Section 153A IPC In Marathi 153 अ कलम म्हणजे काय? – IPC 153b In Marathi कलम 153 ब : नमस्कार मित्रांनो, कलम 153, कलम 153अ व कलम 153 ब म्हणजे काय? या बद्द्ल संपूर्ण माहिती सांगणार आहे म्हणून पोस्ट पूर्ण वाचा जेणेकरून तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती मिळेल आणि पोस्ट आवडल्यावर तुमच्या मित्रांना शेयर करायला विसरु नका धन्यवाद..

153A IPC In Marathi, IPC 153b In Marathi
(153A IPC In Marathi, IPC 153b In Marathi)

153 IPC In Marathi कलम 153 माहिती

१५३. दंगा घडवून आणण्याकरिता बेछूटपणे चिथावणी देणे (दंगा घडून आल्यास, किंवा दंगा घडून न आल्यास).

एखादी बेकायदेशीर कृती करून जो कोणी एखाद्या व्यक्तीला बेछूटपणे- बेदरकारपणे [Malignantly or Wantonly] चिथावणी देईल आणि अशा चिथावणीमळे दंग्याचा अपराध घडावा असा त्याचा उद्देश असेल किंवा तसे घडणे संभवनीय आहे याची जाणीव असेल तेव्हा अशा चिथावणीमुळे जर दंगा घडला, तर एक वर्षपर्यत असू शकेल इतक्यां कोणत्याही मुदतीचा कारावास किंवा द्रव्यदंड, किंवा दोन्ही शिक्षा होतील आणि जर दंग्याचा अपराध घडला नाही, तर त्याला सहा महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या कोणत्याही मुदतीचा कारावास किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिाक्षा होतील.

टीप १: दंगा घडवून आणण्याकरिता जेव्हा काही व्यक्ती बेछूटपणे-बेदरकारपणे- होणाच्या परिणामांची पर्वा न करता इतरांना चिथावर्णी देतात अशाविरुद्ध दंग्याचे कारण निर्मण करणाच्यांना या कलमाप्रमाणे शिक्षा देतात. राष्टरीय ध्वज फडकविल्यानंतर तो उतरबून पायदळी तुडविण्याचा प्रयत्न केला, तर हा आपराध होतो. पाहा : ‘इंद्रसिंग A. I.R. 3ER M.P. R3R.

टीप २ : या कलमाचे वैशिष्टय दंगा घडो अगर न घडो गुन्हा आहेच. फक्त शिक्षेत फरक आहे. केलेले कृत्य बेकायदेशीर म्हणजे आय. पी. सी. कलम ४३ प्रमाणे कोणत्याही प्रकारचे असेल; तसेच कलम ३२-३३ प्रमाणे कृती म्हणजे अकृतीदेखील [OMISSION] त्यात येते.

टीप ३ : या कलमाचे महत्त्वाचे घटक पुढीलप्रमाणे :
१. आरोपीने केलेले कृत्य बेकायदेशीर होते.
२. या कृत्यामुळे आरोपीने इतरांना चिथावणी दिली. त्याने बेदरकारपणे- बेछूटपणे कृत्य केले.
४. त्यामागे उद्देश दंगा घडविणे, अगर दंगा घडण्याचा संभव याची जाणीव होती.

टीप ४ : कार्यपन्धती- गुन्हा दखलपात्र, जामीनपात्र, प्रथमवर्ग न्यायाधीशांपुढे चालणारा अपराध विगर समजुतीचा आहे. दंग्याच्या आरोपपत्रामध्येच दंगा घडविण्यास कारणीभूत म्हणून या कलमाचा वापर करून त्या आरोपीचे नाव व कलम १५३ लावता येते. (पाहा : क्र. प्रो. कोड कलम २२३ (ब) (ड).)


153A IPC In Marathi 153 अ कलम म्हणजे काय?

१५३.अ धर्म, वंश, जन्मस्थान, निवास, भाषा इत्यादी कारणांवरून निरनिराळ्या गटामध्ये शत्रत्व वाढवणे आणि एकोपा टिकण्यास बाधक अशा कृती करणे.

