अब्दुल कलाम मराठी निबंध APJ Abdul Kalam Essay in Marathi नमस्कार.., मित्रांनो आज मि तुम्हाला भारताचे मिसाइल मॅन म्हणजेच डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्यावर मराठी निबंध लिहून दिलेला आहे.

Dr. APJ Abdul Kalam Essay in Marathi
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव अवुल पाकीर जैनुलाबद्दीन अब्दुल कलाम होते. ज्यांना भारताचे मिसाइल मॅन आणि पीपल्स प्रेसीडेंट म्हणून ओळखले जाते.
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडू मधील रामेश्वरम येथे झाला होता. त्यांचे जीवन हे संघर्षाने भरलेले आहे परंतु ते नवीन पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल. त्यांनी लहान वयातच कुटुंबाला आर्थिक मदत करण्यास सुरुवात केली.
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी मद्रास इस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी मधून पदवी घेतल्या नंतर ते संरक्षण संशोधन विकास संस्थेत (डीआरडीओ) सामील झाले. ते 1992 पासून 1999 पर्यंत पंतप्रधानांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार होते.
डॉ. एपीजे अब्दुल कलाम हे 2002 ते 2007 पर्यंत भारताचे राष्ट्रपति म्हणून काम करणारे पहिले वैज्ञानिक होते. त्यांनी “मिशन इंडिया”, “द ल्युमीनस स्पार्क” इत्यादी अनेक प्रेरणादायी पुस्तके लिहिली. देशातील भ्रष्टाचारावर मात करण्यासाठी त्यांनी यूथ नावाचे मिशन सुरु केले.
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी देशातील विविध विद्यापीठे आणि संस्थांमध्ये प्राध्यापक म्हणून काम केले (इंडियन इस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद), इंडियन इस्टीट्यूट ऑफ स्पेन सायन्स अँड टेक्नोलॉजी, तिरुअनंतपुरम, जेएसएस यूनिवर्सिटी (म्हैसुर), अण्णा विद्यापीठ इ.
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना पद्मविभूषण, पद्मभूषण, भारतरत्न, वीर सावरकर पुरस्कार, इंदिरा गांधी पुरस्कार, रामानुजन पुरस्कार अश्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी 27 जुलै 2015 रोजी अचानक हृदयविकाराच्या झटक्यामुळे मेघालय येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देशातील तरुणांसाठी ते एक महान व्यक्तिमत्व आणि प्रेरणास्थान होते आणि राहतील..!