363 IPC In Marathi 363 – 363 Kalam In Marathi : नमस्कार मित्रांनो, 363 कलम म्हणजे काय? या बद्द्ल संपूर्ण माहिती सांगणार आहे म्हणून पोस्ट पूर्ण वाचा जेणेकरून तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती मिळेल आणि पोस्ट आवडल्यावर तुमच्या मित्रांना शेयर करायला विसरु नका धन्यवाद..

363 IPC In Marathi 363 कलम म्हणजे काय?
(363 IPC In Marathi 363 कलम म्हणजे काय?)

363 IPC In Marathi 363 कलम म्हणजे काय? | 363 Kalam In Marathi

३६३. अपनयनाबद्दल [KIDNAPPING] शिक्षा.

जो कोणी कोणणत्याही व्यक्तीचे (भारतातून) किंवा कायदेशीर पालकाच्या ताब्यातून अपनयन करील त्याला, सात वर्षेपर्यन्त असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.

टीप १: कलम ३६० व ३६१ मध्ये अपनयनाचे दोन प्रकार सांगितले आहेत. भारतामधून आणि कायदेशीर रखवालीमधून अपनयन करणे या दोन्हींना शिक्षा देणारे हे कलम ३६३ आहे.

टीप २ : वन्य जमाती चालीरीती : एका सतरा वर्षीय विवाहित मुलीस ती जंगलात गेली असताना जबरदस्तीने आरोपी आणि इतर साथीदारांनी पळवून नेले. कारण त्यांचे वन्य जमातीप्रमाणे लग्न लावले होते, तर ती पद्धत विवाहापूर्वी विचारात घेता येते. त्यामुळे येथे अपराध घडला. पाहा – “दुत्ता ्रधान १९८५ Cr. L.J. १८४२Orissa तसेच “तानूलाल वि. उत्तर प्रदेश १९८१ S.C.C, ६७५.

टीप ३: कार्यपन्धती : अपराध दखलपात्र- जामीनपात्र- प्रथमवर्ग न्यायाधीशापढ़े चालणारा आहे. आपसात मिटविता येणार नाही, कारण तसे क्रि.प्रो. कोड कलम ३२० (१) (२) मध्ये दर्शविलेले नाही. नयनाबद्दल शिक्षा (क. ३६३) याबद्दल सर्वच्व न्यायालयाचा निवाड़ा : (१) श्रीधर पांड्रंग हेगडे वि. कनटिक राज्य २००४ CL.J. ४६७७ (SC) या केिसमध्ये आरोपीनी अपनयन केलेल्या एका अपनयन केलेल्या एका शाळकरी मुलाच्या सुटकेसाठी त्याच्या वडिलांकडे तीन लाख रुपयांची मागणी केली. खालच्या कोटनि फिर्यादी पक्षाच्या पुराव्यातील क्षुल्लक त्रुटींचा विचार करून आरोपींची सुटका केली. मात्र उच्च न्यायालयाने त्यांना क. ३६३ खाली दोषी ठरवून शिक्षा ठोठावली. सर्वोच्च न्यायालयाने साक्षीदारांचा व बळकटी आणणाच्या, पुराव्याचा विचार करून उच्च न्यायालयाने दिलेली शिक्षा कायम केली. (२) ए. एन. व्यंकटेश वि. कनाटक राज्य २००५ CrL.J. ३७३२ (SC) या केसमध्ये मुलगा हरवल्यांचा FIR नंतर बदलून आरोपीनी जबर खंडणीची मागणी केली आहे, आसा आरोप करण्यात आला, आरोपीना पेशांची देवाणधेवाण झाल्यानंतर जागेवरच पकडण्यात आले. त्याच ठिकाणाहून मुलाचा मृतदह उकरून काढण्यात आला. काही प्रत्यक्ष साक्षीदारांनी मुलाला आरोपीबरोबर रखेळत असताना पाहिल्याचे सांगितले. मुलाचे प्रेत दोन दिवस जमिनीखाली पुरलेले असल्यामुळे बरेचसे कुजले होते. सर्वोंच्च न्यायालयाने अभिनिर्धारीत केले की, परिस्थितिजन्य प्राव्याच्या आधारे क. ३६३ खाला आरोपींना दोषी धरून देण्यात आलेली शिक्षा कायम करण्यात येत आहे.

३६३-अ. भीक मागण्यासाठी अज्ञान व्यक्तीचे अपनयन करणे किंवा तिला विकलांग करणे.

(१) कोणत्याही अज्ञान व्यक्तीस भीक मागण्याच्या कामी नेमता यावे किवा त्यासाठी तिचा वापर करता यावा याकरिता जो कोणी अशा अज्ञान व्यक्तीचे अपनयन करील किवा आपण अज्ञान व्यक्तीचा कायदेशीर पालक नसताना त्या अज्ञान व्यक्तीची अभिरक्षा मिळवील तो, दहा वर्षेपर्यन्त अस् शवकेल इतक्या मुद्तीच्या कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असेल व तो द्रव्यदंडासही
पात्र होईल.

