Skip to content

Aadhar PVC Card Meaning In Marathi – PVC Aadhar Card Order in Marathi – PVC आधार कार्ड कसे मागवावे?

    Aadhar PVC Card Meaning In Marathi- PVC आधार कार्ड कसे मागवावे? आधार कार्ड आता प्रत्येक भारतीय नागरिकासाठी एक महत्वपूर्ण डॉक्यूमेंट बनले आहे. याच्या विणा सर्व महत्वपूर्ण काम थांबले जाते. आणि कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घ्यायचे असले तर त्यासाठी पन आधार कार्ड गरजेचे आहे. आधार कार्ड बनवणाऱ्या भारत सरकारच्या official वेबसाइट UIDAI कडून एक मोठी महत्वपूर्ण अपडेट आली आहे. आता तुम्ही PVC प्लास्टिक आधार कार्ड ला ऑनलाइन तुमच्या पत्त्यावर पोस्टाद्वारे मागवू शकता.

    PVC Aadhar Card Online Order In Marathi - PVC आधार कार्ड ऑनलाइन कसे मागवावे?

    कागदाच्या आधार कार्ड सोबत सगळ्यात मोठी अडचन म्हणजे ते पावसात भिजल्याने लवकर खराब होते. आणि त्याच्या वरील सर्व आधार डिटेल्स अंधुक होवून जाते. पण प्लास्टिक आधार कार्ड मध्ये अस काहीही नाहीये. या आर्टिकल मध्ये आपन जाणून घेणार आहोत की PVC (Polyvinyl Chloride Cards) प्लास्टिक आधार कार्ड ला कसे बनवायचे आणि त्याला आपल्या घरच्या पत्त्यावर कसे मागवाचे.

    Aadhar PVC Card Meaning In Marathi – PVC प्लास्टिक आधार कार्ड कसे मागवावे?

    Step#1.सगळ्यात आधी तुम्ही तुमचे ब्राउजर ओपन करा आणि गूगल मध्ये सर्च करायचे आहे UIDAI (The Unique Identification Authority of India) आणि सर्वात पहिल्या लिंकवर क्लिक करायचे आहे. जसे खाली फोटो मध्ये दिलेले आहे.

    PVC प्लास्टिक आधार कार्ड कसे मागवावे

    Step#2. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर आधार कार्ड ची ऑफिशियल वेबसाइट ओपन होईल. इथे तुम्हाला खाली Get Aadhar वाल्या सेक्शन मध्ये Order Aadhar PVC Card वर क्लिक करायचे आहे.

    Order Aadhar PVC Card

    Step#3. आता तुम्हाला इथे आधार नंबर असेल तर तो टाकायचा आहे नाही तर वर्चुअल आयडी टाकायची आहे. त्यानंतर secrurity कोड भरून Send OTP या बटनावर क्लिक करायचे आहे.

    pvc aadhar card in marathi

    Step#4. आता तुमच्या आधार कार्ड ला जो मोबाइल नंबर लिंक आहे त्यावर 6 आंकाचा एक OTP आलेला असेल तो Enter Otp/TOTP या सेक्शन मध्ये टाकायचा आहे आणि Term and Conditions वर टिक करून Submit या बटनावर क्लिक करायचे आहे.

    pvc card apply online marathi

    Step#5. सबमिट केल्यावर तुमचा फोटो, जन्म तारीख, आणि पत्ता तुमच्या समोर खुलेल जो तुमच्या आधार कार्ड वर आहे. तुम्ही नीट चेक करून घ्यायची आहे आपली डिटेल्स आणि Make Payment वर क्लिक करायचे आहे.

    PVC Aadhar Card Online Order In Marathi - PVC आधार कार्ड ऑनलाइन कसे मागवावे?

    Step#6. मेक पेमेंट वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर पेमेंट विंडो ओपन होईल. जिथे तुम्ही 3 पद्धतीने पेमेंट करू शकतात. 

    • Card (Credit/Debit)
    • Net Banking
    • UPI

    तुमच्या कडे जो पेमेंट मेथड उपलब्ध असेल त्याने तुम्हाला 50 रुपयाचे पेमेंट करायचे आहे. 

    PVC Aadhar Card Online Order In Marathi - PVC आधार कार्ड ऑनलाइन कसे मागवावे?

    Step#7. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तुमच्या समोर Transaction Successfull चे एक वेबपेज खुलेल. ज्यात तुम्हाला तुमच्या पेमेंट ची तारीख आणि SRN नंबर बघायला मिळेल. तुम्हाला SRN नंबरला कुठेही डायरी मध्ये लिहून ठेवायचे आहे मग तुम्ही केव्हा ही त्याचे स्टेटस चेक करू शकाल. आणि Payment Receipt ला डाऊनलोड करून घ्या. 

    आता तुमचे PVC प्लास्टिक आधार कार्ड प्रिंट होवून 15 ते 20 दिवसात तुमच्या पत्त्यावर येईल. धन्यवाद..

    Tags: Aadhar PVC Card Meaning In Marathi