Section 279 IPC In Marathi – 279 Kalam In Marathi कलम 279 माहिती मराठी : नमस्कार मित्रांनो, 279 कलम म्हणजे काय? या बद्द्ल संपूर्ण माहिती सांगणार आहे म्हणून पोस्ट पूर्ण वाचा जेणेकरून तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती मिळेल आणि पोस्ट आवडल्यावर तुमच्या मित्रांना शेयर करायला विसरु नका धन्यवाद..

कलम 279 माहिती मराठी Section 279 IPC In Marathi
(कलम 279 माहिती मराठी Section 279 IPC In Marathi)

कलम 279 माहिती मराठी Section 279 IPC In Marathi | 279 Kalam In Marathi

२७९. सार्वजनिक रस्त्यावर बेदरकारपणे वाहन हाकणे किंवा सवारी करणे.

ज्यामुळे मानवी जीवित धोक्यात येईल, अगर अन्य व्यक्तीला दुखापत, अगर नुकसान पोचिण्याचा संभव आहे इतक्या बेदरकारपणे, किंवा हयगयीने जो कोणी कोणत्याही सार्वजनिक रस्त्यावरून एखादे वाहन हाकील, किंवा सवारी (RIDES) करील त्याला, सहा महिन्यांपर्यंत इतक्या मुदतीचा कोणत्याही एका प्रकारचा कारावास, किवा एक हजार रुपयांपर्यंत द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.

टीप १ : या कलमाचे महत्त्वाचे घटक :
१. आरोपी कोणतेही वाहन हाकतो, अगर सवारी करतो.
२. अशी कृती सार्वजनिक रस्त्यावर करतो.
३. कृती बेदरकारपणाची- हयगयीची असते. त्यामुळे मानवी जीवितास धोका असतो.
४. अगर दुखापत, अगर न्कसान होण्याचा संभव असतो.

टीप २ : या कलमाप्रमाणे प्रत्यक्ष दुखापत होत नाही तर केवळ तसा संभव अगर शक्यता असते, जर साधी दुखापत झाली तर मग कलम ३३७, मठी दुखापत झाली तर कलम ३३८, आणि मृत्यू घडला तर कलम ३०४-अ लागते.

टीप ३ : या कलमात अनेक प्रकारच्या कृती- विशेषतः मोटार अपघात अगर घोडयावर-इतर प्राण्यांवर स्वार होऊन बेदरकारपणे हयगयीने सवार होऊन हाकणे वगैरे कृती येतात.

टीप ४ : बेदरकारपणा अगर हयगयीने हा महत्त्वाचा घटक आहे. बिदरकारपणा म्हणजे अतिशय घाईचे कृत्य, त्यात उद्ेश नसतो; योग्य ती काळजी अवधान न ठेवता केलेले कृत्य होय, तर हयगयीपणात परिणामांची पर्वा न करता धोका पत्करला जातो. पाहा ‘प्यारेजान’ १९७२ ०LJ. ४০४ ysore बेदरकारपणा अगर हयगयीने ही कृती या कलमाशिवाय आणि इतर कलमांत पण २८०, २८३ ते २८९, ३०४-अ, ३३६ ते ३३८ मध्ये सांगितलेली आहे.

टीप ५ : मानवी जीविताला धोका याचा अर्थ होण्याची शक्यता-संभव असा आहे. प्रत्यक्षात दुखापत होण्याची आवश्यकता नाही. सार्वजनिक रस्त्यावर माणसे त्या क्षणी असण्याचीदेखील आवश्यकता नाही, तर कदाचित त्या रस्त्यावर माणसे येण्याची शक्यता पुरेशी आहे. पाहा होरमुसजी नौरोजी लॉर्ड’ १९. Bom ७१५ “बाळू २३ Bom. L. R. 24c.