जर कोणी (अ) तोंडी किंवा लेखी शब्दांमार्फत, खुणामार्फत अगर दृश्य देखाव्याद्रवरे अगर इतर अन्य प्रकारे धर्म, वंश, जन्मस्थान, निवास, भाषा, जात किंवा जनसमाज याच्या किवा अन्य कोणत्याही कारणांवरून वरील विविध गटांत तेढ् अथवा शत्रुत्वाच्या, द्वेषाच्या किवा दुष्टाव्याच्या भावना वाढवल्या किंवा तसा प्रयत्न केला तर अथवा (ब) निरनिराळे धार्मिक, बाशिक, भाषिक किंवा प्रादेशिक गट अगर जाती अगर जनसमाज यांच्यामध्ये एकोपा टिकण्यास बाधक अशी ज्यामुळे सार्वजनिक प्रशांतता बिघडते किंवा बिघडणे संभवनीय असते- अशी कोणतीही कृती करतो तर अथवा (क) संयोजन करतों आणि त्यात कसरत, चळवळ, कवायुत अगर अशाच प्रकारे कृती करतो. त्यातील उद्देश या विविध कृतींत भाग घेणाच्यांनी बळाचा वापर करावा, अगर हिसाचार करावा, अगर तसे शिक्षण त्यांना दिले जावे- अगर तशी जाणीव असते आणि असा बळाचा वापर आणि हिंसाचार कोणत्याही धार्मिक, वांशिक, भाषिक किंवा प्रादेशिक गट अगर जात-जनसमाज यांच्याविरुद्ध करण्याचा उद्देश- जाणीव असते आणि अशा कृतींच्या संयोजनामुळे वरील विविध धार्मिक, वांशिक वगैरे गटांच्या सदस्यांमध्ये भीती किंवा घबराट किंवा असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. अगर निर्माण होणे संभवनीय आहे तर- त्याला तीन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या कारावासाची किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील, (२) जो कोणी पोटकलम (१) दर्शविलेला एखादा अपराध एखाद्या उपासनास्थानी अथवा धामिक उपासना किंवा धा्मिक संस्कारविधी करण्यात गुंतलेल्या एखाद्या जमावामध्ये करील त्याला पांच वर्षपर्यंत असू शकेल इतक्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.

टीप १: कलम १५३- अ (१) मध्ये तीन स्वतंत्र अपराध (अ) (ब) (क) घेतलेले आहेत आणि ते कलम नवीन स्वरूपात घातलेले आहे. ही दुरुस्ती सन १९६९ मध्ये क्रिमिनल अन्ड इलेक्शन लॉज (दुरुस्ती) कायदा सन १९६९ (सन १९६९ क्रमांक ३५). च्या कलम २ अन्वये केली आहे; तसेच या कलमामधील पोटकलम (क) पुन्हा सन १९७२ मध्ये क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट (कायदा क्रमांक ३१ सन १९७२ या) कलम २ अन्विये घातले अआहे. पोटकलम (२) मध्यं तेच अपराध उपासनास्थानी केले जातात त्यासाठी कडक शिक्षा आहे.

टीप २ : या तिन्ही अपराधांचा संबंध विविध आठ गटांशी येतो. ते गट म्हणजे १. धर्म, २. वंश, ३. जन्मस्थान, ४. निवास, ५. भाषा, ६. जात, ७. जनसमाज, ८. अन्य कारण.

टीप ३ : पोटकलम (अ) मध्ये वरील विविध गटामध्ये तेढ-शत्रत्वाच्या-द्रेषाच्या भावना पाच प्रकारे फेलावल्यां जातात अगर तसा प्रयत्न केला जातो. हे पाच प्रकार म्हणजे १. तोडी, २. लेखी, ३. खुणा, ४. दृश्य देखावा, ५. अन्य प्रकाराने.

टीप ४: पोटकलम (ब) मध्य वरील विविध आठ गटांमध्ये एकोपा टिकण्यास आणि त्यामुळे सार्वजनिक शांतता बिघडते अगर संभव असतो अशा प्रकारची कृत्ये करणे.

