Section 328 IPC In Marathi – 328 Kalam In Marathi कलम 328 माहिती मराठी : नमस्कार मित्रांनो, 328 कलम म्हणजे काय? या बद्द्ल संपूर्ण माहिती सांगणार आहे म्हणून पोस्ट पूर्ण वाचा जेणेकरून तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती मिळेल आणि पोस्ट आवडल्यावर तुमच्या मित्रांना शेयर करायला विसरु नका धन्यवाद..

कलम 328 माहिती मराठी 328 IPC In Marathi
(कलम 328 माहिती मराठी 328 IPC In Marathi)

कलम 328 माहिती मराठी 328 IPC In Marathi | 328 Kalam In Marathi

३२८. अपराध करण्याच्या उद्देशाने विष, इत्यादींच्या साहाय्याने दुखापत पोचवणे.

अपराध करण्याच्या उद्देशाने किंवा अपराध करणे सुकर व्हावे या उद्देशाने किवा आपण त्यामुळे दुखापतस कारण होण्याची शक्यता आहे याची जाणीव असताना जो कोणी एखाद्या व्यक्तीला कोणतेही विष किंवा कोणतेही मूच्छाकारक, नशाकारक किवा अपथ्यकारक औषधिद्रव्ये किंवा अन्य पदार्थ सेवन करण्यास देईल किंवा सेवन करवील त्याला, दहा वर्षपर्यन्त असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल, व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.

टीप १: हा एक गंभीर अपराध आहे. कारण आरोपी विष, मूच्छा आणणारे, नशाकारक, अपथ्यकारक औषध [Unwholesome Drug| फि्यादीला पाजतो अगर पाजवितो. आणि त्यामागे खास तीन उद्देश असतात. १) अपराध करणे, २) अपराध करणे सोपे जावे, ३) दुखापत कराणे.

टीप २ : या कलमाप्रमाणे प्रत्यक्ष दुखापत होण्याची आवश्यकता नाहीं, कलम ३२४ मध्ये तशी गरज असते.

टीप ३: काही औषधी द्रव्यं इतर पदा्थात मिसळून ते मार्केटमध्ये विकणे आणि गिच्हाईकांना गंभीर दुखापती घडविणे, दृष्टी घालविणे वगैरे अपराध आहे. पाहा – एम. पी. ऑगस्टीन वि केरळ राज्य” १९९१C. L.J. NOC. २५.

काही न्यायनिवाडे : या कलमातील घटक उद्देश समजण्याकरता पुढील न्यायनिवाडे मार्गदर्शक ठरावेत :
१) पानांचा चीक देणे : एका घटनेत खेडूतांना पानांचा चीक देण्यात आला. त्याचा परिणाम काही जणांना विषबाधा झाली आणि तशी लक्षणे दिसू लागली, तर या “दासी पिटचीगडू (१८८३) ? Weir २) धतुरा विष दिले : या घटनेत एका बाईला आरोपीने धतुरा विष दिले. ती बेशुद्ध झाली. मग तिचे दागदागिने काढून घेतले. पाहा -“नानजुनदप्पा Weir 3 rd कलमाखाली अपराध घडला. पाहा – ३३५. [वायर यांँचे गुन्हे आणि फोजदारी अपराध पुस्तक) Edn. 9. ३) बायकोने नवच्यास विष दिले : या घटनेत बायकोने नव्यास अॅकनाईट विष अत्रामधून दिले. पण तिला विषाच्या गुणधमांची माहिती नक्हती. नवरा मेला, तर या कलमाखाली अपराध घडला. पाहा – “हेनुमका (१९४३) MAD. ६७९. ४) शेराचा चीक ताडीत मिसळला : ताडी चोरीस जाते हे शोधून काढण्याकरता मालकाने ताडीचे मडक्यात शेराचा चिक मिसळला. नंतर पूढ़े तीच ताडी लष्करी जवानांनी विकत घेतली. तर या कलमाप्रमाणे मूळ मालकास शिक्षा झाली.

टीप ४: कार्यपद्धती : अपराध दखलपात्र- बिगर जामिनाचा, सेशन कमिट आहे. गंभीर गुन्हा आहे. बच्याच घटना या कलमाखाली येतात.

#TAGS: कलम 328 माहिती मराठी, 328 IPC In Marathi, 328 Kalam In Marathi.