Facebook Accounnt Kase Delete Karave? फेसबुक खाते कसे डिलीट करावे
Facebook Accounnt Kase Delete Karave काय तुम्हाला पन तुमचे फेसबुक वरील एकाउंट डिलीट करायचे आहे? या पोस्ट मध्ये मि तुम्हाला सांगणार आहे की फेसबुक चे एकाउंट कसे डिलीट करतात.
Facebook Accounnt Kase Delete Karave? फेसबुक खाते कसे डिलीट करावे
तुम्हाला सांगू इच्छितो की फेसबुक मध्ये एकाउंट Deactivate करायचे ऑप्शन सुद्धा असते ज्याने तुम्ही काही वेळेसाठी तुमचे फेसबुक चे एकाउंट बंद करू शकता. जर तुम्हाला तुमच्या एकाउंट ला काही वेळेसाठी बंद करायचे आहे तर तुम्ही Account Setting मध्ये Security मधे जावून सगळ्यात खाली डिएक्टिवेट करायचे ऑप्शन दिसेल इथून तुम्ही तुमच्या एकाउंट ला काही वेळेसाठी बंद करू शकता.
जर तुम्हाला तुमच्या फेसबुक एकाउंट ला कायमचे डिलीट करायचे असेल तर तुम्हाला सगळ्यात आधी Google Chrome ब्राउजर मध्ये जायचे आहे आणि तिथे facebook.com/help/delete_account टाइप करून सर्च करायचे आहे. यानंतर तुमच्या समोर फेसबुक चे लॉगइन पेज खुलेल जर तुम्ही आधी लॉगइन केलेले नसेल तर तुम्हाला इथे लॉगइन करून घ्यायचे आहे.
आता तुम्हाला इथे दोन ऑप्शन दिसतील Deactivate account आणि Delete account तुम्हाला जर तत्पुरते फेसबुक एकाउंट ला बंद करायचे असेल तर तुम्ही डिएक्टिवेट एकाउंट वर क्लिक करून त्याला सेलेक्ट करा आणि जर कायमचे बंद करायचे असेल तर डिलीट एकाउंट वर क्लिक करून त्याला सेलेक्ट करा मला डिलीट करायचे आहे तर मि इथे डिलीट एकाउंट ला सेलेक्ट केले आहे. आणि त्यांनंतर खाली दिलेल्या Continue to account deletion वर क्लिक करा.
यानंतर तुमच्या समोर असे पेज खुलेल इथे तुम्हाला पाच ऑप्शन दिसेल जर तुमचे एकाउंट हॅक झाले असेल तर तुम्ही फेसबुक ला सांगु शकता नसेल झाले तर खाली दिलेल्या Continue to account deletion या ऑप्शन वर क्लिक करा.
इथे परत Continue to account deletion वर क्लिक करायचे आहे.
परत तुमच्या समोर एक पेज ओपन होईल तुम्हाला तुमची माहिती डाउनलोड करायची असेल तर तुम्ही Download your information वर क्लिक करू शकता जर नसेल करायची तर Delete Account वर क्लिक करा.
तुम्हाला तुमचा पासवर्ड टाकून Continue बटनावर क्लिक करायचे आहे.
त्यानंतर तुमच्या समोर Confirm permanent account deletion ऑप्शन ओपन होईल इथे तुम्हाला Delete Account वर क्लिक करायचे आहे.
Delete Account वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक मेसेज दिसेल ज्यावर लिहिलेले असेल की तुमचे एकाउंट 30 दिवसात डिलीट केले जाईल. तर असे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने तुमचे फेसबुक चे एकाउंट डिलीट करू शकता.
तर आता तुम्हाला समजले असेल की Facebook Account Kase Delete Karave. आता महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला जर तुमचे फेसबुक चे एकाउंट परत चालू करायचे आहे जे तुम्ही डिलीट केले आहे तर तुम्हाला 30 दिवसाच्या आत लॉगइन करावे लागेल जर तुम्ही 30 दिवसाच्या आत लॉगइन केले नाही तर तुमचे एकाउंट कायमचे डिलीट केले जाते.
Facebook चे एकाउंट कायमचे डिलीट केल्यानंतर काय होईल?
- लोक तुमची फेसबुक प्रोफाइल बघू शकणार नाही.
- तुम्ही परत तुमच्या एकाउंट ला activate करू शकणार नाही.
- तुम्ही जेही तुमच्या फेसबुक एकाउंट वर पोस्ट केलेले असेल फोटो, वीडियो सगळे डिलीट होतील.
हे देखील वाचा : एफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय? | ब्लॉगिंग म्हणजे काय? | SEO म्हणजे काय ? SEO कसा करावा? संपूर्ण माहिती मराठीत