Section 509 IPC In Marathi – 509 Kalam In Marathi कलम 509 माहिती मराठी : नमस्कार मित्रांनो, 509 कलम म्हणजे काय? या बद्द्ल संपूर्ण माहिती सांगणार आहे म्हणून पोस्ट पूर्ण वाचा जेणेकरून तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती मिळेल आणि पोस्ट आवडल्यावर तुमच्या मित्रांना शेयर करायला विसरु नका धन्यवाद..

509 IPC In Marathi कलम 509 माहिती मराठी
(509 IPC In Marathi कलम 509 माहिती मराठी)

509 IPC In Marathi कलम 509 माहिती मराठी

५०९. स्त्रीरीचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने शब्दोच्चार, हावभाव किवा कृती करणे.

कोणत्याही स्त्रीचा विनयभंग करण्यासाठी जो कोणी, एखादा शब्द किंवा आवाज अशा स्त्रीच्या कानावर पडावा अथवा एखादा हावभाव किवा वस्तू तिच्या नजरेला पडावी या उद्देशाने असा शब्द उच्चारील, असा आवाज किंवा हावभाव करील किंवा, अशी वस्तू प्रद्शित करील, अगर अशा स्त्रीच्या एकांतपणाचा भंग करील त्याला तीन वर्षेर्यत वाढविता येईल इतक्या मुदतीची साध्या कारावासाची आणि द्रव्यदंडाचीसुद्धा शिक्षा होईल.

टीप १ : अपराधाचे स्वरूप : स्त्रीयांसंबंधी जे विविध अपराध होतात त्यांपेिकी हा शेवटचा अपराध होय. आय. पी.सी. कलम २९ २ ते ३७६ पर्यत विविध अपराध आहेत. जसे २९२, २९४, ३५४, ३६३- ३६६, ३७२, ३७३ वगेरे. या कलमांप्रमाणे शारोरिक स्पर्श न करितादेखील अपमान-विनयभंग होतो.

टीप २ : या कलमाचे महत्त्वाचे घटक पुढीलप्रमाणे :
१. आरोपीचा इरादा ख्रीचा अपमान करणे अगर विनयभंग करण्याचा असतो.
२. ख्त्री कोणत्याही वयाची (कलम १० ) असते, आरोपी त्याकरिता पुढील कृत्ये करतो.
(अ) एखांदा शब्द वापरतो.
(ब) आवाज काढणे, अगर
(क) हावभाव करणे.
(ड) वस्तू दाखविणे.
(इ) एखादी वस्तू पोस्टाने पाठविणे.
(फ) तिच्या एकॉतवासावर (PRIVACY) आतिक्रमण करणे. भंग करणे.

टीप ३ : आरोपीचा इरादा : या कलमाचा महत्त्वाचा घटक होय. पाहा ‘फियाझ महमद’ (१९०३)५ Bom. LR. ५०२. या कलमाप्रमाणे आरोपीने जर उघडे शरीर दाखविले, बीभत्स शब्द वापरले, बीभत्स चित्र, फोटो दाखविले, वगैरे प्रकार अपराधात मोडतात. आरोपीने बंद पाकिटामधून एका नर्सला पत्र पाठवून त्यात बीभत्स भाषा वापरली, तर पत्र ही वस्तू प्रदर्शित (EXHIBITED) झाली. अपराध घडला. पाहा. ‘तरकदास गुप्ता’ ( १९२५) २८ Bom.L.R. ९९; पण ख्रीसंदर्भात शिवीगाळ, दमदाटी असेल तर तो आपराध कलम ५०६ खाली जातो. या कलमात येत नाही. पाहा अनुराधा अार. क्षीरसागर वि. महाराष्ट्र राज्य’ १९९१. CR. LJ, ४११.

टीप ४: एकांतवासाचा भंग करणे : या संदर्भात काही न्यायनिवाड़े मार्गदर्शक व्हावेत. १. मध्यरात्री घरात प्रवेश करणे : या घटनेत आरोपी अचानक एका खोलीत शिरला तर तेथे चार बायका होत्या. ओरडा होताच त्याला पकडण्याचा प्रयत्ल झाला; पण तो पळाला, तर हा अपराध कलम ४४१ लक्षात घेता घडला. पाहा ‘परमानंदों वि. ब्रिदोबन चंग (१८९५) २२ Cal. ९९४; तसेच ‘बालमुकुंद राम वि. धनसाराम (2493) RR Cal. ?RR. २. पूर्वपरिचित स्त्रीच्या घरात शिरणे : या घटनेत आरोपी रात्रीच्या वेळी एका स्त्रीच्या घरात शिरला. ती त्याच्या पूर्वीच्या ओळखीची होती. ती ख्री भेटणाच्या। इसमांशी बोलत असे, पानसूपारी देत असे, तर हा अपराध घडला नाही. पाहा फियाझ महंमद’ (१९०३) ५ Bom. LR. ५०२ पण इतर कृत्य केल्याने अपराध होतो; परंतु एकोतपणाचा भंग नाही. ३. गाडीमधून पाठलाग करणे : या घटनेत आरोपीने आपल्या गाडीत बसून एका तरुण मुलीचा पाठलाग केला. अनेक ठिकाणी तो मागे-मागे होता. तिच्याकडे रोखून पाहत होता, हसत होता. तिचे नाव घेऊन ओरडत होता, तर हा अपराध घडला. या संदर्भात हायकोर्टनि शिक्षा कायम करताना म्हटले की, या देशात ख्रिया- मुली आता बाहेर पडत आहेत. त्यांच्या संदर्भात वरील वर्तन निश्वितच अपराध होतो.’ पाहा ‘महंमद कासम खिस्ती’ (१९११) क्रिमिनल अपील नंबर ४५४ सन १९१० निकाल तारीख १८ जानेवारी १९११. न्यायमूर्तीं चंदावरकर आणि हिटोंन (अन् रिपोर्टेड,
मुंबई केस.)

टीप ५ : कार्यपद्धती : अपराध दखलपात्र, जामीनपात्र, प्रथम वर्ग न्यायाधीशांपुढे चालणारा, क्रि. प्रो. कोड कलम ३२० (२ ) प्रमाणे कोर्टाची परवानगी घेऊन मिटविता येतो, हे कलम महाराष्ट्र कायदा नें. ४ सन १९६५ अन्वये दखलपात्र केले आहे. महाराष्ट्र राज्य राजपत्र ११ जानेवारी १९६५.

#TAGS: 509 IPC In Marathi, 509 kalam in marathi, कलम 509 माहिती मराठी.