इतिहास म्हणजे काय? | History Meaning In Marathi | What Is History In Marathi
इतिहास म्हणजे काय? – History Meaning In Marathi – itihas mhanje kay in marathi : नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला इतिहासा बद्द्ल संपूर्ण माहिती सांगणार आहे म्हणून पोस्ट पूर्ण वाचा आणि आवडल्यावर तुमच्या मित्रांना शेयर करायला विसरु नका धन्यवाद..

History Meaning In Marathi
History चा मराठीत अर्थ “इतिहास” असा होतो.
इतिहास म्हणजे काय? | History Information In Marathi | Itihas Mhanje Kay In Marathi
आपल्या समोरील घटना कशी घडली असणार? हे असे कसे झाले? असे प्रश्न आपण कायम विचारत असतो. हे प्रश्न जसे वैयक्तिक पातळीवर असतात तसेच सामूहिक पातळीवरही असतात. याच प्रकारच्या प्रश्नांचा शोध घेत हे असे असे घडले या स्वरूपात भूतकाळाची मांडणी करणारे सामाजिक शास्त्र म्हणजे इतिहास.
इतिहासाची व्याख्या मराठीत | इतिहास म्हणजे काय व्याख्या
इतिहास म्हणजे काय व्याख्या: इतिहासाचा नेमका अर्थ अगदी मोजक्या शब्दांत सूत्ररूपाने सांगणे म्हणजे इतिहासाची व्याख्या करणे.
1.इतिहास म्हणजे संस्कृतीचा उदयास्त अशी व्याख्या कोणी केली?
“इतिहास म्हणजे संस्कृतीचा उदयास्त” अशी व्याख्या अनॉर्ल्ड टॉयन्वी यांनी केली.!
इतिहासाची साधने म्हणजे काय?
इतिहास हे एक सामाजिक शास्त्र असल्यामुळे त्या शास्त्राच्या अभ्यासाची, प्रतिपादनाची एक सर्वसंमत अशी पद्धत असते. भूतकाळ म्हणजेच हजारो वर्षांपूर्वी किंवा अगदी नजीकच्या काळात म्हणजे गेलेल्या क्षणात, तासात, दिवसात, महिन्यात, वर्षात घडलेला एखादा प्रसंग किंवा घटना कशी घडली हे नेमकेपणाने इतिहास सांगतो. हे प्रतिपादन ज्याच्यावर आधारले असते त्या गोष्टींना इतिहासाची साधने म्हणतात.
इतिहासाची साधने कोणती आहेत? | इतिहासाचे प्रकार?
इतिहासाची साधने प्रामुख्याने दोन प्रकारची असतात. पहिला प्रकार वस्तुरूप साधनांचा ज्याला “पुरातत्त्वीय साधने” म्हणतात. दुसरा प्रकार “पुराभिलेखीय साधने”.
इतिहाससंशोधनाची व्यासपीठे :
इतिहास हे एक सामाजिक शास्त्र असल्यामुळे या क्षेत्रातही संशोधन हि एक सातत्याने चालू राहणारी प्रक्रिया आहे. साहजिकच अशा प्रकारच्या संशोधनासाठी व्यासपीठ निर्माण होण्याची प्रक्रिया अठराव्या शतकातच खरे तर सुरु झाली. एकोणिसाव्या शतकात या व्यासपीठाच्या निश्चित रूप घेतले. रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ लंडन या संस्थेच्या शाखा मुंबई, कलकत्ता, आणि मद्रासला स्थापन झाल्या. त्यांनी संशोधनाला वाहिलेली नियतकालिके प्रकाशित करायला सुरुवात केली. रॉयल एशियाटिक सोसायटीच्या संशोधनपत्रिकांच्या रूपाने एक व्यासपीठे उभे राहिले.
विसाव्या शतकातकच्या सुरुवातीच्या दशकामध्ये इंडियन हिस्ट्री काँग्रेस या नावाची संघटना अस्तित्वात आली. दरवर्षी डिसेम्बरच्या शेवटच्या आठवड्यात तीन दिवसीय अधिवेशने भरविण्याचा परिपाठ पडला आणि तो आजही चालू आहे. इतिहाससंशोधनाचा कस तपासला जातो तो या व्यासपीठावरून.
