IPC 304A in marathi – कलम 304 अ मराठी माहिती : नमस्कार मित्रांनो, 304 अ कलम म्हणजे काय? या बद्द्ल संपूर्ण माहिती सांगणार आहे म्हणून पोस्ट पूर्ण वाचा जेणेकरून तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती मिळेल आणि पोस्ट आवडल्यावर तुमच्या मित्रांना शेयर करायला विसरु नका धन्यवाद..

IPC 304A in marathi
(IPC 304A in marathi)

IPC 304A in marathi | 304 अ कलम म्हणजे काय? | कलम 304 अ मराठी माहिती

३०४.अ निष्काळजीपणामुळे मृत्यू घडविणे.

जो कोणी हयगयीचे अगर निष्काळजीपणाचे बेदरकारपणाचे कृत्य करून मृत्यू घडवितो पण जो सदोष मनुष्यवध होत नाहीं त्यास कोणत्याही एक प्रकारच्या कारावासाची शिक्षा जी दोन वर्षेपर्यत असू शकेल अगर द्रव्यदंड अगर दोन्ही शिक्षा होतील.

टीप १ : या कलमाप्रमाणे मृत्यू घडविण्यामागे आरोपीचा इरादा अगर जाणीव नसते. तर केलेले कृत्य बेदरकारपणांचे, हयगयीचे, निष्काळजीपणाचे [Rash or Negligent] असते. पाहा “सूकस कोबीराज (१८८७) १४ Cal. ५६६, ५६९ तसेच “चल्लू’ (१९४१) AIl ४४१.

टीप २ : कृत्याचे स्वरूप : आरोपीला या कलमाखाली जबाबदार धरण्याकरता आरोपीच्या कृत्याचा मृत्यूशी नजीकचा आणि परभारे-सरळ संबंध पाहिजे. MUST BE THE DIRECT OR PROXIMATE CAUSE OF THE DEATH पाहा- “कुर्बान हुसेन ६७ Bom. L.R. ४४७ S.C. निष्काळजीपणामुळे घडलेला मृत्य, मनुष्यवध होय म्हणजे कलम ३०४-अ.

टीप ३: बेदरकारपणाची कृत्ये : आय, पी. सी. मध्ये या पूढ़ची कलमे ३३६-३३७-३३८ आहेत, त्यांचा अंतिम परिणाम मृत्यू घडला तर कलम ३०४-अ लागते. वरील चारही कलमात मूलभूत घटक, केलेले कृत्य बेदरकारपणाचे, निष्काळजीपणाचे असते, पण त्याचा जसा परिणाम घडत जाईल त्याप्रमाणे ही चार कलमें लागतात. कलम ३३६ प्रमाणे फक्त संभाव्य धोका भविष्यकाळात असतो तर कलम ३३७ प्रमाणे परिणाम- साधी दुखापत होते. तर कलम ३३८ प्रमाणे परिणाम- मोठी दुखापत कलम ३२० प्रमाणे होते. तर कलम ३०४-अ प्रमाणे परिणाम मृत्यू घडतो. कलमाखाली विविध प्रकारचे आरोपी येतात. त्यांत डॉक्टर, मोटार ड्रायव्हर, बिल्डिग बांधणारा ठेकेदार अगर इतर कोणताही इसम येऊ शकतो.

टीप ४: हयगयीपणाचे बेदरकारपणाचे कृत्य : बेदरकारपणा याचा अर्थ धोकादायक कृत्य करणे आणि ते तसे आहे याची जाणीव असते. पण त्यामागे इरादा नसतो की कोणास नुकसान व्हावे, पण परिणामाबद्दल आरोपी बेफिकीर असतो, उदासीन असतो. तर निष्काळजीपणा याचा अर्थ योग्य ती खबरदारी घेतली जात नाही. वास्तविक तशी काळजी घेणे आरोपीचे कर्तव्य असते. पाहा “भालचंद्र’ ७१ Bom. LR. ६३४ S.C. बेफिकीरपणा म्हणजे घिसाड घाईचे कृत्य, योग्य ती खबरदारी घेतली जात नाही. एखादे कृत्य टाळणे म्हणजे देखील कृती होते आणि अपराध होतो. पाहा “कॅप्टन डीसूझा = वि =D पश्पतिनाथ सरकार १९६८ CrL.J, ४০५. ज अपराध कलम २९९ अगर ३०० मध्ये पड़त नाहीत त्याकरता कलम ३०४- आह. केलेले कृत्य हेतुपुरस्सर आणि जाणीवपूर्वक नसते, तर बेदरकारपणाचे अगर निष्काळजीपणाचे असते.

