Skip to content

ICT Full Form In Marathi | ICT Meaning In Marathi | ICT Information In Marathi

  ICT Full Form In Marathi – ICT Meaning In Marathi – ICT Information In Marathi : नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला ICT बद्द्ल संपूर्ण माहिती सांगणार आहे म्हणून पोस्ट पूर्ण वाचा आणि आवडल्यावर तुमच्या मित्रांना शेयर करायला विसरु नका धन्यवाद..

  Information Technology In Marathi | ICT Full Form In Marathi

  ICT Full Form In Marathi

  ICT Full Form In Marathi

  ICT चा फुल्ल फॉर्म “Information and Communications Technology” असा होतो.

  ICT Meaning In Marathi | Information Technology Meaning In Marathi

  ICT चा मराठीत अर्थ “माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान” असा होतो.

  माहिती संप्रेषण तंत्रज्ञान | ICT Information In Marathi

  मानवी जीवनाच्या जवळजवळ सर्व क्षेत्रांमध्ये माहिती संप्रेषण तंत्रज्ञान उपयुक्त ठरत आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानात वेगाने होणाऱ्या प्रगतीमुळे माहितीचा वेगही वाढला आहे त्या अनुषंगाने माहिती संप्रेषण तंत्रज्ञान हे उपलब्ध साधनांचा उपयोग करून विविध गरजांसाठी माहितीचा वापर करून देत आहे माहिती संप्रेषण तंत्रज्ञान हे काळाची गरज बनले आहे.

  माहिती संप्रेषण तंत्रज्ञाणाचे महत्व :

  1) आज प्रत्येक क्षेत्रामध्ये ICT चा प्रभाव दिसून येत आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे ज्ञानाचा खजिना खुला झाला आहे. ICT मुळे माहिती सहजगत्या उपलब्ध होत आहे. लक्षावधी संकेतस्थळांवर हजारो संदर्भ सर्च इंजिनच्या माध्यमातून उपलब्ध असतात जसे गूगल.

  2) अध्ययन – अध्यापन प्रक्रियेतील कुठल्याही घटकाचे संदर्भ आणि माहिती, संप्रेषण तंत्रज्ञानाच्या मदतीने सहज उपलब्ध होते.

  3) मागणी आणि प्रतिसाद या तत्वावर माहिती संप्रेषण तंत्रज्ञानावर काम करते. त्यामुळे शासन, खाजगी उद्योगधंदे, शाळा, विद्यापीठे एवढेच नव्हे तर अशासकीय संथासुद्धा माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर करतात. उदा. शिक्षण, प्रवास, अर्थ, बँकिंग, औषधे, वाचनालये, कायदा व सुव्यवस्था, समाजसेवा अश्या सर्व क्षेत्रांमधये माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा शिरकाव झालेला आहे. भारतीय रेल्वे, भारतीय जीवन विमा, भारत संचार निगम लिमिटेड इ. शासकीय संस्थांनीही त्यांच्या गरजांनुसार संकेतस्थळे विकसित केली आहेत अशा प्रकारे या तंत्रज्ञानाचा व्यवहारात उपयोग होतो.

  माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाच्या व्याख्या :

  1) संप्रेषणासाठी माहिती निर्माण करणे, तिचे वर्गीकरण करणे, माहिती जतन करणे/साठवणे आणि माहितीचे व्यवस्थापन करणे इ. गोष्टींसाठी लागणारे तंत्रज्ञान संसाधने आणि साधने यांचे एकत्रीकरण म्हणजे माहिती संप्रेषण तंत्रज्ञान.

  2) माहितीच्या कार्यश्रम व्यवस्थापनासाठी लागणाऱ्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचा वापर म्हणजे माहिती संप्रेषण तंत्रज्ञान. उदा. एखादे विशिष्ट काम करण्याकरता माहितीची साठवण, माहिती परत मिळवणे, माहितीवर प्रक्रिया करणे, माहितीचा प्रसार करणे.

  3) माहिती संप्रेषण तंत्रज्ञान म्हणजे माहिती प्रसारित करणे साठवणे तयार करणे माहितीचे आदानप्रदान करणे यासाठी वापरण्यात येणारे तंत्रज्ञान उदा. रेडिओ, दूरचित्रवाणी, व्हिडीओ, डीव्हीडी, टेलिफोन उपग्रह प्रणाली, संगणकाचे जाळे, हार्डवेअर, सॉफ्टवेअर यांचा समावेश माहिती संप्रेषण तंत्रज्ञानामध्ये होतो, त्याचप्रमाणे या तंत्रज्ञानासाठी लागणारे साधने आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिंग इ मेल यांसारख्या सेवांचाही माहिती संप्रेषण तंत्रज्ञानामध्ये समावेश होतो.

  माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची कार्ये :

  • कच्च्या स्वरूपातील माहितीवर (data) प्रक्रिया करून तिचे उपयुक्त माहितीमध्ये रूपांतर करणे.
  • माहितीवर पुनर्प्रक्रिया करणे.
  • माहिती समजण्यास सोपी व्हावी अश्या नव्या रूपात तिचे रूपांतर करणे.
  • माहितीचे ज्ञानामध्ये रूपांतर करणे आणि या ज्ञानाच्या माध्यमातून वापरकर्त्याला सुजाण बनवणे.
  • व्यक्ती व समाज यांचे ज्ञान त्यांची आर्थिक कौशल्ये आणि दृष्टिकोन यात इलेकट्रॉनिक माध्यमाच्या मदतीने बदल घडवणे.
  • समाज आणि देश यांचा विकास घडवणे माहिती संप्रेषण तंत्रज्ञान हे संगणक तंत्रज्ञान आणि संप्रेषण तंत्रज्ञान यांचे मिश्रण आहे त्यामुळे संप्रेषणासाठी या आधी वापरण्यात येणाऱ्या प्रगत इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा समावेश त्यात होतो.

  माहितीच्या महामार्गाची ओळख :

  इंटरनेट म्हणजे आधुनिक जगातील माहितीचा महामार्गच आहे. इंटरनेटच्या माध्यमातून माहितीचा खजिना आपल्याला घरपोच मिळतो.

  इंटरनेट आणि टेलिफोन यंत्रणा केबल टेलिव्हिजन यंत्रणा आणि उपग्रहाद्वारे होणारे संदेशवहन या सगळ्यांचा समावेश वैश्विक माहिती आणि संप्रेषण यंत्रणेमध्ये होतो.

  टेलिकम्युनिकेशन नेटवर्कमधून माहिती मिळविणे शक्य व्हावे यासाठी इंटरनेट बुलेटिन बोर्ड ऑनलाईन सेवा आणि इतर अनेक प्रकारच्या सेवा उपलब्ध असतात पारंपरिक महामार्गाप्रमाणे माहितीच्या महामार्गावरही शासनाचे नियंत्रण असते नजीकच्या भविष्यकाळात माहितीचा महामार्ग हा सर्वांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनणार आहे.

  शिक्षण क्षेत्रात माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची व्याप्ती | शिक्षणात तंत्रज्ञानाचे महत्व | माहिती तंत्रज्ञानाचे फायदे

  माहिती संप्रेषण तंत्रज्ञानातील विलक्षण प्रगतीमुळे वर्ल्ड वाईड वेब (www) ने विद्यार्थी शिक्षक आणि वैज्ञानिक यांच्यासाठी माहितीचा खजिना अद्यायावत होत आहे मुक्त माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोकांना घरबसल्या ज्ञान प्राप्त करणे अभ्यास करणे मुक्त विद्यापीठे इत्यादी दूरशिक्षणाद्वारे शक्य होते.

  व्हिडीओ क्लीप्सच्या मदतीने विद्यार्थी शेतकरी आणि खेळाडूंना प्रशिक्षित करण्याचे उत्तम माध्यम म्हणजे दूरदर्शन/टीव्ही प्रक्षेपण महागडे आणि अवघड प्रयोग वैद्यकशास्त्राच्या विद्यार्थ्यांना अवघड शस्त्रक्रिया इ. सहजगत्या दृश्य स्वरूपात बघता येणे शक्य होते. खेड्यातील मनुष्यही आधुनिक माहिती आणि संशोधनाचा संदर्भ आपल्या दैनंदिन आयुष्यासाठी वापरू शकतो.

  अभ्यासक्रम पाठयपुस्तकांची माहिती संदर्भग्रंथ आणि संदर्भ इंटरनेटवर उपलब्ध आहेत.

  ध्वनीफिती चित्रफिती ऑडिओ व्हिडीओ सीडी मल्टिमीडिया इंटरॅक्टिव्ह सीडी बाजारात उपलब्ध आहेत या सीडी बाल वर्गापासून उच्चशिक्षणासाठीही उपयुक्त ठरतात.