शेकडो निबंध सादर होतात, साधकबाधक चर्चा होते. इतिहासाची मांडणी, पुनर्मांडणी, चिकित्सा, विश्लेषण, विवेचन होत राहते. हि संथा तशी स्वयंपूर्ण संघटना आहे. संशोधनपर निबंधाचे खंड दरवर्षी प्रकाशित केले जातात. इतिहासाच्या क्षेत्रातील अलीकडचे संशोधन जाणून घेण्याचा मार्ग ह्या व्यासपीठावरून आणि त्याच्या प्रकाशनांतून जातो हे जाणून घेणे महत्वाचे आहे. राष्ट्रीय पातळीवरचे व्यासपीठ असे त्याचे स्वरूप आहे.
त्याशिवाय राज्य पातळीवर “महाराष्ट्र इतिहास परिषद” आणि विभागीय पातळ्यांवर “मराठवाडा इतिहास परिषद” “खान्देश इतिहास परिषद” “विर्दभा इतिहास परिषद” यांसारखी काही व्यासपीठेहि कार्यरत आहेत. त्यांच्या वार्षिक अधिवेशनांमधूनही संशोधनपर लेख सादर होतात. त्यांवर चर्चा होते. काहींचे संशोधनपर लेखांचे संग्रहही प्रकाशित झाले आहेत. तात्पर्य आपले संशोधन नवीन विश्लेषण, नवी मांडणी करण्याचे आणि ती मांडणी तपासून घेण्याचे एक महत्वपूर्ण स्थळ म्हणजे या इतिहास परिषदांची व्यासपीठे होत.
इतिहास परिषदांच्या या अधिवेशनांव्यतिरिक्त इतिहास संशोधनपत्रिकाच्या रूपाने आणखी एक व्यासपीठ असते. राष्ट्रीय पातळीवरच्या अशा काही ख्यातकीर्त संशोधनपत्रिका आहेत कि ज्या पत्रिकांमधील लेखांना, संशोधनाला मान्यता मिळते. इंडियन हिस्ट्री जर्नल या नावाची संशोधनपत्रिका गेली पाऊणशे वर्षे प्रकाशित होते आहे. अलीकडे गेल्या पाच पंचवीस वर्षात जर्नल ऑफ एन्शट इंडियन हिस्ट्री या नावाची एक संशोधनपत्रिका प्रामुख्याने प्राचीन भारतीय इतिहासाच्या संशोधनाला प्रकाशित करते. त्याशिवाय मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे भारतीय इतिहास आणि संस्कृती हे त्रैमासिक, डेक्कन कॉलेज रिसर्च बुलेटिंग संशोधक यांसारखी नियतकालिके हि इतिहाससंशोधनाच्या चर्चेची, वादसंवादाची व्यासपीठे होत.
इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टोरिकल रिसर्च या नावाची एक संथ, इतिहाससंशोधनाला प्रोत्साहित करण्याचे आणि संशोधनप्रकल्पांना आर्थिक साहाय्य करण्याचे कार्य गेली अनेक दशके करते आहे. त्याशिवाय निरनिराळ्या विद्यापीठांचे इतिहासविभाग, विद्यापीठ अनुदान आयोग यांच्या विद्यमाने राष्ट्रीय, प्रांतीय अशी चर्चासत्रे आणि परिषदा आयोजिली जातात. या सर्व व्यासपीठांवरून इतिहासाचे चिंतन होत असते.
इतिहासातील कालगणना या संकल्पना विषयी माहिती | कालगणना म्हणजे काय? | Kalganana Mhanje Kay In Marathi
कालगणना म्हणजे : गतकालीन घटनांना कालबद्ध चौकटीत नेमके बसवणे म्हणजे कालगणना होय. फार फार वर्षांपूर्वी या वाक्याने एखाद्या काल्पनिक कथेचा प्रारंभ होतो तर इतिहासात फार फार वर्षांपूर्वीचा नेमका संदर्भ म्हणजे नेमके केव्हा, कोणत्या वर्षी, दिवशी हे अभिप्रेत असते. गतकालीन घटनांना कालबद्ध चौकटीत नेमके बसवणे म्हणजे कालगणना होय. गतकालीन स्मृतींना, घटनांना कालबद्ध चौकटीत बसवून त्या आधारे आपली गतकालीन हजारो, शेकडो वर्षाची वाटचाल रेखाटने हा प्रगत मानवी जीवनाचा विशेष राहिला आहे.
