504 कलम मराठी माहिती, 504 Kalam In Marathi: नमस्कार मित्रांनो, 504 कलम म्हणजे काय? या बद्द्ल संपूर्ण माहिती सांगणार आहे म्हणून पोस्ट पूर्ण वाचा जेणेकरून तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती मिळेल आणि पोस्ट आवडल्यावर तुमच्या मित्रांना शेयर करायला विसरु नका धन्यवाद..

504 Kalam In Marathi
(504 Kalam In Marathi)

504 कलम म्हणजे काय? | 504 कलम मराठी माहिती | 504 Kalam In Marathi

कलम 504 : शांतताभंग घडवून आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे. जर कोणी उद्देशपूर्वक अपमान करून त्यायोगे कोणत्याही व्यक्तीला प्रक्षोभित करेल आणि अशा प्रक्षोभनामुळे तिच्याकडून सार्वजनिक शांततेचा भंग व्हावा, किंवा अन्य कोणताही अपराध घडोवा असा त्यामागे त्याचा उ्देश असेल, किंवा तसे होण्याचा संभव असल्याची त्याला जाणीव असेल, तर त्याला दोन वर्षापर्यत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यां तरी एका वर्णेनाच्या कारावासाची, किवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.

टीप १ : व्याख्या आणि शिक्षा कलम : या कलमाप्रमाणे आरोपी हेतुपुरस्सर फियोदीचा अपमान करतो, तो शब्दाने अगर कृतीने असतो. तो अशा प्रकारचा असतो की, त्यामुळे फियादीला राग येऊन तो सार्वजनिक शांतताभंग करण्यास, अगर कोणताही गुन्हा करण्यास कारणीभूत होतो. एकाच कलमात व्याख्या आणि शिक्षापण सांगितली आहे.

टीप २ : या कलमाचे महत्त्वाचे घटक :
१. आरोपी उद्देशपूर्वक फिर्यादीचा अपमान करतो.
२. त्यामुळे त्याला राग अनावर होतो. शांततेचा
३. आरोपीला त्यामुळे जाणीव असते की, त्यामुळे फिर्यादी सार्वजनिक भेंग करण्याची शक्यता आहे, अगर
४. इतर कोणताही अपराध करण्याची शक्यता आहे. शक्यता पुरेशी आहे.

टीप ३ : काही न्यायनिवाडे : या घटनेत आरोपीने फिर्यादीचा अपमान केल्याने, शिवीगाळ केल्याने त्याला राग अनावर झाला. त्याचा परिणाम लोक जमून सार्वजनिक ‘जोधसिंग वि. उत्तर प्रदेश सरकार. १९९१ C. L.J. ३२२६ AII. आरोपी जर जनसेवक असेल आणि कर्तव्य करत असताना असा अपराध केला तरच पूर्वमंजुरी लागते. त्यामुळे पोलिस लॉकअपमधील कैद्यास पोलिस अधिकान्याने शिवीगाळ केली अगर अपमान केला, तर पूर्वमंजुरी गरज नाही. पाहा ‘आबनी बिस्वाल वि. ओरिसा राज्य,’ १९८८०LJ १०३८ Orrisa.
शातताभग झाला, तर अपराध आहे.

टीप ४: जाणीवपूर्वक अपमान : केवळ शिवीगाळयुक्त भाषा वापरली म्हणजे पराध नसतो, तर त्यामागे शांतताभंग होईल याची जाणणीव, अगर इरादा पाहिजे. पाहा ‘सदानंद वि, सिबकाली १९५४ CrLJ. ८००, तसेच १९७२ CL. १६८५. राग येण्याचे कारण परिस्थिती, शब्दाने, अगर कृतीने निर्माण होते, ‘भीमा वि. qe’ 23€Y (R) Cr. L.J,. 6gR.

टीप ५ : वापरलेल्या शब्दांचा उल्लेख : फिर्यादीत साक्ष देताना अगर चार्जमध्य आरोपीने निश्चित कोणते शब्द वापरले याचा संदर्भ पाहिजे (शिवीगाळ), तरच शिक्षा होते. पाहा ‘रामेश्वर प्रसाद वि. राज्य सरकार’ १९८४ CrL.J, ९९६.

टीप ६ : आत्मसंरक्षणाचा अधिकार : वापरण्याकरिता शिवीगाळ केली हा बचाव आरोपीला घेता येत नाही. पाहा ‘सेराई वि. बिपीन बेहारी’ A.1.R. १९५९ Ori. 244= 2343 Cr.L.J. 2o85.

टीप ७ : कार्यपद्धती : अपराध N.C., जामीनपात्र, प्रथम व्ग न्यायाधीशापुढे चालणारा, कोटोची परवानगी न घेता आपसात मिटविता येतो. क्रि. प्रो. कोड कलम ३२० (१) प्रमाणे.

Tags: 504 कलम म्हणजे काय, 504 कलम मराठी माहिती, 504 Kalam In Marathi.