427 Kalam In Marathi 427 – Section 427 IPC In Marathi : नमस्कार मित्रांनो, 427 कलम म्हणजे काय? या बद्द्ल संपूर्ण माहिती सांगणार आहे म्हणून पोस्ट पूर्ण वाचा जेणेकरून तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती मिळेल आणि पोस्ट आवडल्यावर तुमच्या मित्रांना शेयर करायला विसरु नका धन्यवाद..

427 Kalam In Marathi 427 कलम म्हणजे काय
(427 Kalam In Marathi 427 कलम म्हणजे काय)

427 Kalam In Marathi 427 कलम म्हणजे काय? | Section 427 IPC In Marathi

४२७. पन्नास रुपये इतक्या रकर्मेचे नुकसान करून आगळीक करणे.

जो कोणी आगळीक करील आणि त्यायोगे पत्नस रुपये किवा त्याहन अधिक रकमेपर्यत हानी अथवा नुकसान घडवून आणील त्याला दोन वर्षपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.

टीप १: रुपये पत्नास अगर जास्त नुकसान झाल्यास या कलमाचा वापर करून शिक्षा देणारे हे कलम आहे.

टीप २: महत्त्वाचे घटक :
१. आय. पी. सी. कलम ४२५ प्रमाणे नुकसान फेरफार-बदल वगैरे करून झालेले नुकसान रुपये पन्नास अगर जास्त असते.
२. बाकी सर्व घटक व्याख्या कलम ४२५ प्रमाणे असतातच.

टीप ३ : वगवेगळ्या कारणांकरिता स्वतंत्र कलमे आहेत; परंतु वस्तूच्या किमतीनुसार आणि झालेल्या नुकसानीच्या रकमेप्रमाणे हे कलम वापरता येते.

टीप ४ : कार्यपद्धती : N. C. जामीनपात्र- प्रथमवर्ग न्यायाधीशांपुढे चालणारा आहे. फिर्यादी- आरोपी यांना आपसात क्रि. प्रो. कोड कलम ३२० (१) प्रमाणे मिटविता येतो. कोर्टाची पूर्वपरवानगी लागत नाही. पन्नास रुपये इतक्या रकमेचे नुकसान करून आगळीक (क. ४२७)
यावरील सर्वच्च न्यायालयाचा निवाडा : जयासिंग वि. के. के. वायुयुथ्रम आणि इतर AIR २०० ६ SC २४०७. आरोपीच्या पत्नीने सरकारी हॉस्पिटलच्या परिसरात एक चहाचे दुकान सुरू केले. वस्तुतः अशा स्पाष्ट सूचना होत्या की, हॉस्पिट आवारात चहाचे दुकान उघडता येणार नाही. त्यामुळे शासकीय आदेशानुसार ते दुकान पाडून टाकण्यात आले. तक्रारदाराने क. ४२७ खाली कार्यकारी अभियंत्याविरुद्ध कारवाई सुरू केली आगळीकीची. हा गुन्हा ट्रायल कोटनि फेटाळून लावला, उच्च न्यायालयानेही ‘लोकहेतू’ (Public lnterest) या कारणाने, ट्रयल कोर्टाचा निकाल कायम केला. उच्च न्यायालयाने असेही म्हटले की, कार्यकारी अभियंत्यावर गुन्हा दाखल करण्यापूर्वीं, क्रि.ओर. कोड क. १९७ प्रमाणे शासनाची संमती घेणे आवश्यक होते, या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने आभिनिर्धारत केले की, कार्यकारी अभियंत्याने अनेक लोकांच्या भल्यासाठी (larger Public Interest) शासकीय आदेशानुसार त्याने दुकान पाडून टाकले असल्यामुळे त्यास दोषी ठरविता येणार नाही.

#tags: 427 Kalam In Marathi, section 427 ipc in marathi, 427 ipc in marathi, indian penal code 427 in marathi, 427 कलम म्हणजे काय.