Section IPC 354 In Marathi 354 कलम माहिती IPC 354A In Marathi – IPC 354B In Marathi – IPC 354C In Marathi – IPC 354D In Marathi : नमस्कार मित्रांनो, कलम 354 व कलम 354अ म्हणजे काय? या बद्द्ल संपूर्ण माहिती सांगणार आहे म्हणून पोस्ट पूर्ण वाचा जेणेकरून तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती मिळेल आणि पोस्ट आवडल्यावर तुमच्या मित्रांना शेयर करायला विसरु नका धन्यवाद..

ipc 354 in marathi, IPC 354A In Marathi, IPC 354B In Marathi, IPC 354C In Marathi, IPC 354D In Marathi
(ipc 354 in marathi)

IPC 354 In Marathi 354 कलम माहिती

३५४. स्त्रीचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने तिच्यावर हमला किवा फौजदारीपान्र बलप्रयोग करणे.

जर कोणी कोणत्याही स्त्रीवर हमला किवा फौजदारीपात्र बलप्रयोग केला आणि तिचा विनयभंग करण्याचा त्यामागे उद्देश असेल किवा त्यामुळ आपल्याकड्न तसा विनयभंग होण्याचा संभव असल्याची त्याला जाणीव असेल तर त्याला, एक वर्षपिक्षा कमी नाही आणि जी पाच वषेपर्यत वाढविता येईल अशी कारावासाची शिक्षा देण्यात येईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र ठरेल.

टीप : कलम ३५४ मध्ये सुधारणा करण्यात आली असून, स्त्रीचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने तिच्यावर हमला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग करणारास, कोणत्याही वर्णनाचा पाच वर्षेपर्यतचा कारावास आणि द्रव्यदंड अशी शिक्षा सांगितली आहे. कमीत कमी कारावास एक वर्ष आणि द्रव्यदंड अशी तरतूद केली आहे. ही सुधारणा फोजदारी कायदा (सुधारणा) अधिनियम २०१३ (२०१३ चा १३) अन्वये करण्यात आली आहे. हा अपराध दखलपात्र अजामीनाचा असून, कोणत्याही दंडाधिकाच्यापुढे चालणारा आहें.

टीप १ : या कलमात दोन प्रकारचे गुन्हें एकत्र केले आहेत. १ हमला [ASSAULT} २ फोजदारी पात्र बलप्रयोग [CRI. FORCE] हे दोन्ही अपराध स्त्रीचा विनयभंग करण्याकरता केले जातात तेव्हा शिक्षा कलम आहे.

टीप २ : या कलमाचे महत्त्वाचे घटक :
(१) आरोपीं हमला अगर फोजदारीपात्र बलप्रयोग करतो.
(२) तो स्त्रीवर विनयभंग करण्याकरता असतो.
(३) तसा उद्देश अगर जाणीव असते.

टीप ३ : स्तरी याचा अर्थ : आय, पी. सी, कलम दहा प्रमाणे कोणत्याही वयाची स्त्री. कुमारी, विवाहित, विधवा वगैरे, वयाची अट नाही, पाहा “मेजर सिंग'”A. I. R. १९६७. S. C. ६३ या घटनेत खोलीत ७-७॥। महिन्यांची लहान मुलगी झोपलेली होती, तिचिवर विनयभंग केला आणि तो गुन्हा ठरविण्यात आला.

टीप ४ : काही न्यायनिवाडे : पुढील न्यायनिवाडे या कलमाचा अर्थ समजण्याकरता मार्गदर्शक ठरावेत. (१) विवाहित स्त्रीला ओढून सलवारीची नाडी सोड़ू लागला : या घटनेत आरोपीने वरील कृत्य केल्यामुळे स्त्रीने त्याला विरोध दर्शविला आणि आरोपी पळाला. तर हा कलम ३५४ चा अपराध झाला. पाहा “रामेश्वर’ १९८४Cr.L.J ७८६ (P and H.) तसेच “राम आसरे -वि- यु. पी. स्टेट’ १९९० CF. L, J ০५ यात हायकोर्टानि केस आपसात मिटविण्याची परवानगी दिली. (२) स्त्रीवर बलात्कार : या घटनेत दोन आरोपीनी स्त्रीचे घरातच तिला ओढ़न बलात्कार केला असे म्हणणे होते. पण वैद्यकीय तपासणीत स्त्रीचे कपड्यावर रेताचे डाग मिळाले पण त्या आरोपीच्या कपड्यावर नव्हते. विवाहित ख्री असल्याने तिचे कपड्यावर रेताचे डाग मिळाले याला महत्त्व नाही. त्यामुळे बलात्काराएऐवजी या कलमाखाली शिक्षा झाली. पाहा “राज्य सरकार -वि- मुसा’ १९९१ Cr. L. J RR620rissa. (३) मजुरांना पो. स्टे, मध्ये अणले : या घटनेत काही मज्रांना पोलं स्टेशनमध्ये आणले. त्यांत काही ख्त्री मजूर होत्या. पैकी एका स्त्री विवत्र आणि काठीने झोडपण्यात आले, तेव्हा हा अपराध घडला पाहा “पिपल्स युनियन फॉर डेमॉक्रेंटिक राईटस् -वि- पोलीस कमिशनर, दिल्ली. ” (१९८९) ४ S. C.C 93O सदरची घटना सुप्रीम कोटात राज्य घटनेच्या अनुच्छेद ३२ अन्वये याचिका देऊन दाद मागितली त्यात सदर स्त्रीस नुकसान भरपाई देण्याचा हकूम झाला. ती रक्कम संबंधी अधिकार्यांचे पगारातून घेण्याचा हुकूम करण्यात आला. (४) शाळा मास्तर आणि विद्यार्थिनी : या घटनेत शिक्षक एका विद्यार्थिनीचा शिकविणे म्हणून गैरफायदा घेऊन विनयभंग करतो तर हा अपराध घडला. पाहा fHa oH’ (2c o9) Russ and Ry 30 (५) ख्तरी पेशंट आणि डॉक्टर : पेशंट तपासणी या नावाखाली नग्न करून तपासले. तर हा अपराध होतो. पाहा रोसिकी केस’ (१८२४) १ Mood Cr. C. १९ (६) मुलीचे कपडे काढले जवळ बसला : या घटनेत आरोपीने एका मुलीचे कपडे काढले, फेकून दिले आणि तो तिच्या जवळ बसला आणि तीस काही बोलला नाही आणि काही केले नाही. हा अपराध घडला, पाहा “नुना (१९१२) १३ PL. R. 240 THT 2? Cr, L. J. %Ęg.

टीप ५ : स्त्री देखील स्री विरुद्ध आरोपी : या कलमाप्रमाणे काही प्रसंगी स्त्री देखील दुस्या स्त्रीचा विनयभंग करू शकते. कारण आय. पी. सी. कलम ८ प्रमाणे तो याचा अर्थ ती देखील होतो.

टीप ६ : आदिवासी अत्याचार प्रतिबंध कायदा १९८९ : स्त्रीयांबाबत तर कलम ३ (३) प्रमाणे कडेक शिक्षा विनयभंग-नग्न मिरवणक करता आहे. तसेच अलीकडे या कायहद्याखाली महाराष्ट्र सरकारने यु. टी. ए- १०९५ प्र. क्र. १०९/यावक-२/२४-९ १९९७ नुसार नुकसान भरपाई जाहीर केली आहे. प्रसिद्धी ३१ मार्च १९९८ च्या वर्तमान पत्रात दिली आहे.

