कलम 338 माहिती मराठी Section 338 IPC In Marathi – Kalam 338 In Marathi : नमस्कार मित्रांनो, 338 कलम म्हणजे काय? या बद्द्ल संपूर्ण माहिती सांगणार आहे म्हणून पोस्ट पूर्ण वाचा जेणेकरून तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती मिळेल आणि पोस्ट आवडल्यावर तुमच्या मित्रांना शेयर करायला विसरु नका धन्यवाद..

कलम 338 माहिती मराठी 338 IPC In Marathi
(कलम 338 माहिती मराठी 338 IPC In Marathi)

कलम 338 माहिती मराठी 338 IPC In Marathi | Kalam 338 In Marathi

३३८. इतरांचे जीवित किंवा व्यक्तिगत सूरक्षितता धोक्यात आणणाया कृतीने जबर दुखापत पोचवणे.

जो कोणी मानवी जीवित किंवा इतरांची व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात येईल इतक्या बेदरकारपरणे किंवा हयगयीने एखादी कृती करून कोणत्याही व्यक्तीस जबर दुखापत पोचवील त्याला, दोन वर्षेपर्यन्त असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा एक हजार रुपयांपर्यन्त असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.

टीप १ : या कलमाप्रमाणे प्रत्यक्षात मोठी गंभीर दुखापत कलम ३२० मधील १ ते ८ प्रकारात पडणारी होते. बाकी इतर घटक बेदरकारपणा हयगयीपणा वगैरे आधीच्या कलम ३३६- ३३७ प्रमाण्णेच आहेत. जर प्रत्यक्षात मृत्यू घडला तर कलम.

टीप २ : काही न्यायनिवाडे : १) अल्पवयीन पत्नीशी संभोग : एका ११ वर्षच्या पत्नीशी नवऱ्याने संभोग क्रिया केली. त्यात ती जखमी होऊन मरण पावली. वैवाहिक हक्क जरी नवऱ्यास असला तरी बेदरकारपणा होय, पत्नीची सुरक्षितता जपणे आवश्यक आहे. त्यामुळे या
कलमाखाली दोषी, मृत्यू येईल अशी अपेक्षा नक्हती.,. पाहा “दुरी मोहुन मायथी’ (१८९०) १८ Cal. ४९ तसेच कलम ३७५ (६ ) व्याख्येनुसार बलात्काराचा पण अपराध आहे. २) बैलगाड़ी सोडून दिली : या घटनेत रस्त्यावर बैलगाडी स्वतः न हाकता तशीच सोडून दिली तर रस्त्यावर झोपलेल्या मुलाचे अंगावरून गेली तर कलम ३३८ प्रमाणे अपराध आहे. पाहा ‘मलकाजी Unrep. Cr C, १९८.

टीप ३ : कार्यपद्धती : दखलपात्र- जामिनाचा- प्रथमवर्ग न्यायाधीशापुढे चालणारा. क्रि.प्रो.कोड कलम ३ २० (२) कोर्टाचि संमतीने मिटविता येतो.

#TAGS: kalam 338 in marathi, section 338 ipc in marathi, ipc कलम 338 माहिती मराठी, कलम 338 माहिती मराठी.