टीप ५ : वेगवेगळया राजकीय पक्षांत जरी द्वेषभावना पसरविण्याचा इरादा असला तरी ती कृती या कलमांप्रमाणे अपराध होत नाही. कारण विशिष्ट आठ प्रकारच्या गटांत असा राजकीय पक्ष बसत नाही. राजकीय पक्षांत भांडवलवादी मजूरवर्ग वेगवेगळया प्रकारची सरकारे यांचा समावेश आहे. पाहा : ‘शिवकुमार’ केस १९७८ CrLJ. ७০१ Al; परंतु जर राजकारणी पक्ष म्हणून वरकरणी दर्शवून जर द्रेषभावना पसरविली तर अपराध या कलमाखाली होतो. ऐतिहासिक सत्य या आवरणाखाली मुसलमान आक्रमक जमात संबोधून लिखाण केले, त्यामुळे हिंदुू-मुसलमान जमातीत द्वेषभावना निर्माण होते असे मतप्रदर्शन सुप्रीम कोर्टानि ‘बाबूराव पटेल’ या केसमध्ये
१९८० CL.J. ५२९ S. C. केले आहे.

टीप ६ : ऐतिहासिक सत्य म्हणून अभ्यासपूर्वक केलेले विवेचन अपराध होत नाही. मुख्यतः: काय सांगितले त्यापेक्षा कोणत्या भाषेत आणि शब्दांत त्याची मांडणी झाली आहे याला महत्त्व आहे. पाहा : केस मेसर्स वर्षा पब्लिकेशन्स प्रायक्हेट लि. वि. महाराष्ट्र राज्य १९८३ Cr.L.J. १४४६ (Bom. ३); तसेच केस ‘नंदकिशोरसिंग fa. faak ST’ 2844 CrLJ. 9g9 (Pat. S. B.)

टीप ७ : एखादा लेख दोषास्पद ठरविण्याकरिता संपूर्णपणे वाचून आणि एकूण परिस्थिती पाहूनच ठरविणे योग्य असते. पाहा : ‘घुलम सरवार’ A.IR. १९६५ at.

टीप ८ : मूलभूत धार्मिक ग्रंथ : यात मांडलेले विचार द्वेषमूलक म्हणता येत नाहीत. कारण प्रत्येक धर्माचे आधारभूत पवित्र ग्रंथ असतात. कुराण ग्रंथात मू्तींचा नायनाट करा- आक्रमक बना या विचाराने केवळ कुराणाच्या प्रती जप्त करता येत नाहीत, व या कलमाखाली अगर आय. पी. सी. कलम २९५-अ प्रमाणे अपराध होत नाही. पाहा : ‘चंदनमल चोप्रा वि. पश्चिम बंगाल सरकार’ १९७८ C.L.J. १८२ cal. ; भारतीय राज्यघटनेप्रमाणे धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे त्या कारणे, अनुच्छेद पंचवीस विचारात घ्यावा लागतो.

टीप ९ : प्रत्यक्षात द्रेषभावना किंवा शत्रुत्व पसरले आहे हे दाखविण्याची गरज नाही. इरादादेखील पाहण्याची आवश्यकता नाही. वापरलेली भाषा महत्त्वाची असते. कारण माणसाला अशा लिखाणाचे परिणाम माहीत असतातच. पाहा : केस ‘गोपाळ’ (१९६९) ७२ B.L.R. ८७१ S. B. (निकाल मुंबईच्या हायकोर्टोच्या स्पेशल बेंचचा आहे.)

टीप १० : कार्यपद्धती : दखलपात्र-बिगर जामिनाचा-प्रथम वर्ग न्यायाधीशापुढ्े चालणारा खटला- बिगर समज्तीचा आहे. या कलमाखाली कोटोला दखल घेण्यापर्वी क्रि. प्रो. कोड कलम १९६ (१) (अ) (ब) प्रमाणे केद्र सरकार अगर राज्य सरकार यांची पूर्वमंजुरी आवश्यक आहे. मंजुरीपूर्वी डि. मॅ., पोलीस इन्स्पेक्टर दर्जाचे वरील अधिकन्यामार्फत प्राथमिक चौकशीचा हकूम क्रि.प्रो. कोड कलम १९६ (३) प्रमाणे देईल.