अगदी प्रारंभी, प्राथमिक अशा रानटी अवस्थेत कालगणनेचा विचारही नव्हताच. तरीही माणसाचे बालपण, प्रौढत्व, म्हातारपण, मरण या अवस्था होत्याच. काळ होताच त्याच्या अस्तित्वाचे प्रत्यन्तर यायचेच. छोटे रोपटे, झाड, प्रचंड वृक्ष हि प्रक्रिया दिसायचीच. सूर्याचे भ्रमण होतेच. दिवस रात्र होत होतेच. या भ्रमणातून काळाची संकल्पना सुचली असावी. दिवस आणि रात्र प्रकाश आणि काळोख हे काळाच्या वाटचालीतले स्पष्ट असे दोन संकेत. कदाचित त्यांतून काळाची मोजदाद सुरु झाली. इतक्या दिवसांपूर्वी इतक्या रात्रींनपूर्वी असे घडले अशा स्वरूपातल्या स्मृती कदाचित माणसाने जागवल्या.
कालांतराने दिवस रात्रीचा नेमका अर्थ या सृष्टीच्या निर्मितीचा वेध सूर्य आणि चंद्राच्या भ्रमणाचा शोध पृथ्वीचे स्वतःच्या आसाभोवती फिरणे या गोष्टींचे ज्ञान माणसाला होत गेले आणि सातत्याने प्रवाही असलेला हा काळ अधिक नेमकेपणाने संबोधलं जाऊ लागला. अंतराळातल्या ग्रहताऱ्यांचा खगोलशास्त्रीशोध घेतला गेला. त्या आधारे प्राचीन ग्रीक , रोमन , इजिप्शियन आणि भारतीय संस्कृतींनी लक्षावधी वर्षाच्या वाटचालीची कालगणना करायला प्रारंभ केला. भारतातील पौराणिक कालगणना रूढ झाली. अशाच प्रकारच्या लक्षावधी वर्षाच्या कालगणना जगातल्या इतर प्राचीन संस्कृतींनीही जोपासल्या.
भौतिक जगातल्या वाटचालीतील काही घटना प्रसंग चिरसमरणीय ठरले. मानवी समाजमनाने ते प्रसंग आपल्या स्मृतीत शेकडो वर्षे जोपासले व त्यावरून त्यांनी कालमापन कालगणना सुरु केली. हि प्रक्रिया देखील जगभरातल्या संस्कृतीत घडत आली.
कालगणनापद्धती :
दिवस, आठवडा, महिना, वर्ष आणि शतक नव्हे आता तर सहस्रक या शब्दांमधून आपण कालगणना करीत असतो. आठवड्याच्या सात दिवसांना आणि वर्षाच्या बारा महिन्यांना नवे दिलेली आहेत. इंग्रजी भाषेतली नवे हि ख्रिस्ती कालगणनेवर आधारलेली आहेत. येशू ख्रिस्ताचा जन्म हि या भौतिक जगातली ख्रिस्ती धर्मियांच्या दृष्टीने सर्वात महत्वपूर्ण घटना. या घटनेच्या स्मृती ख्रिस्ती जगताने जोपासल्या. ती घटना आधारभूत मानून, त्या घटनेच्या अगोदर म्हणजे ख्रिस्तपूर्व किंवा इसवी सण या शब्दांत भूतकाळ रेखाटला जाऊ लागला. आफ्रो आशियायी खंडातील अनेक देशांमध्ये युरोपिय देशांच्या वसाहती स्थापन झाल्या. परिणामी युरोपात प्रचलित असलेली ख्रिस्ती कालगणना आफ्रो आशियायी देशांतही रूढ झाली. आपल्या देशातही ख्रिस्ती कालगणनेतले तारीख महिने वर्ष वापरात आहे. असे असले तरी कॅलेंडरवर आणखी काही कालगणनापद्धतीतील नोंदी असतात. शक, संवत, हिज्र आणि फसली या कालगणनाही आज प्रचलित आहेत.
शालिवाहन शक कालगणना गेल्या जवळजवळ दोन हराज वर्षांपासून आपल्या देशात प्रचलित आहे. इसवी सणाच्या ७८ मध्ये पैठणच्या सातवाहन नृपतींनी हि कालगणना सुरु केली असे मानले जाते. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ हे मराठी महिने याच कालगणनेशी संबंधित आहेत. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार हे आठवड्याचे दिवस याच कालगणनेतले. या कालगणनेत प्रत्येक वर्षालाही नाव दिलेले असते विशिष्ट नावाचे संवत्सर म्हणून ते संबोधले जाते. भारतीय कालगणना प्रामुख्याने पंचांगी असते म्हणजे भारतीय कालगणनेची पाच अंगे असतात , ती पंचागात स्पष्ट केलेली आढळतात. वर, तिथी, नक्षत्र, योग्य आणि करणं हि कालगणनेची पाच अंगे होत.