टीप ७ कार्यपद्धती : अपराध दखलपात्र जामीनपात्र प्रथम वर्ग न्यायाधीशापढ़े चालणारा आहे. क्रि. प्रो. कोड कलम ३२० (२) प्रमाणे कोटोच्या संमतीने आपसात मिटविता येतो. स्त्रीचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने बलप्रयोग (क. ३५४) यावरील सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा : (१) तारकेश्वर साहू वि. बिहार (झारखंड) राज्य (२००९ ) ८ SCC ५६ ० या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट् केले आहे की, Modesty म्हणजे स्त्रीची सलज्जता/सभ्यता. स्त्री म्हणजे कोणत्याही वयाची खी. मात्र ज्या ठिकाणी अशा कृत्यास स्त्रीची संमती असेल तेथे सलज्जतेचा अपमान झाला असे होणे शक्य नाही. (२) एक गाजलेला खटला : के.पी. एस. गिल आणि रूपन देवल बजाज वि. चंदीगढ (२०० ६) ६ sCC १६१ या गाजलेल्या केिसमध्ये के.पी.एस. गिल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस यांनी एका डिनर पार्टीमध्ये अर्जदार स्त्रीला आपल्या शेजारी बसण्यास सांगितले. यात काहीतरी गैर आहें असे समजून ती स्त्री दूर जाऊन बसली. गिल तेथून उठले आणि तिच्याजवळ जाऊन खुणेने आपल्या शेजारी येण्यास तिला सांगितले. त्या स्तरने गिलच्या अशा वागण्याबद्दल हरकत घेतली व त्यांना तेथून निघून जाण्यास सांगितले. यावर हुकर्मी आवाजात गिल यांनी तिला त्याच्याबरोबर येण्यास सांगितले. मग त्या स्त्रीच भीतीपोटी तेथून जाण्याचे ठरविले. पण तिला अडवून सगळ्यांच्या समोर गिल यानी तिला पारश्रंभागावर थोपटले. त्या स्रीने यावर FIR दाखल केला, पण उच्च न्यायालयाने दखलपात्र गुन्हा नाही ह्या कारणास्तव FIR काढून टाकला. सर्वच्च न्यायालयाने मात्र अभिनिर्धारीत केले की, स्त्रीच्या सलज्जतेचा/सभ्यतेची अवमान कोणत्याही परिस्थितीत क्षुल्लक / किरकोळ आहे असे मानता कामा नये, त्यामुळे उच्च न्यायालयाने ‘अपराध किरकोळ स्वरूपाचा आहे’ म्हणून FIR काढून टाक्णे हे बेकायदेशीर आहे (३) अमन कुमार वि. हरियाणा राज्य २००४ CrL.J. १३९९ (SC) या केसमध्ये सरवोच्च न्यायालयाने अभिनिर्धारीत केले की, एखाद्या स्त्रीला ओढून समागमाची विनंती करून तिचे कपडे काढणे म्हणजेच तिच्या सलज्जतेचा अवमान करणे होय, पण हा बलात्काराचा प्रयल नव्हे. कारण ‘सलज्जतेचा अवमान हे कारण क. ३५४ खाली गुन्हां ठरण्यास पुरेसे आहे. सलज्जतेचा अवमान म्हणजेच विनयभंग! अनुसूचित जाती- जमातीचे बाबतीत सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा : (३) विद्याधरन वि. केरळ राज्य २००४ CrL.J, ६०५ (SC) या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण केले आहे की, अनुसूचित जाती- जमातीच्या स्त्रीला तिच्या सभ्यतेचा अवमान करण्यासाठी धक्काबूक्की करणे हा अनुसूचित जोती-जमाती कार्यदा १९८९ क. ३ (1) (XI) प्रमाणे गुन्हा आहेच, पण (IPC) क. ३५४ प्रमाणे तो अधिक गंभीर गुन्हा आहे. महत्त्वाचे म्हणजे त्या १९८९ च्या कायद्यातही ‘स्त्रीचा अवमान’ हा शिक्षापात्र गुन्हा आहे.


IPC 354A In Marathi 354 अ कलम माहिती

३५४. अ लैंगिक छळवणुकीसाठी शिक्षा.

एखादा मनुष्य खालीलपैकी कोणतीही कृती करीत असेल –
(१) शरीरस्पर्श आणि नकोसे वाटणा्या स्पष्ट लैंगिक संबंधासाठी मैत्री संपादन करण्याचा प्रयत्न; किवा
(२) लैगिक मेहेरनजर करण्याची मागणी किंवा विनंती; किंवा
(३) एखाद्या ख्त्रीच्या इच्छेविरुद्ध तिला बीभत्स/ अश्लील साहित्य दाखविणे (साहित्य म्हणजे लेख, चित्रे, इ.); किंवा
(४) अश्लीलतापूर्ण उल्लेख करणे, अश्लील बोलणे. तर तो लैगिक छळवणुकीच्या गुन्हासाठी दोषी ठरेल.
(२) जो कोणी पोटकलम (१) च्या खंड (१) किंवा (२) किंवा (३) मध्ये स्पष्ट केलेला अपराध करील, त्याला तीन वर्षेपर्यंत सश्रम कारावास
किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षा दिल्या जातील.
(३) जो कोणी पोटकलम (१) च्या खंड (४) मधील अपराध करील त्याला कोणत्याही एका वर्णनाची एक वर्षेपर्यंतची कारावासाची किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्हीही शिक्षा दिल्या जातील.

टीप : या कलमामध्ये लैगिक संबंधासाठी मैत्री आणि शरीरस्पर्श, लैगिक मेहेरनजर करण्याची मागणी आणि अश्लील साहित्य दाखविणे है गंभीर स्वरूपाचे अपराध मानले गेले असून, त्यास तीन वर्षेपर्यत कारावास आणि/ अरथवा द्रव्यदंड अशा शिक्षा सांगण्यात आलेल्या आहेत, तर अश्लील शेरे मारणे किवा बोल्णे यासाठी एक वर्षपर्यंत कारावास आणि/अथवा द्रव्यदंड अशी शिक्षा सांगितली आहे. हा अपराध दखलपात्र, जामीनपात्र व खटला कोणत्याही दंडाधिकाच्यापुढ्े चालेल.


IPC 354B In Marathi 354 ब कलम माहिती

३५४. ब स्त्रीला विवत्तर करण्याच्या उद्देशाने हिंर्र हल्ला करणे किंवा गुन्हेगारी (स्वरूपाचा) बलप्रयोग करणे.

जो कोणी स्त्रीला विवस्त्र करण्याच्या उर्देशाने तिच्यावर हिंसक हल्ला करील किंवा असा हल्ला करण्यास साहाय्य करील किवा तिला नग्न होण्यासाठी सक्ती करील, त्याला कोणत्याही एक वर्णनाचा तीन वर्षाहून कमी नाही पण सात वर्षेपर्यंत वाढविता येईल इतक्या कारावासाची शिक्षा दिली जाईल. आणि तो द्रव्यदंडाच्या शिक्षेसही पात्र ठरेल.

टीप : कोणत्याही स्त्रीला विवस्त्र होण्यासाठी तिच्यावर हिंसक हल्ला करणे किंवा असा हल्ला करण्यासाठी साहाय्य करणे हे २०१३ च्या १३ द्या (सुधारणा) कायद्यान गुन्हा असून, असे कृत्य करणारास किवा स्त्रीला नग्न होण्यासाठी सक्ती करणारास ह्या (सुधारणा) कारयद्याने शिक्षापात्र गुन्हा ठरविले आहे. अशा गुन्ह्यास सात वर्षेपर्यंत कोणत्याही एका वर्णनाचा कारावास आणि द्रव्यदंड अशी शिक्षा सांगितलेली
आहे. अपराध अदखलपात्र, बिगर जामीनाचा, कोणत्याही दंडाधिकाच्यापुढ़े चालणारा.


IPC 354K In Marathi | IPC 354C In Marathi 354 क कलम माहिती

३५४. क स्त्रीच्या अवयवांकडे बधून नैसर्गिक कृती करताना बघून लैगिक समाधान मिळविणे.

स्त्रीला नेहमी असे वाटत (अपेक्षा) असते की, खासगी कृती करताना आपल्याला दुष्कृत्य करणारा किवा त्याच्या वतीने दुसरा कोणी बघत नाही किंवा तशी खासगी कृती करताना बधितल्याचा बभ्रा (प्रचार) करीत नाही, अशा परिस्थतीतं जो कोणी त्या स्त्रीला खासगी कृती करताना बघेल (निरीक्षणा/ छबी) करील किंवा तिची तशी प्रतिमा नजरेत घेईल त्याला पहिल्या गुन्ह्याकरिता, कोणत्याही एका वर्णनाचा एक वर्षापिक्षा कमी नाही, पण तीन वर्षेपर्यंत वाढेल अशा कारावासाची आणि द्रव्यदंडाची शिक्षा होईल आणि अशाच प्रकारच्या दुस्या किवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी कोणत्याही एका वर्णनाचा तीन वर्षंहून कमी नाही; परंतु सात वर्षेपर्यंत असेल असा कारावास आणि द्रव्यदंडाची शिक्षा होईल.

स्पष्टीकरण १: ह्या कलमाकरिता ‘खासगी कृती’ (Private act) या शब्दांमध्ये अशा कृत्यांचा समावेश होतों की जे करताना सामान्यतः गुप्तता किंवा खासगीपणा राखला जातो आणि तसे करीत असताना त्या व्यक्तीचे जननेंद्रिय, नितंब किंवा स्तन आच्छादित असतात किंवा फक्त अंतर्वख्व्राने आच्छादित असतात किंवा ती व्यक्ती प्रसाधनगृहाचा वापर करीत असते किंवा लिंगसंबंधित कृती करत असते की जी सामान्यतः सर्वासमोर केली जात नाही.

स्पष्टीकरण २: (लैगिक शोषणाला) बळी पड़लेल्या व्यक्तीने आपली (तशी) छबी पकडण्यास/ बघण्यास संमती दिलेली असेल पण त्रयस्थ व्यक्तीला दाखविण्यास संमती दिलेली नसेल, तर (त्रयस्थ व्यक्तीला ती दाखत्िणे किंवा) असा फैलाव किंवा बभ्रा या कलमाखाली गुन्हा समजला जाईल.

टीप : स्त्रीयांच्या अवयवांकडे बघून लैंगिक समाधान मिळवणाचया अपराध्यांना शिक्षा सांगणारे कलम अहे. नैसगिक कृत्य करताना म्हणजे सामान्यपणे शौच किंवा लघवी करौत असताना आपल्याला कोणी बघत नाही अशी प्रत्येक स्त्रीची कल्पना असते. तीच बाब लैंगिक कृत्याच्या बाबतीतही आहे, नैसर्गिक किवा लैंगिक कृत्य करीत असताना तिला बरघणे/ न्याहाळणे, त्याचप्रमाणे दुसच्या व्यक्तीला तसे करण्याससांगणे किंवा त्याबाबत इतरांकडे बभ्ना करणे हा गुन्हा आहे, हे स्पष्ट करणारे कलम आहे. कलमाखाली दिलेल्या स्पष्टीकरणांमध्ये ‘खासगी कृती’ म्हणजे नैसर्गिक कृत्य असे स्पष्ट केले आहे. त्त्रीचे जननेंद्रिय, नितंब किंवा स्तन अनाच्छादित असताना ते बघणे, दुसन्याला बघण्यास सांगणे, आणि बघितल्याचे सांगणे हा या कलमाखाली गुन्हा आहे. हा अपराध दखलपात्र, जामीनपात्र आणि खटला कोणत्याही दंडाधिकार्यापुढे चालणारा आहे.


IPC 354D In Marathi 354 ड कलम माहिती

३५४. ड स्त्रीचा पाठलाग (stalking).

जो कोणी (१) एखाद्या स्त्रीने स्पष्टपणे तटस्थता दर्शविली किवा स्वारस्य दर्शविले नाही तरी तिचा पाठलाग करतो आणि तिच्याशी संपर्क साधतो किंवा तिच्याशी वैयक्तिक परस्परसंबंध वृ्धिंगत करण्याचा प्रयत्न करतो; किवा (२) एखा्या स्त्रीने केलेल्या इंटरनेट किंवा इ-मेल किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक संपर्क माध्यमांवर बारकाईने लक्ष ठेवून असतो. -त्याने स्त्रीचा पाठलाग केल्याचा गुन्हा केला आहे (असे समजले जाते.) मात्र जर ती व्यक्ती हे सिद्ध करील की, (१) असा पाठलाग, गुन्हा रोखण्यासाठी आणि गुन्हा अन्वेषणासाठी होता आणि पाठलाग केल्याचा आरोप केलेल्या व्यक्तीवर शासनाने गुन्हा रोखण्याची आणि गुन्हा अन्वेषणाची जबाबदारी सोपविली होती, किंवा (२) असा पाठलाग कायद्यानुसार होता किवा कोणत्यातरी परिस्थितीनुखूप होता किंवा कायद्याने सोपविलेल्या आवश्यकतेनुसार होता, किंवा (३) वैशिष्ट्पूर्ण परिस्थितीमध्ये तसे वागणे योग्य आणि न्याय्य तर या कलमाप्रमाणे हा लपूनछपून पाठलागाचा गुन्हा होते, ठरणार नाही.

(२) जो कोणी गहिलेच्या पाठलागाचा, तिच्यावर पाळत ठेवण्याचा, तिची इच्छा नसताना ओळख करण्याचा इ. गुन्हा करील त्यास कोणत्याही एका वर्णनाची तीन वर्षपर्यंत वाढविता येईल इतक्या कारावासाची शिक्षा होईल आणि त्यास द्रव्यदंडाचीही शिक्षा होईल. दुसन्या किंवा त्यानंतरच्या गुन्हयासाठी कोणत्याही एका वर्णनाचा पाच वर्षेपर्यंत कारावास आणि द्रव्यदंड अशी शिक्षा होईल.

टीप १ : स्त्रीचा/महिलेचा पाठलाग करणे, तिच्यावर पाळत ठेवणे, तिची इच्छा नसताना ओळख काढून परस्परसंबंध वाढविण्याचा गुन्हा करणे किवा तसा प्रयत्न करणे हा फोजदारी कायदा (सुधारणा) अधिनियम (२०१३ चा १३) अन्वयं गुन्हा ठरविण्यात आला आहे. संगणकीय माध्यमातून अशी ओळख वाढविणे हादेखील गुन्हा ठरविण्यात आला आहे.

टीप २ : अशा पहिल्या गुन्ह्मासाठी तीन वर्षेपर्यत कारावास आणि द्रव्यदंड दुसर्या व त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी पाच वर्षेपर्यत कारावास आणि द्रव्यदंड अशी शिक्षा सांगितलेली आहे. हा अपराध पहिल्या गुन्ह्यासाठी दखलपात्र, जामीनाचा व दुसन्या गुन्ह्यासाठा व दखलपात्र अआणि बिगरजामीनाचा आहे. खटला कोणत्याही दंडाधिकान्यापुढे चालेल.

#TAGS: 354 कलम माहिती, ipc 354 in marathi, ipc 354 in marathi pdf, ipc 354 b in marathi, ipc 354 d in marathi, ipc 354 c in marathi, ipc 354 new amendment in marathi, indian penal code 354 in marathi, what is ipc 354 a, कलम 354 अ माहिती मराठी, कलम 354 ड, कलम 354 ब, कलम 354 शिक्षा, कलम 354 ड माहिती मराठी, धारा 354 से बचाव.