अण्णाभाऊ साठे यांची संपूर्ण माहिती मराठीत Anna Bhau Sathe Information In Marathi

Anna Bhau Sathe Information In Marathi अण्णाभाऊ साठे यांची संपूर्ण माहिती मराठीत : नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला अण्णाभाऊ साठे यांची संपूर्ण माहिती सांगणार आहे म्हणून पोस्ट पूर्ण वाचा आणि आवडल्यावर तुमच्या मित्रांना शेयर करायला विसरु नका धन्यवाद..

अण्णाभाऊ साठे यांची संपूर्ण माहिती मराठीत, Anna Bhau Sathe Information In Marathi
Anna Bhau Sathe Information In Marathi

Anna Bhau Sathe Information In Marathi अण्णाभाऊ साठे यांची संपूर्ण माहिती मराठीत

नाव तुकाराम भाऊराव साठे
जन्म 1 आँगस्ट 1920
टोपण नाव अण्णाभाऊ
जन्मस्थान जिल्हा सांगली, वाटेगाव तालुका, वाळवा गाव
आई वाळूबाई साठे
वडील भाऊराव साठे
शिक्षण अशिक्षित
पत्नी कोंडाबाई साठे आणि जयवंता साठे
मृत्यु १८ जुलै १९६९

तुकाराम भाऊराव साठे एक मराठी समाज सुधारक ज्यांना अण्णा भाऊ साठे म्हणून ओळखले जाते. अण्णा भाऊ साठे यांचा जन्म 1 आँगस्ट 1920 साली सांगली जिल्हाल वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावात झाला. अण्णाभाऊ साठे हे एक उत्कृष्ट लेखक आणि कवी होते. अण्णाभाऊ साठे हे हिंदू धर्मातील मांग समाजात जन्मलेले समाज सुधारक होते. अण्णा भाऊ यांच्यावर आंबेडकरवादाचा प्रभाव होता.

आणाभाऊ यांच्या आईचे नाव वाळूबाई साठे आणि वडिलांचे नाव भाऊराव साठे असे होते. आणाभाऊ साठे हे फक्त दीड दिवस शाळेत गेलेले होते. याचे कारण तेथील सवर्ण जातींच्या लोकांचा भेदभाव या कारणांमुळ त्यांनी शाळा सोडून दिली. आणाभाउंनी दोन लग्न केली होती त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव कोंडाबाई साठे आणि दुसऱ्या पत्नीचे नाव जयवंता साठे असे होते. अण्णाभाऊ साठेंना तीन अपत्ये होती त्यांचे नाव मधुकर, शकुंतला, आणि शांता असे होते.

राजकारण :

पहिल्यांदा अण्णाभाऊं साठे हे श्रीपाद अमृत डांगे यांच्या कम्युनिष्ट विचारसरणीमुळे प्रभावित झाले होते. अण्णा भाऊंनी १९४४ ला अमर शेख आणि दत्ता गवाणकर यांच्या सोबत लालबावटा कला पथक स्थापित केले. स्वातंत्र्यानंतर अण्णा भाऊंना उच्च वर्णीय लोकांचे भारतावरील शासन मान्य नव्हते त्यांनी मुंबई येथे १६ ऑगष्ट १९४७ ला वीस हजार लोकांचा मोर्चा काढला होता आणि त्यांच्या मोर्चातील घोषणा अशी होती कि ये आझादी झुटीं हे देश कि जनता भुकी हे.

अण्णा भाऊ नंतर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणुकींचे अनुसरण करत दलित समाजाच्या कार्याकडे वळले व त्यांनी दलित समाजातील लोकांच्या कामगार जीवनातील अनुभवांना प्रकट करण्यासाठी त्यांनी आपल्या कथांचा वापर केला.

अण्णा भाऊंनी बॉम्बे मध्ये १९५८ ला थापन केलेल्या त्यांच्या पहिल्या दलित साहित्य संमेलनात उदघाटन भाषणामध्ये म्हटले होते कि पृथ्वी हि शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित आणि कामगारांच्या लोकांच्या तळहातावर तरलेली आहे. यातूनच अण्णा भाऊंनी साठेंनी जागतिक संरचना मध्ये देखील दलित व कामगार वर्गांचे महत्त्व स्पष्ट केले होते.

लेखन साहित्य :

अण्णा भाऊ साठेंनी ३५ कादंबऱ्या मराठी भाषेत लिहिल्या आहेत. त्यात फकीरा चा समावेश आहे. जिला राज्य सरकारचा १९६१ मध्ये सर्वोत्कृष्ट कादंबरी चा पुरस्कार मिळाला आहे. अण्णा भाऊ साठेंनी याच्या व्यतिरिक्त १२ पटकथा, नाटक, मराठी पोवाड्यातील १० गाणे लिहिली.

अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली पुस्तके | अण्णाभाऊ साठे कादंबरी नावे :

 • अकलेची गोष्ट (लोकनाट्य, १९४५)
 • अण्णा भाऊ साठे : प्रातिनिधिक कथा (संपादक – डाॅ. एस.एम. भोसले)
 • अमृत
 • आघात
 • आबी (कथासंग्रह)
 • आवडी (कादंबरी)
 • इनामदार (नाटक, १९५८)
 • कापऱ्या चोर (लोकनाट्य)
 • कृष्णाकाठच्या कथा (कथासंग्रह)
 • खुळंवाडा (कथासंग्रह)
 • गजाआड (कथासंग्रह)
 • गुऱ्हाळ
 • गुलाम (कादंबरी)
 • चंदन (कादंबरी)
 • चिखलातील कमळ (कादंबरी)
 • चित्रा (कादंबरी, १९४५)
 • चिरानगरची भुतं (कथासंग्रह), १९७८)
 • नवती (कथासंग्रह)
 • निखारा (कथासंग्रह)
 • जिवंत काडतूस (कथासंग्रह)
 • तारा
 • देशभक्त घोटाळे (लोकनाट्य, १९४६)
 • पाझर (कादंबरी)
 • पिसाळलेला माणूस (कथासंग्रह)
 • पुढारी मिळाला (लोकनाट्य, १९५२)
 • पेंग्याचं लगीन (नाटक)
 • फकिरा (कादंबरी, १९५९)
 • फरारी (कथासंग्रह)
 • मथुरा (कादंबरी)
 • माकडीचा माळ (कादंबरी, १९६३)
 • रत्ना (कादंबरी)
 • रानगंगा (कादंबरी)
 • रूपा (कादंबरी)
 • बरबाद्या कंजारी (कथासंग्रह, १९६०)
 • बेकायदेशीर (लोकनाट्य, १९४७)
 • माझी मुंबई (लोकनाट्य)
 • मूक मिरवणूक(लोकनाट्य)
 • रानबोका
 • लोकमंत्र्यांचा दौरा (लोकनाट्य, १९५२)
 • वारणेचा वाघ (कादंबरी, १९६८)
 • वैजयंता (कादंबरी)
 • वैर (कादंबरी)
 • शेटजींचे इलेक्शन (लोकनाट्य, १९४६)

अण्णा भाऊ साठेंवर लिहिलेली पुस्तके :

 • अण्णाभाऊंचा संदेश (विनिमय पब्लिकेशन्स)
 • अण्णा भाऊ सांगून गेले (विलास रणसुभे)
 • अण्णा भाऊ साठे (मराठी कवी) – लेखक: बजरंग कोरडे, अनुवाद : विलास गिते, प्रकाशन : साहित्य अकादमी
 • अण्णा भाऊ साठे (बालवाङ्मय, लेखक – बाबुराव गुरव)
 • अण्णा भाऊ साठे (हिंदी, प्रा. रतनलाल सोनग्रा)
 • अण्णा भाऊ साठे (डाॅ. संजीवनी सुनील पाटील)
 • अण्णा भाऊ साठे : चरित्र आणि कार्य – विजयकुमार जोखे, नालंदा प्रकाशन
  अण्णा भाऊ साठे विचारधन (विठ्ठल साठे)
 • अण्णाभाऊ साठे व्यक्ती आणि वाङ्मय ( प्रा.डाॅ. अंबादास सगट)
 • अण्णा भाऊ साठेलिखित ‘फकीरा’ची समीक्षा (डाॅ. श्रीपाल सबनीस)
 • क्रांतिकारी अण्णाभाऊ साठे (प्रा. गौतम निकम)
 • समाज सुधारक लोकशाहीर अण्णा भाऊ साठे (संपादित, संपादक – ॲड. महेंद्र साठे)

अण्णा भाऊ साठेंच्या लेखनावर आधारित चित्रपट :

 1. वैजयंता (१९६१, कादंबरी – वैजयंता)
 2. टिळा लावते मी रक्ताचा (१९६९, कादंबरी – आवडी)
 3. डोंगरची मैना (१९६९, कादंबरी – माकडीचा माळ)
 4. मुरली मल्हारीरायाची (१९६९, कादंबरी – चिखलातील कमळ)
 5. वारणेचा वाघ (१९७०, कादंबरी – वारणेचा वाघ)
 6. अशी ही साताऱ्याची तऱ्हा (१९७४, कादंबरी – अलगूज)
 7. फकिरा (कादंबरी – फकिरा)

Tags: अण्णाभाऊ साठे यांचे विचार, अण्णाभाऊ साठे यांचे भाषण, अण्णाभाऊ साठे यांची कादंबरी, अण्णाभाऊ साठे यांचे व्यक्तिमत्त्व विशेष, अण्णाभाऊ साठे पोवाडा, अण्णाभाऊ साठे यांची भेट स्वाध्याय.

Rate this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *