188 IPC In Marathi 188 कलम म्हणजे काय मराठीकलम 188 माहिती मराठी : नमस्कार मित्रांनो, 188 कलम म्हणजे काय? या बद्द्ल संपूर्ण माहिती सांगणार आहे म्हणून पोस्ट पूर्ण वाचा जेणेकरून तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती मिळेल आणि पोस्ट आवडल्यावर तुमच्या मित्रांना शेयर करायला विसरु नका धन्यवाद..

188 IPC In Marathi 188 कलम म्हणजे काय मराठी
(188 IPC In Marathi)

188 IPC In Marathi 188 कलम म्हणजे काय मराठी

१८८. लोकसेवकाने रीतसर जारी केलेल्या आदेशाची अवज्ञा.

एखादा आदेश जारी करण्यास कायदेशीर अधिकार असलेल्या लोकसेवकाने आदेश जारी केलेला आहे आणि त्याप्रमाणे विशिष्ट्र कृती करण्यापासून परावृत्त राहण्याचा; तसेच स्वतःच्या कब्जातील अगर व्यवस्थापनाखालील विशिष्ट मालमत्तेबद्दल विशिष्ट बंदोबस्त करण्याचा आदेश मिळाला आहे हे माहीत असून, जो कोणी अशा आदेशाची DIRECTION] अवज्ञा करील त्याला- कायदेशीपणे नेमलेल्या एखाद्या व्यक्तीला अशा अवज्ञमुळे (DIS- OBEDIENCE] अटकाव, त्रास किवा नुकसान झाले, अगर त्याचा धोका उत्पन्न झाला, अगर तसे होण्याचा रोख असेल तर एका महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या साध्या कारावासाची शिक्षा, किंवा दोनशे रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची किवा दोन्ही शिक्षा होतील; आणि जर अशा अवज्ञेमुळे मानवी, जीवित, आरोग्य, किंवा सुरक्षितता यांना धोका पोचला किंवा पोचण्याकडे रोख असेल तर, सहा महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या कोणत्याही प्रकारचा कारावास किवा एक हजार रुपयापर्यंत असू श्कल इतक्या द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.

स्पष्टीकरण : अपाय घडवून आणणे अपराध्यास उद्देशित असले पाहिजे, किंवा अपाय घडणे संभवनीय आहे, याची त्याला पूर्वकल्पना असली पाहिजे अशी आवश्यकता नाही, तो ज्याची अवज्ञा करतो त्या आदेशाची त्याला माहिती होती आणि त्याच्या अवज्ञमुळे अपाय घडला किंवा घडणे संभवनीय आहे इतके पुरेसे आहे.

उदाहरण: एका विशिष्ट्र रस्त्यावरून धारमिक मिरवणूक जाता कामा नये, असा आदेश जारी करण्याचा कायदेशीर अधिकार असलेल्या लोकसेवकाने असा आदेश जारी केला आहे. “अ’ जाणीवपूर्वक त्या आदेशाची अवज्ञा करता आणि त्यामुळे देग्याचा धोका उत्पन्न होतो. ‘अ’ याने या कलमात व्याख्या केलेला अपराध केला आहे.

टीप १ : लोकसेवक विविध कारणांकरिता आदेश जारी करत असतात आणि त्या आदेशाची जनतेने अंमलबजाव्णी करावी, अशी कायद्यांची अपक्षा असते; परंत त्याची अवज्ञा जर कोणी केली तर तो अपराध आहे.

टीप २: या कलमाचे दोन भाग आहेत. पहिल्या भागात सर्वसाधारण आदेश असतात आणि ते काही कृती करण्यापासून परावृत्त राहावे आणि एखाद्या व्यक्तीच्या त्याला कर्मी शिक्षा एक महिना अगर दंड दोनशे रुपये अशी शिक्षा आहे तर दुस्या सहा महिने अगर दंड एक हजार पर्यत आहे. চब्जात असलेल्या मालमत्तेबद्दल काळजी घेण, बंदोबस्त करणे याकरता असतात. भागात मानवी जीवित-आरोग्य-सुरक्षितता यांना धोका असतो.

टीप ३: या कलमाचे महत्त्वाचे घटक पुढीलप्रमाणे आहेत : आदेश जारी केला होता
२. तो लोकसेवकाने काढला होता.
३. कायद्याने तसा अधिकार त्याला होता.
४. कृतीपासून पराबृत्त व्हावे- अगर त्याच्या ताब्यातील मिळकतीबाबत बंदोबस्त करावा.
५. आरोपीला वरील आदेश माहीत होता.
६. त्याने त्याची अवज्ञा केली.
७. त्यामुळे अटकाव-त्रास -नुकसान अगर धोका निर्माण झाला, अगर जीवित- आरोग्य- सुरक्षितता यांना धोका झाला.
८. त्यामुळे दंगा अगर मारामारी घडली अगर अवज्ञेचा रोख तसा होता.

टीप ४ : दिनांक १-४-७४ पासून हे कलम दखलपात्र अपराध केला आहे. त्यामुळे पोलिसांना त्वरित दखलपात्र अपराध म्हणून कारवाई करता येते- गुन्हा जामीनपात्र-बिगर समजुतीचा प्रथमवर्ग न्यायाधीशापुढे चालणारा आहे.

टीप ५ : आरोपीला आपल्या बचावात काढलेला आदेश अत्यंत चुकीचा- अयोग्य होता असे दाखविता येईल, पाहा ‘बचूराम’ केस A.1R. १९५६Cal. १०२.

टीप ६ : या कलमाप्रमाणे काढलेला आदेश लोकसेवकांनी लोकहितार्थ काढलेला पाहिजे. दिवाणी को्टनि दोन पक्षकारांमध्ये-वादी-प्रतिवादी मध्ये काढलेला आदेश या कलमात बसत नाही. पाहा “मलप्पा’ केस (१९१५) १७ B.L.R. ६७६.

टीप ७ : संचारबंदी (कफ्य ऑर्डर), गोळी घालून ठार मारणे- संचारबंदीचे आदेश क्र. प्रो. कोड कलम १४४ प्रमाणे काढले जातात आणि ्याला कलम १८८ प्रमाणे शिक्षा दिली जाते. तिचे स्वरूप किरकोळ असते. त्यामुळे अंमलबजावणीच्या सूचना गोळी घालून ठार मारा’ |SHOOTTOKILL] संचारबंदीकरिता भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद २० (१) आणि २१ यांच्या विरोधात बेकायदेशीर [ULTRAVIRES] आहेत असा स्पष्ट निर्णय ‘जयंतीलाल’ केसमध्ये १९७५ Cr LJ. ६६१ (Gujarat) गुजरात हायकोर्टाने दिला आहे.

#tags: 188 IPC In Marathi, 188 कलम म्हणजे काय मराठ