(२) कोणत्याही अज्ञान व्यक्तीस भीक मागण्याच्या कार्मी नेमता यावे किंव त्यासाठी तिचा वापर करता यावा याकरिता जो कोणी अशा अज्ञन व्यक्तीला विकलांग (MAIMING) करील तो आजीव कारावासाच्या शिक्षेस पात्र असेल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल,.

(३) आपण एखाद्या अज्ञान व्यक्तीचा कायदेशीर पालक नसताना जर कोणी भीक मागण्याच्या कामी अशी अज्ञान व्यक्तीची नेमणुूक केली किंवा त्यासाठी तिचा वापर केला तर त्या बाबतीत, विरुद्ध शाबीत न झाल्यास, ्या अज्ञान व्यक्तीला भीक मागण्यासाठी नेमता यावे किंवा त्यासाठी तिचा वापर करता यावा याकरिता त्याने अज्ञान व्यक्तीचे अपनयन केले किंवा अन्यथा तिची अभिरक्षा मिळवली असे गृहीत
धरण्यात येईल.

(४) या कलमात-
(अ) “भीक मागणे’ याचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे : (एक) गाण्याचा, नाच करण्याचा, भविष्य सांगण्याचा, करामती करून दाखवण्याचा किवा वस्तूची विक्री करण्याचा किवा अन्य प्रकारचा बाहणा करून सार्वजनिक ठिकाणी भिकेची याचना करणे किंवा ती स्वीकारणे;
(दोन) भिकेची याचना करण्यासाठी किंवा भीक स्वीकारण्यासाठी कोणत्याही खासगी परिवास्तूमध्ये [Premises] प्रवेश करणे;
(तीन) भीक मिळवर्याच्या किंवा उकळण्याच्या उद्देशाने, स्वतनचे किंवा सन्य कोणत्याही व्यक्तीचे किंवा एखाद्या प्राण्याचे कोणतेही क्षत जखम, इजा, विद्रूपता किवा रोग उघडा करणे किंवा त्याचे प्रदर्शन करणे; (चार) भिकेची याचना करणे किंवा भीक मिळवणे यासाठी प्रदर्शनीय वस्तू म्हणून अज्ञान व्यक्तीचा वापर करणे. (ब) अज्ञान व्यक्ती याचा अर्थ पूढीलप्रमाणे (एक) पुरुषाचे बाबतीत सोळा वर्ष वयाखालील व्यक्ती; आणि सन १९६० पासून अमलात आले आहे. त्याचा उद्देश अल्पवरयीन मुलांना पळकून (दोन) ख्रीचे बाबतीत, अठरा वर्ष वयाखालील व्यक्ती, टीप १ : हे नवीन कलम कायदा नंबर ५२ सन १९५९ अन्वये १५ जानेवारी त्यांचा ताबा मिळविणे आणि त्यांना भीक मागण्यास लावणे याला प्रतिबंध करणे हा आहे. याचव कलमात कडक शिक्षा दिली आहे.

या कलमाचे चार भाग आहेत : पहिल्या भागात अज्ञान व्यक्तीचे अपनयन करणे आणि ताबा मिळविणे, उद्वेश भीक मागावयास लावणे. शिक्षा दहा वर्षेपावेतो. दसच्या भागात अशा अज्ञान व्यक्तीला जखमी करणे, विकलांग करणे. शिक्षा आजीव कारावास. तिस्या भागात आरोपीविरुद्ध अपराध केल्याचे अनुमान काढता येते. चौथ्या भागात भीक मागणे म्हणजे काय ? याचा सविस्तर खुलासा केला आहे.
तसेच अज्ञान म्हणजे वयोमर्यादा दिली आहे.

कार्यपद्धती : अपराध दखलपात्र- बिगर जामिनाचा- आणि जर ३६३ अ (१) चा अपराध असेल तर प्रथम वर्ग न्यायाधीशाप्ढे चालणारा आणि ३६३ अ (२) जखमी करणे असेल तर सेशन्स कोर्टात चालणारा आहे. अपराध गंभीर असल्याने कड़क शिक्षा दहा वर्षे पावेतो आणि आजन्म कारावास आणि द्रव्यदंडाची शिक्षा दिली आहे. आपसात मिटविता येणारा नाही. क्रि.प्रो. कोड कलम ३२० (१) (२) मध्ये तशी तरतूदच नाही.

tags: 363 IPC In Marathi, 363 कलम म्हणजे काय, 363 Kalam In Marathi.