  ऑनलाईन परीक्षांमुळे मानवी चुका टाळता येतात आणि मनुष्यबळ कमी लागते महाराष्ट्र राज्य मंडळ विविध परीक्षा ऑनलाईन घेते अलीकडच्या काळात विद्यापीठांमध्ये प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने केली जाते.

  माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाच्या प्रभावाने घडून आलेले बदल :

  कधीही आणि कुठेही असणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची क्षमता माहिती संप्रेषण तंत्रज्ञानात आहे या क्षमतेमुळे पारंपरिक शिक्षणाच्या स्वरूपात क्रांतिकारी बदल घडत आहेत.

  • माहिती संप्रेषण तंत्रज्ञानामुळे वर्गातील अध्यापनाचा वेळ कमी करता येतो कृती किंवा एखाद्या ऑनलाईन पाठिशी संबंधित कृती ते शाळेतील तंत्रज्ञान प्रयोगशाळेत किंवा अभ्यास केंद्रात जाऊन पूर्ण करू शकतात त्यामुळे शिक्षकांना पूरक ज्ञान देण्यास वेळ मिळतो व बौद्धिक वाढ होते.
  • काही वेळा गणित विज्ञानासारखे विषय शिकवायला तद्न्य शिक्षकांची नेमणूक करणे ग्रामीण किंवा शहरी भागातील काही छोट्या शिक्षणसंस्था शक्य नसते अशा ठिकाणी माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाच्या मदतीने हे अभ्यासक्रम शिकवले जाऊ शकतात.
  • ज्या शाळांमध्ये पूर्णवेळ भौतिकशास्त्र किंवा इंग्लिश शिकवणाऱ्या शिक्षकांची उपलब्धता नसते त्या शाळा रेडिओ टीव्ही किंवा ऑनलाईन पाठ वापरू शकतात किंवा आधीच तयार केलेले मल्टिमीडिया साहित्य वापरू शकतात.
  • रेडिओ टीव्ही इ साहित्याचा वापर करून विद्यार्थी ज्ञान मिळवू शकतात.
  • ICT मुळे एकच शिक्षक अनेक शाळांमध्ये शिकवू शकतो किंवा शेकडो मैल अंतरावर राहणारे तद्न्य शिक्षकही ऑनलाईन अभ्यासक्रम शिकवू शकतात.
  • शासनाची कार्यपद्धती व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमुळे बदलत आहे भौगोलिक दृष्ट्या दूर असलेले तद्न्य निर्णय घेणाऱ्या व्यक्ती आणि नागरिकांना एकमेकांसमोर आणणे शक्य झाले आहे राष्ट्रीय माहिती केंद्र National Informantics Center शासकीय संस्थांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगगच्या सेवा पुरवते.

  उदा.

  महाराष्ट्र राज्य केंद्र मुंबई यांच्याकडेही निकनेट च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि जिल्हा पातळीवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सेवा पुरवणारी उत्तम दर्जाची यंत्रणा उपलब्ध आहे सर्व जिल्यातील माहिती केंद्रे 2MBPS लिझज्ड सर्क्रिटने राज्याशी जोडलेले आहेत तर 34MBPS लिंकने मुंबई ही दिल्लीशी जोडलेली आहे.

  • स्वतःच्या वेळेनुसार व गतीनुसार सरावावर आधारित कौशल्ये विद्यार्थी शिकू शकतात.
  • विद्यार्थी मिळवलेली माहिती वापरून समस्या सोडवू शकतात नवीन समस्यांना सामोरे जाऊ शकतात.
  • जगाला वर्गात आणण्याचे कमी खर्चिक आणि काही बाबतीत एकमेव माध्यम म्हणून माहिती संप्रेषण तंत्रज्ञान काम करते.

  also read :

  FAQ

  [sc_fs_faq html=”true” headline=”h2″ img=”” question=”ICT Full Form In Marathi?” img_alt=”” css_class=””] ICT चा फुल्ल फॉर्म “Information and Communications Technology” असा होतो. [/sc_fs_faq] [sc_fs_faq html=”true” headline=”h2″ img=”” question=”ICT Meaning In Marathi?” img_alt=”” css_class=””] ICT चा मराठीत अर्थ “माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान” असा होतो. [/sc_fs_faq]