Section 420 IPC In Marathi – 420 Kalam In Marathi कलम 420 माहिती मराठी : नमस्कार मित्रांनो, कलम 420 म्हणजे काय? या बद्द्ल संपूर्ण माहिती सांगणार आहे म्हणून पोस्ट पूर्ण वाचा जेणेकरून तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती मिळेल आणि पोस्ट आवडल्यावर तुमच्या मित्रांना शेयर करायला विसरु नका धन्यवाद..

420 Kalam In Marathi
(420 Kalam In Marathi)

420 Kalam In Marathi | 420 IPC In Marathi कलम 420 माहिती मराठी

४२०. ठकवणूक करणे आणि मालमत्तेची सुपूर्तगी करण्यास अप्रामाणिकपणाने प्रवृत्त करणे.

जो कोणी ठकवणूक करील आणि त्यायोगे, एखाद्या इसमाकडे एखादी मालमत्ता सुपूर्त करण्यास अथवा एखादा मूल्यवान रोखा संपूर्णपणे किंवा त्याचा कोणताही भाग अगर जी स्वाक्षरित किंवा मुद्रांकित आहे व मूल्यवान रोख्यात रूपांतरित करता येण्यासारखी आहे, अशी कोणतीही वस्तू बनवण्यास, तीत फेरबदल करण्यास किवा ती नष्ट करण्यास याप्रमाणे फसवल्या गेलेल्या व्यक्तीला अप्रामाणिकपणाने प्रवृत्त करील त्याला सात वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.

टीप १ : शिक्षा देणारे हे शेवटचे कलम चौथा प्रकार आहे. या कलमाप्रमाणे विविध प्रकारची फसवणूक मुख्यत पैसे-मिळकत -किमती दस्तऐवज वगैरेबाबत तरतूद आहे. शिक्षा जास्त कडक सात वर्षापर्यत आणि द्रव्यदंड आहे.

टीप २: या कलमाखाली अपराधाचे स्वरूप पुढ़ीलप्रमाणे असते.
१. मिळकतीचे-पैशाचे नुकसान होते.
२. किमती दस्तऐवजाबाबत- संपूर्णपणे तयार केला जातो, अगर त्यात फेरपफार केला जातो, अगर नाहीसा केला जातो.
३. वरील प्रकारचे बदल संपूर्ण दस्तिएवजाबाबत अगर काही भागाबद्दल होऊ
४. को्या कागदावर सही-शिक्का घेतला जातों आणि त्याचा वापर पुढे किमती शकतात.

टीप ३: या कलमाखाली शिक्षा देण्याकरिता अगदी सुरुवातीपासूनच आरोपीचा दस्तएवजाकरता होतो. फसवणुकीचा इरादा पाहिजे. पाहा ‘मुबारक अली’ (१९५८) S. C. R. ३२८.

टीप ४ : मिळकत म्हणजे काय? : मिळकत म्हणजे त्याला पैशाची किमत पाहिजे असे नाही, तर त्या वस्तूचे मूल्य-महत्त्व विचारात घेता येते. त्यामुळे पास- परीक्षा- प्रवेश-कार्ड- पासपोर्ट वगैरे मिळकत होते. पाहा : ‘ईश्वरलाल गिरधारीलाल वि. राज्य सरकार.’ ७१ Bom. L. R. ५२.S. C.; तसेच एन. एम. चक्रभारती १९७७ও Cr. L. J. ER S. C.; đHT 344de’ 36-? Cr. L. J. ?2 S. C. डायव्हिग लायसेनस देखील यात येते. पाहा : ‘रामचेंद्र A.I. R. १९६६ Raj- १८२.

टीप ५ : खरेदी-विक्री करारभंग : यात अटींचा भंग झाला, तर कलम ४०५ प्रमाणे विश्वासघाताचा अपराध होतो तो या कलमाखाली बसत नाही.

टीप ६ : प्रयत्न करणे : एक इसम सोनाराकडे काही धातूचे तुकडे घेऊन गेला. तर प्रयतन झाला. पाहा : सोने नसताना सोने सांगितले. सोनाराने घेतले नाही, Hl 232% P. R. No. 2% of 232% [YGG hs R6R-R323]

