नाताळ वर मराठी निबंध Christmas Essay in Marathi
ख्रिसमस मराठी निबंध | Christmas Essay in Marathi | नाताळ वर निबंध. नमस्कार.., मित्रांनो आज मि तुम्हाला ख्रिसमस ह्या ख्रिश्चन लोकांच्या प्रमुख सनाबद्दल मराठी निबंध लिहून दिलेला आहे.

नाताळ वर मराठी निबंध Christmas Essay in Marathi
ख्रिसमस हा ख्रिश्चन लोकांचा प्रमुख सन आहे. जो दर वर्षी 25 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. हा सन येशु ख्रीस्तांच्या जन्माच्या दिवशी साजरा केला जातो.
या दिवशी चर्चमधे विशेष सजावट केली जाते, लोक एकमेकांना भेटतात आणि शुभेच्छा देतात. या दिवशी भेटवस्तू देण्याची आणि केक कापण्याची परंपरा देखील आहे. लोक या दिवशी चर्च मध्ये उपस्थित राहतात आणि देवाला प्रार्थना करतात.
ख्रिसमस हा सन जगभरात साजरा होणाऱ्या सनांपैकी एक आहे. प्रत्येकजन या दिवशी सांस्कृतिक सुट्टीचा आनंद घेतो. शाळा, कार्यालये या प्रसंगी बंद राहतात. लोक हा सन मोठ्या उत्साहाने आणि भरपूर तयारी करून साजरा करतात.
ख्रिसमस हा विशेषत ख्रिश्चनांसाठी खूप महत्वाचा सन आहे पन तो जगभरातील इतर धर्माच्या लोकांद्वारे देखील साजरा केला जातो. येशुने आपले संपूर्ण आयुष्य इतरांच्या कल्याणासाठी व्यतीत केले आणि लोकांना योग्य मार्गावर चालण्यासाठी प्रेरित केले, त्यांना मुक्ति आणि मुक्तीचे रक्षक म्हणूनही ओळखले जाते.
मुले संपूर्ण वर्ष ख्रिसमस सनाची वाट पाहत असतात कारण लाल आणि पांढऱ्या ड्रेसमध्ये लांब दाढी असलेला सॅन्टाक्लॉज येईल आणि त्यांना भरपूर भेटवस्तू देईल आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करेल.
संत निकोलस हे सॅन्टा चे वडील मानले जातात, त्यांचा येशु ख्रिस्तांवर भरपूर विश्वास होता आणि मुलांवर प्रेम होते. संत निकोलस मुलांना आंनदी करण्यासाठी त्यांच्या आवडत्या भेटवस्तू देत असत. ज्यामुळे लोक त्यांच्यावर खूप प्रेम आणि आदर करायचे.
6 Comments