टीप ५: जखमी इसमाचा सहभाग ; या कलमाप्रमाणे जखमी इसमाचा नि्काळजीपणा देखील गुन्हा घडविण्याकरता उपयोगी पडला त्याचा पण सहभाग होता असे म्हणता येत नाही. CONTRIBUTORY-NBGLIGENCE हे तत्त्व लागू पडत नाही. त्यामुळ ज़खमी व्यक्ती बहिरी होती-नशेत होती, निष्काळ्जी होती अगर त्याचे दोषामुळेच मृत्यू घडला याला महत्व नसते, पाहा “स्विडल'” (१८४६) २० and K २३० (कॅरिंगटन अॅड किरवान १८४३-१८५० N.P.)

टीप ६ : काही न्यायनिवाडे : पुढ़ील विविध घटनांमध्ये आरोपी हा बेदरकार अगर निष्काळजी होता म्हणून दोषी होता असे ठरविण्यात आलेले आहे.  १) इंजिन सुरू करण्यापूर्वी शिटी दिली नाही त्यामुळे रेल्वेलाईनवर काम असलेला म्लगा इंजिनचा धक्का लागून मरण पवला, “थॉमसन” (१८९४). २) एका इसमाने साध्या चाकूने एकाचे मूळव्याध रोग्याचे पाईल्स कापल्या त्यामुळे मृत्यू झाला. “सुकस कोबीराज (१८८७) १४ Cal. ५६६. ३) आरोपीने आपल्या प्रियकराकडून काही विष मिळविले आणि ते औषध समजून नवन्यास दिले, त्यामुळे नवरा मृत झाला. “मुसाफर बखान (१८८७) PR. No. o or c9 S RE?-29o] ४) एका होमियोपॅेथ डॉक्टरने रोग्यास काही औषध दिले त्यात धोतरा-पान होते याचा परिणाम न अभ्यासता दिले. त्यात रोग्याचा विषामुळे मृत्यू झाला. पाहा “जुगनखान A.IR. R3E4 S.C. L?. ५) क्पोंडरने तापावर मिक्श्वर तयार करताना बाटल्यातील द्रव एकत्र करताना त्याच्यावरील लेबल नीट वाचले नाही. ते औषध आठ जणांना दिले. पैकी सात जण मेले. त्या बाटलीवर स्ट्रेचनिन हायड़रोक्लोराईड लेबल होते. लेबल कि्लिनाईन हायड़ोक्लोराईड असे नव्हते. पाहा “डीसौझा (१९२०) ४२ AII. २७२. आपल्या आवारातील लॅंटरीन इतरांनी गैरप्रवेश करून वापरू नये म्हणून मालकाने वाटेत विजेची चालू तार ठेवली. त्याने शॉक बसून काही आत शिरणाच्या इसमांचा मृत्यु झाला. पाहा “चेकबीन ग्रेगरी A.I.R. १९६४ S.C. २०५ तसेच 4 ‘ 3cx Cr. L. J. 2024 Cal.

