370 Kalam In Marathi – 370 IPC In Marathi : नमस्कार मित्रांनो, 370 कलम म्हणजे काय? या बद्द्ल संपूर्ण माहिती सांगणार आहे म्हणून पोस्ट पूर्ण वाचा जेणेकरून तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती मिळेल आणि पोस्ट आवडल्यावर तुमच्या मित्रांना शेयर करायला विसरु नका धन्यवाद..

370 कलम म्हणजे काय? 370 Kalam In Marathi
(370 कलम म्हणजे काय? 370 Kalam In Marathi)

370 कलम म्हणजे काय? 370 Kalam In Marathi | 370 IPC In Marathi

३७०. व्यक्तीची खरेदी विक्री (मनुष्यव्यापार).

(१) जो कोणी-शोषण करण्याच्या हेतूने, (अ) (मनुष्य) भरती करील, (ब) वाहतूक करील, (क) (मनुष्यास) आश्रय देईल, (ड) बदली किंवा हस्तांतरण करील, किंवा (इ) एखाद्या व्यक्तीला किंवा व्यक्तींना स्वीकारील किंवा मिळवील. त्याच्या पद्धती पहिले : धाकदपटशा वापरून, किवा दुसरे : बळाचा वापर करून, किवा जबरदस्तीने, किंवा तिसरे : सक्तीने पळवून नेऊन, किवा चवथे : लबाडी करून, किंवा फसवून, किंवा पाचवे : सत्तेचा दुरूपयोग करून, किंवा सहावे : भरती केलेल्या, ट्वान्सपोर्ट केलेल्या, आश्रय दिलेल्या, हस्तांतरण केलेल्या किंवा मिळविलेल्या/ स्वीकारलेल्या व्यक्तीवर ज्याचे नियंत्रण आहे अशा व्यक्तीची संमती प्राप्त करण्याकरिता पैशांची किंवा लाभाची देवाण- घेवाण करणे याचा समावेश असलेले आमिष दाखवून (व्यक्तीची खरेदी- विक्री करील), त्याने मनुष्यव्यापाराचा गुन्हा केला आहे (असे समजण्यात येईल.

स्पष्टीकरण १: ‘शोषण’ या अभिव्यक्तीमध्ये शारीरिक पिळवणुकीची कोणतीही कृती किंवा लैगिक शोषणाचा, किंवा गुलामगिरी, दास्यत्व, बळजबरीने अवयव काढून घेणे किंवा तत्सम प्रथांचा समावेश होतो.

स्पष्टीकरण २ : मनुष्यव्यापाराच्या गुन्हा निश्चितीसाठी बाधित व्यक्तीच्या (बळी झालेल्या व्यक्तीची संमती महत्वाची नाही.) जो कोणी मनुष्य व्यापाराचा गुन्हा करील त्याला सात वर्षाहून कमी नाही; परंतु आजन्म सश्रम कारावास आणि द्रव्यदंडाचीही शिक्षा दिली जाईईल.

(३) जर मनुष्यव्यापाराच्या गुन्ह्यामध्ये एकापेक्षा अधिक व्यक्तीचा समावेश असेल (म्हणजे एकापेक्षा अधिक व्यक्तींची खरेदी-विक्री केली जात असेल) तर त्या गुन्ह्ासाठी दहा वरषापेक्षा करमी नाही, पण आजन्म कारावास आणि द्रव्यदंड अशी शिक्षा दिली जाईल.

(४) मनुष्यव्यापाराच्या गुन्ह्यामध्ये अज्ञान व्यक्तीची खरेदी-विक्री केलीजात असल्यास, त्या गुन्ह्यासाठी चौदा वरषापेक्षा करमी नाही पण आजन्म सश्रम कारावासाइतकी वाढ़विता येईल असा कारावास आणि द्रव्यदंडाचीही शिक्षा होईल.

(५) जर मनुष्यव्यापाराच्या गुन्हाामध्ये एकापेक्षा अधिक अज्ञान व्यक्ती असतील म्हणजे एकापेक्षा अधिक अज्ञान व्यक्तींची खरेदी-विक्री केली जात असेल, तर अशा गुन्ह्यास चौदा वर्षाहून कमी नाही, पण आजन्म सश्रम कारावासाइतका वाढविता येईल असा कारावास आणि द्रव्यदंडाचीही शिक्षा होईल.

(६) जर एखाद्या व्यक्तीवर एक किंवा अधिक अज्ञान व्यक्तींचा मनुष्यव्यापार करण्याचा गुन्हा एकापेक्षा अधिक वेळा शाबीत झाला तर त्या व्यक्तीला आजन्म कारावासाची शिक्षा दिली जाईल म्हणजेच त्या व्यक्तीचे उरवरित नैसगिक आयुष्य कारावासातच जाईल असा कारावास आणि द्रव्यदंडाचीही शिक्षा होईल.

(७) जेव्हा एखादा लोकसेवक किंवा पोलीस अधिकारी कोणत्याही व्यक्तीच्या मनुष्यव्यापारात गुंतलेला असेल, तेव्हा त्या लोकसेवकाला किंवा पोलीस अधिकार्याला आजन्म कारावासाची म्हणजे त्या व्यक्तीचे उरवरित आयुष्य कारावासातच जाईल असा कारावास आणि द्रव्यदंडाचीही शिक्षा होईल.