153AA IPC In Marathi कलम 153 अअ माहिती

१५३.अअ मिरवणुकीत जाणीवपूर्वक शस्त्रे नेणे किंवा सशस्त्र अशी कोणतीही सामूहिक कवायत किंवा सामूहिक प्रशिक्षण संघटित करणे किंवा घेणे किंवा त्यात सहभागी होणे यासाठी शिक्षा.

जो कोणी, फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) याच्या कलम १४४ अ अन्वये काढलेल्या किंवा दिलेल्या कोणत्याही जाहीर नोटिशीचा किंवा आदेशाचा भंग करून कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही मिरवणुकीत जाणीवपूर्वक शख्त् नईल किंवा सशख्र अशी कोणतीही सामूहिक कवायत किंवा सामूहिक प्रशिक्षण संघटित करील किंवा घेईल किंवा त्यात सहभागी होईल त्याला सहा महिन्यांपर्यतची कारावासाची शिक्षा किंवा दोन हजार रुपयांपर्यतचा दंड अशी शिक्षा देण्यात येईल.

स्पष्टीकरण : शस्त्र म्हणजे अपराधासाठी किंवा संरक्षणासाठी तयार करण्यात आलेली किंवा जुळती करून घेतलेली कोणत्याही वर्णनाची वस्तू त्यात दारूगोळ्ा, धारदार शख्, लाठी, दांडे आणि काठया यांचा समावेश होतो.


IPC 153B In Marathi कलम 153 ब माहिती

१५३. ब राष्ट्रीय एकात्मतेला बाधक असे आरोप, निवेदने करणे

(१) तोंडी किंवा लेखी शब्दांमार्फत अथवा खुणांमार्फत अंगर दृश्य देखाव्यामा्फत अथवा अन्य प्रकारे जर कोणी, (अ) एखाद्या वर्गातील व्यक्ती भारतीय संविधानाबाबत खरी श्रद्धा व निष्ठा बाळगू शकत नाहीत, अथवा भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखू शकत नाही. याचे कारण त्या व्यक्ती एखाद्या धार्मिक, वांशिक, भाषिक किवा प्रादेशिक गटाच्या अगर जातीच्या अगर जनसमाजाच्या सदस्य आहेत म्हणून. आणि अशा प्रकारचा आरोप केला किंवा प्रकाशित केला गेला तर,- अथवा (ब) त्या व्यक्ती धार्मिक, वाशिक वगैरे वरील कारणांमुळेच त्यांना भारताचे नागरिक म्हणून त्यांचे हक्क नाकारले जावेत, किंवा त्यापासून त्यांना वंचित करावे, असे आग्रहपूर्वक मांडिले जाते, अगर तसा सल्ला दिला जातो, उपदेश केला जातो, प्रचार केला जातो, किंवा तसे प्रकाशित केले जाते तर- अथवा (क) वरील धार्मिक, वांशिक वगैरे कारणांमुळेच त्या व्यक्तीवर काही बंधने आहेत- असे आग्रहाने मांडले जाते, सल्ला दिला जातो, युक्तिवाद अगर आवाहन केले जाते , किंवा प्रकाशित केले जाते. त्याचा परिणाम त्या विविध गटांतील सदस्य व इतर व्यक्ती यांच्या दरम्यान तेढ अगर शत्रुत्ताच्या किवा द्वेषाच्या अगर दुष्टाव्याच्या भावना निर्माण झाल्या किंवा निर्माण होणे संभवनीय असले तर, त्याला तीन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या कोणत्याही कारावासाची किंवा द्रव्यदंडाची किवा दोन्ही शिक्षा होतील.

(२) जो कोणी वरील पोटकलम (१ ) मध्ये दर्शविल्या गेलेल्यापैकी कोणताही अपराध कोणत्याही उपासनास्थानी अथवा धार्मिक उपासना किंवा धार्मिक संस्कारविधी करण्यात गुंतलेल्या एखाद्या जमावामध्ये करील त्याला पाच वर्षेप्यंत अस शकेल इतक्या मुदतीचा कोणताही कारावास आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.