टीप ७ : पुढील कृत्ये बेदरकारपणाची नव्हती १) आरोपीने जोराने काठी एकाच्या डोक्यावर फेकली त्यामुळे मृत्यू घडला, तर उद्देशपूर्वक काठी फेकल्याने कलम ३०४ (२ ) प्रमाणे जबाबदार आहे. पाहा “फीगन (3233) Uhrep Cr. C. Ę92. २) एका खेड्यात भररस्त्यात नाटक चालू होते आणि द्रवर एक इसम भरलेली बंदूक घेऊन उभा होता, तेथे जाऊन एका नटाने त्याचेशी झटापट केली. त्यात बंद्क उडून तो नट मयत झाला. तर बंदूकधारी माणूस कलम ३०४-अ खाली जबाबदार नाही, पाहा “बाबूराम (१९४२)AII. ८८४. ३) ट्रॅफिक नियमानुसार एका भागात हॉ्न वाजविण्यास मनाई होती त्यामुळे मोटार ड्रायव्हरने हॉ्न वाजविला नाही. तर तो बेदरकार निष्काळजी होता असे म्हणता येत नाही. पाहा “तुकाराम सीताराम'” (१९ ७०) ७३ Bom. L.. R. ४९२. ४) एका मोटारच्या टपावर काही पत्रे होते. वाटेत बांधलेले पत्रे सैल होऊन खाली पडले आणि रस्त्यावरील एक इसमास लागून तो मयत झाला. पुढे तपासात ते पत्रे जप्त केले नाहीत; तसेच मोटारचा मालक कोण? पत्रे बांधणारा कोण? त्याने ते नीट बांधले होते का? याचा पुरावा कोर्टापुढे सादर केला नाही त्यामुळे केवळ गाडी चालविणारा ड्रायव्हर जबाबदार नाही. पाहा “बैजनाथ सिंग १९७२ GL.J. ४९६ S.C.

टीप ८ : कार्यपद्धती : गुन्हा दखलपात्र-जामिनाचा-प्रथमवर्ग न्यायाधीशापु्ढ़े चालणारा-बिगर समज्तीचा. मृत्यू’ याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे अनेक निवाडे : निष्काळजीपणाने घडून आणलेला मृत्यू हा खून केिव्हा नसतो (क. ३०४-अ) यावरील सवोच्च न्यायालयाचा निवाडा : (१) गोपाल वि. महाराष्ट्र राज्य या केसमध्यें आरोपी हा दारुड्या असून बेकार असा इसम आहे. तो त्याची बायकों देवकीबाई हिच्याशी वारंवार भांडत असे. एके दिवशी जे्हा देवकीबाई चुलीवर स्वयंपाक करीत होती. तेव्हा आरोपीने तिच्याशी भांडण सुरू केले व रागाच्या भरात चुलीतील जळते लाकूड घेऊन ते देवकीबाईच्या डोक्यात घातले. त्यामुळे गंभीर इजा होऊन देवकीबाई मरण पावली, इतर नातेवाईक धावून येताहेत असे पाहन आरोपी फरार झाला. सर्वोच्च न्यायालयाने, त्याला क. ३०० (४) खालील दिलेली शिक्षा, क. ३०४ (भाग १) मध्ये रूपांतरित केली. कारण आरोपीने अगोदर ठरवून मृत्यू घडवून आणला नव्हता, तर एकदम झालेल्या भांडणातून तो घडून आला होता. त्यामुळे तो खून (क. ३००) ठरत नाही, तर निष्काळजीपणे घडून आलेला मृत्यू ठरतो. (AIR २००८SC २१६)

(२) आरोपी आणि इतर मयताच्या झोपडीमध्ये शिरले. ज्यावेळेस मयताने हल्लेखोर आरोपींना त्याचवेळी, त्याला काय भयानक घडणार आहे याची कल्पना आली व त्याने आरोपीच्या एका सहकाच्यावर गोळी झाडली. त्या गोळीने सहकाच्याचा मृत्यू घडुन आला. आरोपीने प्रत्युत्तर म्हणून कुनहाडीचा एक घाव मयताच्या डोक्यावर घातला आणि त्याला ठार केले. आरोपीने असा बचाव घेतला की, मयताचा मृत्यू हा त्यांच्या सहकाच्याच्या तीव्र आण अचानक प्रक्षाभामुळे झाला आहे, सर्वच्च न्यायालयाने हा बहाणा/ बचाव नाकारला आणि आरोपीला क, ३०০ च्या अपवाद १ चा (जे कृत्य जीव घेण्याच्या इराद्याने केले असेल, तर तो सदोष मनुष्यवध, खून ठरेल) फार्यदा नाकारला आणि आरोपीला खुनाबद्ल क, ३० २ प्रमाणे शिक्षा दिली. (पाहा : भुरा राम वि. राजस्थान राज्य (२० ० ३) ९ SCC २०५)