टीप : फौजदारी कायदा (सुधारणा) अधिनियम २०१३ (२०१३ चा १३) अन्वये मूळ् कायद्यातील क. ३७० हे काढून टाकले असून, त्या जागी क. ३७० हे नवीन तरतुदी असलेले कलम घातले आहे. या कलमांमध्ये मनुष्यव्यापार म्हणजे मनुष्याची खरेदी-विक्री करणारासाठी वेगवेगळ्या शिक्षा सांगितलेल्या आहेत. शोषणाचे हेतूने मनुष्यव्यापार या संकल्पनेत –
(अ) मनुष्याची भरती करणे
(ब) अशा मनुष्याची ने-आण करणे किंवा वाहतूक करणे
(के) आश्रय देणे
(ड) एखादी व्यक्ती प्राप्त करणे किंवा स्वीकारणे बाबींचा समावेश होतो, उपरोल्लेखित कृत्ये
(i) धाकदपटशा दाखवून,
(ii) बळाचा वापर करून,
(i) सक्तीने पळवून नेऊन,
(iv) लबाडीने किवा फसवून,
(v) सत्तेचा दुरूपयोग करून किंवा
(vi) आमिष दाववून केली जातात.

कलमाखाली दिलेल्या स्पर्ट्रीकरण १ मध्ये शोषण म्हणजे काय ते स्पष्ट केले आहे. त्यामध्ये अवयव-जसे किडनी, डोळे, प्लीहा इ. काढ़न घेणे यांचाही समावेश होतो.

स्पष्टीकरण २ मध्य हे स्पष्ट केले आहे की ज्याचे अवयव काढला/काढले आहे संमती हा गैरलागू मुद्दा आहे. त्याची संमती असली तरी अवयव काढणे हा शोषिणाचा गुन्हा आहेच. आहेत. त्या येणेप्रमाणे :- क. ३७० है शिक्षाकलम आहे. या कलमात सहा प्रकारच्या शिक्षा सांगितल्या द्रव्यदंड. (१) मनुष्यव्यापाराचा गुन्हा करणारास सात वर्ष ते आजन्म कारावास आणि सश्रम कारावास आणि द्रव्यदंड. (२) दोन किवा अधिक व्यक्तींची खरेदी-विक्री या गुन्ह्यास दहा वर्ष ते आजन्म कारावास आणि द्रव्यदंड. (३) अज्ञान व्यक्तीची खरेदी-विक्री या अपराधास चौदा वरषे ते आजन्म ते आजन्म सश्रम कारावास. आणि द्रव्यदंड. (४) एकापेक्षा अधिक अज्ञान व्यक्तींची रखरेदी-विक्री या अपराधास चौदा वर्षे (५) अज्ञान व्यक्तीचा पुनःपुन्हा मनुष्यव्यापार यासाठी आजन्म कारावास (६) लोकसेवक किंवा पोलीस अधिकारी मनुष्य व्यापारात गुंतलेला असल्यास- आजन्म कारावास आणि द्रव्यदंड – हा अपराध दखलपात्र, बिगरजामीनाचा असून, खटला सेशन्स कोर्टात चालेल.

३७०. अ. मनुष्यव्यापारात खरेदी- विक्री केली गेलेल्या व्यक्तीचे शोषण.

(१) जो कोणी, जाणिवपूर्वक किंवा अज्ञान व्यक्तीची खरेदी-विक्री झाली आहे असे समजण्यास विश्वसनीय कारण असताना, त्या अज्ञान व्यक्तीला कोणत्याही प्रकारच्या लेैंगिक शोषणासाठी उपयोगात आणतो/वापरतो. त्यास पाच वर्षाहून कमी नाही, पण सात वर्षापर्यत वाढविता येईल असा सश्रम कारावास आणि द्रव्यदंडाची शिक्षा होईल.

(२) जो कोणी जाणिवपूर्वक (माहिती असूनदेखील) किंवा त्या अज्ञान व्यक्तीची खरेदी-विक्री झाली आहे असे समजण्यास विश्वसनीय कारण असताना, त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारच्या लैंगिक शोषणासाठी उपयोगात आणतो/ वापरतो, त्यास तीन वर्षपिक्षा कमी नाही; परंतु पाच वर्षेपर्यत वाढविता यबईल असा सश्रम कारावास आणि द्रव्यदंडाची शिक्षा होईल.

टीप : क. ३७०-अ हे विशेष कलम, फौजदारी कायदा (सुधारणा) अथिनियम २०१३ (२०१३ चा १३) अन्वये घालण्यात आले आहे. या कलमामध्य (१) जर अज्ञान व्यक्तीची खरेदी-विक्री होऊन त्या व्यक्तीला लैंगिक शोषणासाठी वापरले जात असेल तर पाच ते सात वर्ष सश्रम कारावास आणि द्रव्यदंड अशी शिक्षा सांगितली आहे, आणि (२) जर एखाद्या व्यक्तीची खरेदी-विक्री होऊन तीन व्यक्ती लैगिक शोषणासाठी वापरले जात असेल तर तीन ते पाच वर्ष सश्रम कारावास आणि द्रव्यदड अशी शिक्षा सांगितली आहे. हा अपराध दखलपात्र, बिनाजामीनाचा असून खटला सेशन्स कोर्टात चालेल.

#tags: 370 कलम म्हणजे काय?, 370 Kalam In Marathi, 370 IPC In Marathi.