विक्रम संवत हि कालगणना उज्जेनीच्या विक्रमादित्य या नृपतीच्या नवे इसवी सनपूर्व ५८ मध्ये सुरु झाली असे मानले जाते. हि कालगणनादेखील भारतात गेली दोन हजार वर्षे प्रचलित आहे. गेल्या शंभर वर्षात या कालगणनांचा वापर कमी होऊन ख्रिस्ती कालगणना वापरली जातेय. पण प्राचीन शिलालेखांमधून, ताम्रपटांमधून किंवा गेल्या तीनचारशे वर्षातल्या कागद्पत्रामधून, शिवकालीन कागदांमधून शक किंवा विक्रम संवत कालगणनेतील तिथी, वर, नक्षत्रांची नोंद असते.
हिजरी कालगणना प्रथम मध्य आशियात रूढ झाली. इस्लाम धर्म संथपक हजरत महंमद पैगंबर यांच्या आयुष्यातील एका महत्वपूर्ण घटनेशी हि कालगणना संबंधित आहे. महंमद पैगंबरांनी मक्केहून मदिनेला हिज्र केले म्हणजे प्रयाण केले हि घटना इस्लामी जगतात महत्वपूर्ण ठरली. इसवी सणाच्या ६२२ पासून हि कालगणना तिकडे प्रचारात आली. भारतातही गेल्या चारपाचशे वर्षांपासून हि कालगणना रूढ आहे.
फसली हि कालगणना मोगल बादशहा अकबराच्या काळात सुरु झाली. इस १५५६ साली राज्यारोहनानिमित्त हि कालगणना सुरूझाली आणि मोगल साम्राज्यात व त्यातून पुढे इतर छोट्यामोठ्या संथनातून वापरात राहिली. मराठी स्वराज्यातही शिवराज्यभिषेक शक सुरू झाला होता. हस्तलिखित कागदपत्रांतून त्याचे उल्लेख आढळतात.
कालखंडानुकरण :
लक्षावधी वर्षांच्या वाटचालीत असे काही प्रसंग आले. घटना घडल्या, वैचारिक स्फुल्लिंगे फुलली किंवा नवी संकल्पना मानवी मनात आली कि ज्यामुळे मानवाच्या जीवनात आमूलाग्र बदल घडला. जीवनाचे स्वरूपाचं बदलले. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास नवे युग अवतरले नवा कालखंड सुरु झाला. हा नवा कालखंड किंवा युग पुढे अनेक शतके टिकले. पुन्हा अशी काहीतरी विलक्षण, चिरंतन टिकणारी घटना घडेपर्यंत नव्या प्रसंगाने विलक्षण अशा एखाद्या शोधाने गतयुगाला मागे टाकले. आणि मानवी समाजाने नव्या युगाचे स्वागत केले.
गतकालीन वाटचालीत अशी अनेक युगे येऊन गेली. हे युग म्हणजे एक प्रकारचा गतकालीन वाटचालीचा एक स्थिरावलेला कालखंड. परिथितीचा एक टप्पा अनेक शतकांचा कित्येकदा सह्स्र्कांचा आणि लक्षावधी वर्षांचाही. मानवी जीवनाच्या वाटचालीतला पहिला कालखंड आहे तो पाषाणयुग. लक्षावधी वर्षे या पृथ्वीवरचा माणूस पाषाणयुगात वावरला. रानटी अवस्थेतल्या या माणसाने पाषाण म्हणजेच दगडाची सारी आयुधे वापरली, शस्त्रे वापरली. दगडाची हत्यारे वापरून शिकार करून माणूस जगत राहिला. हि अवस्था पाषाणयुग या नावाने ओळखली जाते. याच युगात कदाचित अग्नीचा वापर त्याला कळला आणि कच्चे मांस खाणारा माणूस आता मांस भाजून खाऊ लागला. त्याची प्रगती झाली ती एवढीच माणसाला तांबे ह्या धातूचे ज्ञान झाले आणि तो दगडाबरोबर आता तांब्याचाही वापर करू लागला.