(३) आरोपीच्या ताब्यात असलेल्या जमिनीत बळजबरीने शिरण्याचा मयताने प्रयत्न केला. या प्रकारात मयताच्या बाजूची एक व्यक्ती मारली गेली व दुसरी व्यक्ती गंभीर जखमी झाली. उच्च न्यायालयाने क. ३०० मधील दुसच्या अपवादाचा (ज्या दुखापतीमुळे बहुत करून जीव जाईल, अशी दुखापत करण्याच्या इराद्याने कृत्य कैले असेल असा स्दोष मनुष्यवध, खून ठरतो) फायदा देऊन अरोपीची शिक्षा क. ३०२ वरून क. ३०४ (भाग १) मध्ये रूपांतरित केली आणि ज्या व्यक्तीने मयताच्या बाजूच्या नि:शख्त्र इसमास भाल्याने गंभीररित्या जखमी केले होते, त्याला नि्दोष सोड़न दिल्याचा आदेश सर्वोच्च न्यायलयाने रहदबातल ठरविला आणि आरोपीला क, ३२६ (घातक हत्याराने इच्छापूर्वक जबर दुखापत्त पोहोचविणे) खाली शिक्षा दिली. (पाहा : हरियाना राज्य वि. शेरसिंग २००२C. ४१२० (SC)

(४) पोलीस आरोपींना अटक करण्याकरिता प्रयत्न करीत होते. तक्रारदार ज्या ठिकाणी आरोपी एका मीटिंगमध्ये होते, त्याठिकाणी पोलिसांना घेऊन गेले. अटकेपासून बचाव करण्यासाठी आरोपींनी तक्रारदारांना आणि पोलिसांनाही मारहाण केली. काही पोलीस जखमी झाल्यामुळे, पोलीस पार्टीनि माघार घेऊन मागे जाण्याचे ठरविले. या दरम्यान एक पोलीस, आरोपीच्या माणसाकडून बंदुकीच्या गोळीने मारला गेला आणि त्याचे प्रेत सभास्थानी सापडले. पुराव्यावरून असे निष्पन्न झाले की, हल्लेकरी आरोपींची माणसे तक्रारदारांना आणि पोलिसांना भयंकर मारहाण करीतच राहिले. जरी त्यांच्या जीवावरील धोका टळलेला होता. आणि खासगी संरक्षणाचा हक्क संपूष्टात आला होता. या कारणाने त्यांना क. ३०० चा अपवाद (२) चा लाभ मिळू शकला नाही. त्यांना खुनाबद्दल क. ३००-अ प्रमाणे शिक्षा झाली आणि त्यांचे अपील फेटाळले गेले. (पाहा : राम अवतार वि. पजाब राज्य २०० ३ CrL.J. ४८०(SC)

(५) पुलाचेरिया नागराज वि. आध्र प्रदेश राज्य २० ०६ Cr.L..J. ३८१९ (SC) या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केले आहे की,
जेव्हा एकाच फटक्यात एखाद्याचा मृत्यू होतो, तेव्हा ती केस क. ३०२ ऐकवजी क. ३०४ खाली चालते असे म्हणणे चुकीचे आहे. वर दिलेल्या केसमध्ये आरोपीने सुरा खुपसून मयताचे पोट फाडले व त्यामुळे अति रक्तस्राव होऊन तो मृत्यू पावला. या ठिकाणी हे स्पष्ट आहे की, आरोपीला मयतास ठार मारावयाचे होते किंवा त्याला अशी गंभीर इजा करावयाची होती की तीमुळे त्याचा मृत्यू होईल, म्हणून आरोपी क, ३०० प्रमाणे दोषी आहे. त्याची केस क ३०० च्या अपवाद चार खाली विचारात घेतली जाऊ शकत नाही.

