Section 506 IPC In Marathi – 506 Kalam In Marathi 506 कलम म्हणजे काय मराठी : नमस्कार मित्रांनो, 506 कलम म्हणजे काय? या बद्द्ल संपूर्ण माहिती सांगणार आहे म्हणून पोस्ट पूर्ण वाचा जेणेकरून तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती मिळेल आणि पोस्ट आवडल्यावर तुमच्या मित्रांना शेयर करायला विसरु नका धन्यवाद..

506 कलम म्हणजे काय मराठी 506 Kalam In Marathi
(506 कलम म्हणजे काय मराठी 506 Kalam In Marathi)

506 Kalam In Marathi 506 कलम म्हणजे काय मराठी

५०६. फौजदारीपात्र धाकदपटशाबद्दल शिक्षा.

जो कोणी फौजदारीपात्र धाकदपट शाचा अपराध करील त्याला दोन वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची, किंवा द्रव्यदंडाची, किवा दोन्ही शिक्षा होतील. मृत्यू किवा जबर दुखापत घडवून आणण्याची धमकी असल्यास : आणि जर मृत्यू किवा जबर दुखापत घडवून आणण्याची, अथवा आग लावून कोणतीही मालमत्ता नष्ट करण्याची, अथवा मृत्यूच्या किवा आजन्म कारावासाच्या, किवा सात वर्षाप्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासच्या शिक्षेस पात्र असलिला अपराध घडवण्याची, अथवा कोणत्याही स्त्रीवर व्यभिचारीपणाचा अभ्यारोप करण्याची धमकी असेल, तर त्याला सात वर्षापर्येंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची, किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.

टीप १ : शिक्षा कलम : यापूर्वीच्या कलम ५०३ मध्ये फौजदारीपात्र धाकदपटशा (CRIMINAL INTIMIDATION) या अपराधाची सविस्तर व्यारख्या दिलेली आहे, त्या अपराधाचे हे शिक्षा कलम आहे. त्यात दोन भाग आहेत. भाग १ प्रमाणे सर्वसाधारण धाकदपटशा असेल, तर कमी शिक्षा- दोन वर्षापर्यत अगर द्रव्यदंडाची शिक्षा आहे, तर भाग २ प्रमाणे ठार मारण्याची वगेैरे असेल, तर कडक शिक्षा सात वर्षापर्यंत सांगितली आहे, अगर दंड, अगर दोन्ही आहेत.

टीप २ : कलम ५ ० ६ भाग २ शिक्षा : भाग २ प्रमाणे धमकीचे स्वरूप पुढ़ीलप्रमाणे असते :
१. ठार मारणे, अगर
२. जबर दुखापत करण्याची (आय. पी.सी. कलम ३२०).
३. आग लावून मालमत्ता नष्ट करणे (आय. पी.सी. कलम ४३५, ४३६,
४. ज्या अपराधास फाशी, आजन्म कारावास, सात वर्षापर्यंत शिक्षा आहेत अशा Y2). आरोपाची धमकी.
५. स्रीवर व्यभिचारीपणाचा आरोप करणे (UNCHASTITY).

टीप ३ : काही न्यायनिवाडे : एका घटनेत आरोपीने रात्री घरात शिरून चाकू हातात ठेवून धमकी दिली की, ‘जर कोणी माझ्यामध्ये पडले तर त्यास ठार मारण्यात येईल, तर हा अपराध घडला. पाहा ‘घनश्याम वि. मध्य प्रदेश सरकार’ C.L.J. १०१७. धमकी खरी-वास्तव पाहिजे. म्हणजे आरोपी म्हणेल ते करेल आणि तशी भीती फिर्यादीसपण वाटते. पाहा ‘नोबल मोहनदास वि. राज्य सरकार’ १९८९ Cr.L.J. Ę3 Mad.

टीप ४ : कार्यपद्धती : कलम ५०६ दोन्ही भाग (१) (२) N.C., जामीनपात्र, प्रथम वर्ग न्यायाधीशांपुढे चालणारा आहे. भाग (१) फक्त आपसात को्टाच्या परवानगीशिवाय मिटविता येतो- क्र.प्रो. कोड कलम ३२० (१) प्रमाणे. कलम ५०६ (२) जरी N.C. असले, तरी प्रमुख शहरांत- मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अकोला, अमरावती या ठिकारणी महाराष्ट्र राज्याने हाच अपराध दखलपात्र, बिगर जामिनाचा
केलेला आहै. पाहा ‘महाराष्ट्र राज्य गॅँझेट १२-१०-६१ भाग ४, पान ७५२’; तसेच क्रि. लॉ अमेंडमेंट अॅक्ट १९३२ चा क्रमांक एम.बी. आय./ सी.एल. ए. १०६० / २६९६३’कलम १० अन्वये., फौजदारी धाकदपटशाबद्दल शिक्षा (क, ५० ६) सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा :
हिमाचल प्रदेश वि. प्रेमसिंग AIR २० ०९ SC १०१० या केिसमधील आरोपी शिक्षक होता. त्याने तक्रारदार मुलीला लैगिक उन्मादाने त्रस्त केले आणि स्त्रीच्या सलज्जतेचा अवमान केला होता त्याचप्रमाणे त्याने अन्य विद्यार्थिनींच्या बाबतीतही सलज्जतेचा अवमान केल्याचा त्याच्यावर आरोप होता. पण त्याच्यावरील बलात्काराचा गुन्हा, पुरेशा पुराव्याअभावी शाबीत होऊ शकला नाही. मात्र न्यायालयाने आरोपीचा गुन्हा क. ३५४/५०६ मध्ये रूपांतरित किला व आरोपीला शिक्षा ठोठावली.

टीप ५ : ५०६ ‘खालील फोजदारी’ धाकदपटशा हा अदखलपात्र, जामीनयोग्य व सहमतीने मिटविता येणारा आणि दंडाधिकार्यापुढे चालणारा गुन्हा आहे. मात्र धाकदपटशा गंभीर इजा करणारा किंवा मृत्यू आणण्यास कारणीभूत होणारा असेल, इ. तर क. ५०६ भाग II मध्ये सांगितल्याप्रमाणे हा गुन्हा अजामिनपात्र ठरेल व गुन्ह्याचे गांभीर्य विचारात घेऊन प्रथम वर्ग दंडाधिकार्यापुढे चालविला जाईल.

#TAGS: 506 कलम म्हणजे काय मराठी, 506 Kalam In Marathi, 506 IPC In Marathi.