टीप ६ : ड्रायक्हरने आपली गाडी दुसच्या इसमास हाकण्यास दिली. त्याला ड्रायव्हिग येत नव्हते-शिकला नव्हता. ड्रायव्हर बाजूस होता, तेव्हा जर अपघात झाला तर मूळ ड्रायक्हरदेखील प्रोत्साहन दिले म्हणून चिथावणीच्या आपराधास जबाबदार आहे. ‘सी.पी. अँंड बेरार सरकार वि. सैदू’ (१९४७) Nag. १४४, तसेच मोटार लॉरो ड्राय्हरने लहान मुलास स्टिअरिंग व्हील दिले, त्यामुळे अपघात होऊन आतील लोकाना दुखापती झाल्या, तर ड्रायक्हरने कलम ११४ (चिथावणी देताना हजर असणे) २७९, ३३८ चा अपराध केला, असे कोटनि म्हटले आहे. पाहा : ‘मेहंगा’ (१९४९) 3 Punj. R44.

टीप ७: दिवाणी आण फोजदारी कारवाई : यात फरक आहे. दुखापत, नुकसान झाले तरच दिवाणी को्टात दावा चालतो; तसेच तो दावा ड्रायव्हर अगर गाडीचा मालक अगर दोघांवरदेखील करता येतो. फौजदारी कारवाईत फक्त अपघात करणारा ड्रायव्हरच जबाबदार असतो. पाहा : ‘लॅंबी मोर वि. पी. डी. राय’ (१८७०) १४ W.R. ३२[विकली रिपोटेर १८६२- १८७५ कलकत्ता

टीप ८ : हँडब्रेक्स स्पीडो मीटर योग्य ते काम देत नसताना गाड़ी हाकणे दोषास्पद आहे. पाहा अमरलाल वि. राजस्थान सरकार १९८८ Cr. L.J. Raj. केसमध्ये एका तरुण इंजिनिअरचा मृत्यू वरील कारणाने झाला, म्हणून शिक्षा एक वर्षाची आणि पाचशे रुपये देंड अपिलात कायम करण्यात आला होता.

टीप ९ : हयगयीपणात जखमी इसमाचा सहभाग {CONTRIBUTORY NEGLIGENCE] है तत्त्व फोजदारी अपघातात चालत नाही. फिर्यादी पक्षाचा जरी काही अंशी दोष असला, तरी ड्रायक्हरची जबाबदारी सुटत नाही, तो गुन्हेगार असतो. कारण ड्रायक्हरला त्याची जाणीव ठेवावी लागते. पाहा “फागू मोहराणा’ A.IR. १९६१? Orissa ७ १ आणि तसेच ‘प्यारेजान १९७२ Cr. L.J, ४०४, Mysoe; तसेच
‘पद्माचरण नाईक १९८२GrL.J. Noc १९२, Orissa.