(६) मयताने आरोपीच्या दुकानात घाण टाकली आणि त्यावरून ते भांड़ लागले. संतापलेल्या आरोपीने तिथे असलेला चाकू उचलून मयताला भोसकले व त्याकारणे गंभीर इजा होऊन तो मृत्यू पावला. ट्रायल कोटनि आरोपीला क. ३०२ खाली आजन्म कारावासाची शिक्षा दिली. ती उच्च न्यायालयाने कायम केली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने अभिनिधारित केले की, ही काही पूर्वनियोजित असलेली हेतृूपूर्ण खुनाची केस नाही. तर ही केस क. ३०० अपवाद ४ खाली येते, कारण रागाच्या झटिक्यात स्वतः:वरील ताबा सुटल्यामुळे घडलेली ही घटना आहे. त्यामुळे आरोपीला क. ३०४ भाग २ खाली ५ वर्षची तुरुंगवासाची सजा देण्यात आली व त्यातील त्याने प्रत्यक्ष भोगलेली संजा वजा करण्यात आली. (पाहा : मुथू वि. तामिळनाडू राज्य AIR २००८SC १)

(७) बुधीलाल वि. उत्तराखंड राज्य AIR १००९ SC ८७ या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने क. ३०० (खून) आणि क. ३०४ सदोष मनुष्यवध याची तुलना करताना खालीलप्रमाणे निरीक्षण नॉंदविले आहे :- सदोष मनुष्यवध हा वंश मानला तर खून हा त्याचा प्रकार / जात आहे.
गुन्ह्याचे गांभीर्य आणि प्रकार यावर किती शिक्षा दिली जाते हे अवलंबुन असते. पहिल्या प्रकारातील सदोष मनुष्यवध प्रथम दजोचा असतो. हा गुन्ह्याचा सर्वात गंभीर प्रकार असून, त्याची व्याख्या खून’ अशी क. ३०० मध्ये दुसन्या दजचा प्रकार जो – क. ३०४ भाग १ मध्ये शिक्षापात्र उरतो. त्यानंतर येतो, सदोष मनुष्यवध हा तिसच्या दर्जाचा प्रकार जो क. ३०४ भाग २ प्रमाणे शिक्षेस पात्र दिलेली आहे. दुसरा प्रकार म्हणजे सदोष मनुष्यवध होतो. वर दिलेल्या केसमध्ये आरोपीला सदोष मनुष्यवधाबद्दल क. ३०४ भाग प्रमाणे दोषी धरण्यात आले. आरोपीला आपल्या दुसन्या बायकोचे पाहुण्याबरोबर अवैध संबंध आहेत असा संशय होता. त्या पाहण्याने, आरोपीला बायकोच्या छातीवर बसून मारहाण करताना पाहिले होते. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत अभिनिर्धारित केले आहे की, आरोपीस क. ३०० ऐवजी क. ३०४ भाग २ खालील शिक्षा योग्य असून, दहा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा न्यायाचे दृष्टीने पुरेशी आहे.