प्रगतीच्या या टप्प्याला ताम्रपाषाणयुग म्हणतात त्यानंतर कांस्य आणि लोहयुग अवतरले. लोखंडासारख्या कठीण धातूचे ज्ञान माणसाला झाले आणि त्याच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला. लोखंडाची अवजारे त्याने शोधली, लोखंडाची हत्यारे बनवली. चाकाचा शोध लागला. रानटी अवस्थेतला माणूस लोहयुगात एक अत्यंत प्रगत अशा टप्प्यावर येऊन ठेपला.
गतकाळाच्या पाऊलखुणा अधिक स्पष्टपणे उमटू लागल्या. समाज संघटित झाला. रानटी अवस्था संपली शब्द अक्षरबद्ध झाला. लिखित स्वरूपातले शिलालेख लिहिले जाऊ लागले. सिंधू संस्कृतीत शिक्यांवरही क्ष्रे आढळली आहेत. तात्पर्य, मानवी जीवनाच्या ऐतिहासिक कालखंडाची वाटचाल या टप्प्यावर सुरु होते. इतिहासपूर्व कालखंड म्हणजे हा पाषाणयुग, ताम्रपाषाणयुग, लोहयुग होय. यानंतर ऐतिहासिक कालखंड सुरु होतो.
जगातल्या सर्व देशांची ऐतिहासिक वाटचाल या तीन टप्प्यांतून रेखाटली जाते. प्रबोधनाच्या चळवळीमुळे पाश्चात्य जग मध्ययुगातून आधुनिक युगात आले. या प्रबोधनाने बुद्धिप्रामाण्य, विवेकनिष्ठा आणि वैज्ञानिक दृष्टी दिली. माणूस हा विचाराचा, कार्यकर्तृत्वाचा केंद्रबिंदू बनला. माणसातले कर्तृत्व जागवले गेले. परिमाणी आधुनिक युग अवतरले. इथे युग आणि कालखंड हे समानार्थी शब्द म्हणून वापरले जातात. लक्षावधी वर्षाच्या वाटचालीत जेवढी परिवर्तने घडली नसतील तेवढी परिवर्तने, प्रगती आधुनिक युगातल्या गेल्या पाचशे वर्ष्याच्या वाटचालीत घडून आली आहे. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जगाणे यंत्रविज्ञानाच्या क्षेत्रात प्रचंड प्रगती केली आणि यंत्रयुग अवतरले. टीव्ही आणि कॉम्पुटरच्या वापरामुळे डॉट कॉम आणि इंटरनेटमुळे तर जग माहितीयुगात प्रवेशले आहे. पाषाणयुगापासून यंत्रयुगापर्यंतची नव्हे माहितीयुगापर्यंतची हि वाटचाल कालखंडानुकरणामुळे, युग संकल्पनेमुळे अधिक स्पष्ट होते.
also read :
- ICT Information In Marathi
- Spam Information In Marathi
- Cryptocurrency Meaning In Marathi
- What is Bitcoin in Marathi
- F.Y.B.A Marathi Books PDF
- My School Essay in Marathi
- 200+ Best Funny Wifi Passwords
FAQ
[sc_fs_faq html=”true” headline=”h3″ img=”” question=”History Meaning In Marathi?” img_alt=”” css_class=””] History चा मराठीत अर्थ “इतिहास” असा होतो. [/sc_fs_faq] [sc_fs_faq html=”true” headline=”h3″ img=”” question=”इतिहासाची व्याख्या मराठीत?” img_alt=”” css_class=””] इतिहासाचा नेमका अर्थ अगदी मोजक्या शब्दांत सूत्ररूपाने सांगणे म्हणजे इतिहासाची व्याख्या करणे. [/sc_fs_faq] [sc_fs_faq html=”true” headline=”h3″ img=”” question=”इतिहास म्हणजे संस्कृतीचा उदयास्त अशी व्याख्या कोणी केली?” img_alt=”” css_class=””] इतिहास म्हणजे संस्कृतीचा उदयास्त अशी व्याख्या “अनॉर्ल्ड टॉयन्वी” यांनी केली.! [/sc_fs_faq] [sc_fs_faq html=”true” headline=”h3″ img=”” question=”इतिहासाचे प्रकार?” img_alt=”” css_class=””] इतिहासाचे दोन प्रकार असतात. पहिला प्रकार वस्तुरूप साधनांचा ज्याला “पुरातत्त्वीय साधने” म्हणतात. दुसरा प्रकार “पुराभिलेखीय साधने”. [/sc_fs_faq]