टीप १० : निष्काळजीपणा नाही- आरोपी दोषी नाही. पुढ्ठील घटनांमध्ये आरोपीस निर्दोष करण्यात आले आहे. १. एक टूरक्टर ड्रायव्हर ताशी ६ मैल वेगाने ट्रॅक्टर हाकत होता. वर बसलेला एक इसम निष्काळजीपणाने बसला होता. रस्त्यावरील खड्डे, धक्के याची त्याला कल्पना नक्हती, त्यामुळे खाली पडून मेला, तर ड्रायव्हर दोषी नाही. ‘पेनू १९८० Cr. L.J. Noc 3R, Orissa. २. अपघात घडल्यानंतर ड्रायक्हर पळून गेला म्हणून तो बेदरकार होता असे म्हणता येत नाही. पाहा पद्य चरण नाईक १९८२ C. L.J. Noc १९२, 0rissa. ३. गाडी जोरात, वेगाने चालविणे, हॉने न देणे म्हणजे निष्काळजीपणा जागा-वेळ-ट्रफिक या गोष्टी बेदरकारपणा हयगयीपणा ठरविण्याकरिता महत्त्वाच्या असतात. नसतो. I . |S|44 236 Cr. L.J. 422, Kerala. ४. दुचाकी वाहनावर केवळ दोनपेक्षा जास्त इसम बसतात म्हणजे आय.पी.सी. कलम २७९ चा अपराध होत नाही. फार तर ड़रायव्हर जबाबदार होईल; परंतु मागील सीटवर बसलेले इसम जबाबदार होत नाहीत, त्यामुळेच पोलिसांनी सर्वाना पकडणे योग्य नाही. ‘प्रभुदास १९८६ Cr. L.J. ३९०, Gujarat. ५. एका ट्रकने सायकलवाल्यास आण्ि बैलगाडीवाल्यास धक्का दिल्याने दोघांना दुखापती झाल्या; परंतु प्रत्यक्षात टक्कर कर्शी झाली याचा पुरावा को्टापुढे नव्हता. चिडलेल्या जमावाने नंतर ट्रक पेटवून दिला, त्यामुळे ट्रकच्या यांत्रिक दोषांचाही पुरावा मिळाला नाही. त्यामुनळे केवळ दो्घांना दुखापती झाल्या म्हणून ड्रायक्हर बेदरकार अगर निष्काळजीपणे ट्रक चालवत होता असे म्हणता येत नाही, त्यामुळे ड्ायक्हरची शिक्षा रद्द करून अपिलात त्याला दोषमुक्त करण्यात आले, पाहा”बिजुली स्वेन’ Cr. L.J. 4c3, Orissa. पाहा वरील निर्णयावरून दिसून येईल की, बेदरकारपणा अगर निष्काळजीपणा महत्त्वाचा घटक आहे. अनेक परिस्थितीवरून ते ठरविता येते.

टीप ११: कार्यवाही : अपराध दखलपात्र- जामिनाचा-प्रथम वर्ग न्यायाधीशांपतहे चालणारा-बिगर समजु्तीचा आहे. सार्वजनिक रस्त्यावर बेदरकारपणे वाहन हाकणे (क. २७९) यावरील सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा : आरोपी बस चालवीत असताना समोरून टेंपो आाला. दोन्हीही वाहने एकमेकांना घासून गेली, त्यामुळे आत बसलेल्या एका १६ वर्ष मुलाचा मृत्यू झाला, आणि इतर उतारूना जबर जखमा झाल्या. बस ड्ायव्हर आरोपी बेदरकार व निष्काळजीपणामुळे दोर्षी ठरला गेला. उच्च न्यायालयाने क. ७१ खाली रु. १०००/- दंडाची आणि क. ३०४-अ (निष्काळजीपणे मृत्यू घडविणे) खाली रु. ५०० दंडाची शिक्षा फर्मावली. त्याला तुरुंगवासाची शिक्षा दिली नाही. उच्च न्यायालयाच्या शिक्षेवर भाष्य करताना सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेचा सामाजिक परिणाम विचारात न घेता शिक्षा करणे निरर्थक आहे’ अशी टिप्पणी केली. उच्च न्यायालयाने कारण न देता तुरुंगवासाची शिक्षा देणे टाळले आणि फक्त दंडाची शिक्षा दिली, हे समजण्या पलीकडचे आहे, असे स्पष्ट करून ट्रायल कोटनि दिलेली ६ महिने कारावास व रु. ५००० दंड ही शिक्षा सर्वॉच्च न्यायालयाने कायम केली. (पाहा : कर्नाटक राज्य वि. मुरलीधर AIR २००९ SC १६२१) (२) ब्राह्य दास वि. हरियाना राज्य (२० ०९) ७ SC ३५३ या केसमध्ये सार्वजनिक रस्त्यांवरून आतिवेगाने कार किंवा दुचाकी चालविणे याबाबत सिद्ध करावयाची तथ्ये सांगितली आहेत, आरोपी व्यक्ती कोणत्याही सार्वजनिक रस्त्यावरून कोणतेही वाहन अशा रीतीने चालवीत होती की, त्यामुळे मानवी जीविताला ते धोकादायक ठरणार होते किंवा ऊजा पोहोचविण्याची शक्यता होती. ही बाब सिद्ध करावयाची असते.

#TAGS: कलम 279 माहिती मराठी, Section 279 IPC In Marathi, 279 Kalam In Marathi.