(८) अपीलार्थी आणि एक लखासिंग यांनी कुट्ंबातल्या १३ जणांना एका चांदण्या रात्री घरामध्येच ठार मारले, अपीलार्थी आरोपीने कुट्बातील अगदी लहान मुलांनाही सोडले नाही, त्यांनाही ठार मारले. ही घटना घड़ण्याच्या एक वर्षच आधी त्याचे लग्न झाले होते. तो त्या एकत्र कुट्ंबातच राहात होत. त्याच्या बायकोच्या बाबतीत कुटुंबातील मंडळींना तिचे आणि अपीलाथींचा मित्र लखासिंग (सहआरोपी) यांचे अवैध संबंध होते, असा संशय होता. लखासिंग वारंवार त्या घरी येत असे आणि तिच्याबरोबर मुक्कामही करीत असे. त्या कुट्ंबाची या गोष्टीला हरकत होती, त्यामुळे अपीला्थींचा राग अनावर होउऊन त्याने आणि लखासिंगने सगळ्या कुटुंबालाच ठार मारावयाचे ठरविले व त्याप्रमाणे कृत्य केले. अपीलार्थीने सर्वोच्च न्यायालयात त्याची देहदंडाची शिक्षा देण्यास विलंब होत असल्यामुळे आजन्म कारावासात पराव्तित करावी असा अर्जे केला. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ते न्यायास सुसंगत होणार नाही असा विचार करून त्याचा अर्ज फेटाळला. (पाहा : गुरमितसिंग वि. उत्तरप्रदेश राज्य ATR २००५ SC ३६१ ६)

(९) शिक्षेत दुरुस्ती वीस वर्षे वय असलेल्या आरोपीने १२ वर्षाच्या एका शाळकरी मुलीला निजन स्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिला गळा दीबून ठार मारले. आरोपीला फाशीची शिक्षा आणि रु. २५००० द्रव्यदंडाची शिक्षा झाली. उच्च न्यायालयाने ‘दुर्मिळातील दुर्मिळ rarest ofrare’ केस म्हणून ही शिक्षा कायम केली. सर्वच्च न्यायालयातील अपीलात सेशन्स कोटोने आणि उच्च न्यायालयाने क. ३०२ आणि क. ३७६ खालील आरोप ग्राह्य ठरविले. पण आरोपीचे वय विचारात घेता, तो विद्यार्थी आहे हे लक्षात घेऊन आणि अशा अश्लाध्य वर्तनाचे पूर्व रेकॉर्ड नसल्यामुळे, आणि अन्य परिस्थिती विचारात घेता, तो समाजास धोकादायक ठरण्याची शक्यता नसल्यामुळे, त्याची केस ‘rarest of rare’ अशी म्हणता येणार नाही, हे स्पष्ट करून फाशीची (देहदंडाची) शिक्षा आजन्म कारावासात
परावर्तित किली. (पाहा : अमित ऊर्फ अम्मु वि. महाराष्ट्र राज्य AIR Roo SC )

(१०) एक गाजलेला खटला : रेणुका आणि सीमा या दोघी बहिणी, त्यांची आई अंजलीबाई, एक सहआरोपी आणि माफीचा साक्षीदार किरण शिंद (रेणुकाचा नवरा) है गदीत किंवा सणसमारंभात सोनसाखळ्या खेचून/चोर्या करून आपला चरितार्थे भागवीत असत. गुन्ह्याच्या वेळी ते एका बालकाला बरोबर नेत की ज्यायोगे गर्दीतून पसार होण्यासाठी त्याचा उपयोग होई, अशा प्रकारे ५ वर्षाखालील बालकांचे अपहरणाचा कट करून त्यांचे गरज असेल तेव्हा अपहरण करणे व जेव्हा त्यांची गरज नसेल तेव्हा त्यांचा निकाल लावणे, असे कृत्य है सर्व आरोपी करत असत, अशा प्रकारे त्यांनी १९९०ते १९९६ या काळात ९ बालकांना ठार मारले. सेशन्स कोटानि रेणुका आणि सीमा यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली, जी उच्च न्यायालयाने कायम केली, माफीचा साक्षीदार किरण शिंदे हे देखील १३ बालकोंचे अपहरण करण्यास आणि ९ बालकांच्या मृत्यूस कारणीभूत होता, अपीलार्थीं क. ३६४ (खून करण्यासाठी अपनयन करणे किंवा अपहरण करणे) सहकलम १ २०-ब (फौजदारीपात्र कट) आणि क. ३२३ (इच्छापूर्वक दुखापत करणे) या गुन्ह्यांसाठी दोषी ठरले.

Also read:

#tags: IPC 304A in marathi, 304 अ कलम म्हणजे काय, कलम 304 अ मराठी माहिती.