टीप ६ : कार्यपद्धती : अपराध दखलपात्र-बिगर जामिनाचा- प्रथम वर्ग न्यायाधीशांपुढे चालणारा आहे. क्रि.श्रो.कोड कलम३२०(२) प्रमाणे कोर्टाच्या पूर्वपरवानगीने आपसात मिटविता येतो, ठकवणूक (क. ४२০) संबंधी सर्वोच्च न्यायालयाचा निवाड़ा : (१) अजय मित्रा वि. मध्य प्रदेश राज्य आणि अन्य AIR २००३ SC १०६९, या केसमध्ये सर्वॉच्च न्यायालयाने आभिनिर्धारीत केले की, लबाडीचा हतू हा ठकवणूकीच्या गुन्ह्याचा एक आवश्यंक घटक आहे. म्हणून हा गुन्हा ‘अपराधी मन (mens rea) असल्याशिवाय घडूच शकत नाही. तक्रारदार जोपर्यंत दाखवृन देत नाही की ज्या वेळेस त्याला मालमत्ता सोडण्यास / देऊन टाकण्यास प्रवृत्त केले गेले त्यावेळी फसविणाराने लबाडीच्या हेतूनेच तसे केले होते, तोपर्यत क ४२० खाली गुन्हा शाबीत होत नाही, तो ठकवणुकीचा गुन्हा न होता करारभंगाचा अपराध होईल. यावर केवळ् दिवाणी कायद्याप्रमाणे कारवाई होऊ शकते. म्हणून ठकवणुकीचे बाबतीत आरोपीचा
फसविण्यांचा हेतू निरविवादपणे सिद्ध झालाच पाहिजे.

(२) सोमा चक्रबोर्ती वि. दिल्ली राज्य (सी. बी. आय. मार्फत) AIR २००७ SC २१४९. या केसमध्ये आरोपी हा केंद्र शासनाच्या सेवेत होता. तिला बिले तपासण्याचा किंवा सह्या करण्याचा कोणताही अधिकार दिलेला नव्हता. असे असूनसुद्धा ती सहआरोपीच्या दुर्लक्ष करण्यामूळे प्रतिवादी कॉर्पेरेशनला फसविण्यासाठी/ उकवणुकीसाठी बिलांवर सहा करीत असे, तिचे म्हणणे होते की, ती आपल्या कर्तव्यांचा भाग म्हणून नेहमीप्रमाणे आपण सह्या करायचो. हिशेब विभागाने ती बिले तपासण्याकडे दुर्लक्ष केले आहे. अभिनिर्धारीत केले गेले की, जेव्हा एखादी व्यक्ती महत्त्वाच्या कागदपत्रावर/ दस्तऐवजांवर सही रते त्यावेळ्ी तिने सही करण्यापूर्वीं खातरजमा करून घेणे अपेक्षित आहे. सर्वोच्च न्यायालयाने, या केसमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, आरोपीने आपल्या पदाचा उपयोग करून, जवळजवळ ३१,००,००০ रुपयाचा गैरफायदा करून घेऊन फौजदारी स्वरूपाचा कट केलेला आहे व कॉर्पोरेशनला म्हणजे पर्यायाने कैंद्र शासनाला ठकविले आहे. त्यामुळे ट्रायल कोटनि तिच्यावर ठेवलेला दोषारोप योग्य असून, त्या कोटनि लवकरात लवकर पुढील कारवाई करावी.

(३) देवेंद्र्पा वि. करनाटिक राज्य AIR २००७ SC १७४१ या केसमधील आरोपीने तक्रारदाराला फसविण्याच्या उद्देशाने एक प्लॉट रु.
३०००स खरेदी करण्यास उद्युक्त केले. आपणच प्लॉटचे मालक आहोत असे सांगून ६ ते ८ महिन्यांत प्लॉट तक्रारदाराच्या नावावर करून देण्याचे त्याने वचन दिले. तक्रारदाराने आरोपीला आगाऊ रक्कम म्हणून रु. २०८ दिले, पण वारंवार तगादा लावूनहीं आरोपीने प्लॉट तक्रारदाराच्या नावावर करून दिला नाही. पुढे तक्रारदाराला असे कळले की, प्रत्यक्षात तो प्लॉट आरोपीच्या मालकीचाच नाही त्यामुळे तक्रारदाराने क. ४२० प्रमाणे आरोपीवर गुन्हा दाखल केला. आरोपीने अशा प्रकारे अनेकांना फसवून बरीच माया जमा केली होती. उच्च न्यायालयाने आरोपीला ट्रायल कोर्टानि दिलेली ३ वर्र्षाची कारावासाची शिक्षा कमी करून ६ महिने कारावास आणि रु. २००० द्व्यदंड अशी शिक्षा दिली.,. आरोपीने स्वोच्च न्यायालयात अशी भूमिका घेतली की त्याची केस दिवाणी स्वरूपाची आहे, (तो केवळ करारभंग आहे) त्यामुळे त्याच्यावर क. ४२० प्रमाणे कारवाई होऊ शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने त्याचे हे म्हणणे नाकारले आणि आभिनिर्धारीत केले की, या केससारख्या काही केसेस अशा असतात की, त्या दिवाणी आणि फौजदारी अशा दोन्हीही न्यायालयात चालविल्या जातात. त्यामुळे अारोपीवरील कारवाई फौजदारी न्यायालयाच्या कक्षेबाहेर नाही. आरोपीला क, ४२० प्रमाणे दोषी ठरविणे आणि शिक्षा देणे हे योग्य आणि न्याय्य आहे त्यामुळे या न्यायालयाच्या हस्तक्षेपाची आवश्यकता नाही.

#TAGS: 420 Kalam In Marathi, 420 IPC In Marathi, कलम 420 माहिती मराठी, 420 कलम म्हणजे काय.