोध घेऊन हि कागदपत्रे पुराभिलेखागारातून संरक्षित ठेवली जातात व अभ्यासकांना उपलब्ध करून दिली जातात. हि पुरातत्वीय साधने मूलतः हस्तलिखितांच्या स्वरूपात असतात. या हस्तलिखितांना इतिहासाचे साधन म्हणून अनन्यसाधारण महत्व असते.

लिखित साधने Likhit Sadhane In Marathi

लिखित साधने, Likhit Sadhane In Marathi
लिखित साधने Likhit Sadhane In Marathi

भौतिक साधने Bhautik Sadhane In Marathi

भौतिक साधने, Bhautik Sadhane In Marathi
भौतिक साधने Bhautik Sadhane In Marathi

इतिहासाची साधने, लिखित साधने, भौतिक साधने PDF

Itihasachi Sadhane Marathi, Bhautik Sadhane In Marathi, Likhit Sadhane In Marathi pdf Download

इतिहासाची साधने प्रकार Itihasachi Sadhane Prakar

१) प्रथम दर्जाची साधने

गतकालीन वाटचालीचे पुरावे धुंडाळत ज्या अनेक गोष्टी हाती येतात त्या सर्वांचे विश्लेषण केले जाते. त्यांची अस्सलता तपासली जाते. उपलब्ध झालेला पुरावा म्हणजेच इतिहासाचे साधन कुठल्या संदर्भातले आहे, कोणत्या काळातले आहे, संदर्भीय घटनेशी कितपत संबंधित आहे याचा विचार केला जातो.

समकालीनता जिखली जाते. इतिहासाच्या साधनांची वर्गवारी केली जाते. त्यानुसार प्रामुख्याने दोन गटांत हि साधने विभागली जातात. पहिल्या गटात दुय्य्म दर्जाची साधने मोडतात. इतिहासाच्या साधनांचा हा दर्जा कशावर अवलंबून असतो हे आपण समजून घेतले पाहिजे.

प्रत्यक्ष घटना घडत असतांना जे पुरावे घटनास्थळी उपस्थित असतात. म्हणजेच गतकाळाच्या प्रसंगाचे प्रत्यक्ष साक्षीदार असतात, घटनेच्या काळातले ज्यांचे अस्तित्व निर्विवादपणे सिद्ध असते अशी साधने प्रथम दर्जाची साधने मानली जातात.

हि साधने पुरातत्वीय प्रकारातली आणि पुराभिलेखीय प्रकारातली असतात. न्यायालयीन प्रक्रियेत जसे प्रत्यक्ष साक्षीदाराच्या साक्षीला अनन्यसाधारण महत्व असते तसेच ते इतिहाससंशोधनातही असते.

२) दुय्य्म साधने

हजारो वर्षाच्या या वाटचालीत सगळ्याच घटनांच्या बाबतील प्रथम दर्जाची साधने उपलब्ध होतात असे नाही. कित्येकदा अशा साधनांमधूनहि अनेक गोष्टींचा उलगडा झालेला नसतो. सविस्तरपणे शोध घेतांना प्रथम दर्जाची साधने जशी हाती येतात, तशीच दुय्यम साधनेही हाती येतात.

घटना घडून गेल्यानंतर काही महिन्यांनी वर्षांनी किंवा शतकांनी त्या घटनेबद्दल कुणीतरी लिहून ठेवलेले असते. कुणाकडून तरी एकूण कुणीतरी दुसऱ्याला, दुसरा तिसऱ्याला सांगत असतो व हि माहिती अशी झिरपत जाते. हि माहिती प्रत्यक्षदर्शींची नसते. अशी नोंद हे दुय्य्म साधन ठरते.

Also read:

Tags: इतिहासाची साधने, Itihasachi Sadhane Marathi, लिखित साधने, भौतिक साधने, itihasachi sadhane swadhyay 7, 8, 9, 10, 11, 12.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *