कलम 34 माहिती मराठी, 34 Kalam In Marathi, IPC 34 In Marathi : नमस्कार मित्रांनो, कलम 34 बद्द्ल संपूर्ण माहिती सांगणार आहे म्हणून पोस्ट पूर्ण वाचा जेणेकरून तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती मिळेल आणि पोस्ट आवडल्यावर तुमच्या मित्रांना शेयर करायला विसरु नका धन्यवाद..

कलम 34 माहिती मराठी, 34 Kalam In Marathi, IPC 34 In Marathi
IPC 34 In Marathi

कलम 34 माहिती मराठी | 34 Kalam In Marathi | IPC 34 In Marathi

कलम 34 :- समान उद्देश साध्य करण्याकरिता अधिक व्यक्तीनी केलेल्या कृती. जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्तींनी, त्या सर्वाच्या समान उद्देशाकरिता गुन्हेगारी कृती केलेली असते- तेव्हा त्यापैकी प्रत्येक व्यक्ती जणू काही ती कृती तिने एकटीनेच केलेली असावी असे समजून जबाबदार धरली जाते.

टीप १ : या कलमाप्रमाणे स्वतंत्र गुन्हा नसून, संयुक्त जबाबदारी सांगितलेली आहे. कमीतकमी दोन अगर जास्त आरोपी असतात आणि एकाच्या कृतीबद्धल सर्व सारखेच जबाबदार असतात. समान उद्देश महत्त्वाचा असतो; प्रत्येक आरोपीने काही कृत्य केलेच पाहिजे असे नाही.

टीप २ : समान उद्देश (कलम ३४) आणि समान उद्दिष्ट (कलम १४१) COMMON INTENTION आणि COMMON OBJECT यात फरक आहे. कलम ३४ मध्ये पूर्वतयारी असते, तर १४१ मध्ये अचानक न ठरविता जमाव दंगा करतो.

समान उद्देशासाठी कृती (क. ३४) यावरील सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा

() गिरिजा शंकर वि. उत्तर प्रदेश राज्य (AIR २००४ SC १३०८) आणि सरबनन आणि इतर वि. पॉडेचरी राज्य (२००५) CrL. J, ११७ (Sc) यामध्ये असे निरीक्षण केले आहे की, कलम ३४ ची पूर्तता होण्यासाठी संबंधित व्यक्तींची पूर्वतयारी आणि पूर्वींच केलेली योजना आवश्यक आहे. त्या संगळ्यांचे एकच उद्देश असले पाहिजेत असे नाही.

() शेक चिना ब्रहमाम वि. आंध्र प्रदेश या खटल्यात अरोपीने एका व्यक्तीच्या मदतीने चाकूने अनेक जखमा करून खुन केला, आरोपीचे आणि खून झालेल्या व्यक्तीचे दोन दिवसांपूर्वी जबरदस्त भांडण झाले होते, पैशांची देवाणघेवाण हे भांडणाचे कारण होते, गुन्ह्याच्या दिवशी आरोपीजवळ चाकू होता आणि त्याच्या मदतनीसाजवळ लोखंडी सळई. वैद्यकीय दाखल्यात चाकूच्या जखमांमुळे मृत्यू झाला असे नमूद किलेले होते. आरोपीच्या मदतनिसाने असा बचाव केला की, त्याला ख़ुनासाठी दोषी धरण्यात येऊ नये, याठिकाणी कलम ३४ चा आधार घेण्यात येऊ नये. सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की, अआरोपीच्या मदतनीसाचा बचाव ग्राह्य नाही कारण हे फौजदारी कृत्य समान उद्देशानेच केलेले आहे.

() समान उद्देश – कलम ३४ चा आधार घेण्यासाठी (१) समान हेतू आरोपीचा सहभाग हे घटक सिद्ध होणे आवश्यक आहे. आरोपीचा उघड सहभाग आवश्यक नाही, पण अप्रत्यक्ष सहभाग असणे आवश्यक आहे. समान हेतू तयार होण्यासाठी थेट पुरावा नसला तर, गुन्ह्यातील सहभागी व्यक्तींचा समान हेतू होता हे सिद्ध करण्याची जबाबदारी फिर्यादी पक्षावर राहील, केवळ आरोपी व्यक्ती गुन्ह्याच्या जागी उपस्थित होती. ही बाब कलम ३४ खाली त्याला दोषी ठरविण्यास पुरेशी नाही. त्यासाठी इतर घटकही विचारात घेतले पाहिजेत.