टीप १: हे कलम सन १९७२ मध्यं क्रिमिनल लॉ अॅमेंडमेंट अॅक्ट १९७२ (क्रमाक ३१ सन १९७२) कलम २ अन्वये घातले आहे. यात पोटकलम (१) मध्ये अ-ब-क असे तीन स्वतंत्र अपराध घेतले आहित, तर तेच अपराध जर उपासनास्थानी केले तर पोटकलम (२) प्रमाणे जादा शिक्षा पाच वर्षेपय्यत दिली आहे.

टीप २ : या तिन्हीं अपरारधांचा संबंध विविध सात गटांशी येतो, ते म्हणजे १. धर्म, २. वंश, ३. जन्मस्थान, ४, निवास, ५. भाषा, ६. जात, ७., जनसमाज होय. भारताची सा्वभौमता व एकात्मता याबद्दल चर्चों आहे. किवा वंचित ठेवले जावे यासंबंधी चर्चा आहे.

टीप ३ : पोटकलम १ (अ) मध्ये भारतीय संविधानाशी श्रद्धा व निष्ठा.

टीप ४: पोटकलम १ (ब) मध्ये भारताचे नागरिक म्हणून हक्क नाकारले जावेत.

टीप ५ : पोटकलम १ (क) मध्ये काही बंधने असल्याचे मांडून त्यामुळे विविध गटांत आणि इतरांमध्ये तेढ, शत्रत्व, द्वेषभावना निर्माण होतात याची चर्चा केली आहे.

टीप ६ : महत्त्वाचे घटक पुढीलप्रमाणे आहेत : १. आरोपींनी तोंडी, लेखी, खाणाखुणा, देखाव्याद्वारे निवेदन केले अगर प्रकाशित केले. २. त्यामागे इरादा विविध गटाचा असल्याने ते भारताच्या राज्यघटनेची निष्্থা- श्रद्धा तसेच सार्वभौमत्व-एकात्मता ठेवणार नाहीत.३. विविध गटांचे आहेत म्हणून नागरीकरत्व देऊ नये, वंचित करावे असा इरादा. ४. आग्रहाने निवेदन करणे प्रसिद्ध करणे. ५. त्यामुळे तेढ- शत्रत्व पसरविणे. ६. हेच गुन्हे उपासनास्थानी अगर धार्मिक मेळाव्यात करणे.

टीप ७ : कार्यपत्धती : गुन्हा दखलपात्र -बिनजामिनाचा-प्रथमवर्ग न्यायाधीशापुढ़े बिगर समजूु्तीचा आहे; तसेच कोटला दखल घेण्यापूर्वी – आरोपपत्र स्वीकारण्यापूर्वों क्रि. प्रो. कोड कलम १९६ (A) (a) प्रमाणे केंद्र सरकार, राज्य सरकार अगर डि. में. यांची पूर्व मंजुरी [SANCTION] आवश्यक आहे. हे पोटकलम २३-९-१९८० पासून अमलात आले आहे. ते पोटकलम क्रिमिनल लॉ अॅमेंडमेंट अक्ट सन १९८० च्या क्रमांक ६३ च्या कलम ३ अन्वये अमलात आले आहे; तसेच क्रि. प्रो. कोड कलम १९६ (३ ) प्रमाणे पूर्वमंजूरी देण्यापुर्वी डि. मॅं. अशा अपराधांची कशी, तपास पोलीस इन्स्पेक्टर दर्जाचे अगर वरील पोलीस अधिकाच्यांमार्फत करतील. राष्ट्रीय एकात्मतेला बाधक असे निवेदन (क. १५३-ब) यावरील सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा : (१) महत्वाची केस (कलम १५३ अ आणि १५३ ब) हिंदूंना खिश्वन करण्याकरिता आरोपी प्रत्साहन देतो म्हणून त्याला अटक करण्यात आली, दंडाधिकाच्यापुढे त्याला हजर करण्यात आले. दंडाधिका्यांनी आरोपीला क्रि.प्रो. कोड क. १६७ अन्वये न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला, त्यासाठी क्रि.प्रो. कोड क, १९७ प्रमाणे आवश्यक असलेली केद्र शासनाची परवानगी घेतली नाही या कारणाने आरोपीने दंडाधिका्यांच्या आदेशाला आव्हान दिले, सर्वाच्च न्यायालयात झालेल्या अपीलात सर्वोच्च न्यायालयाने असे निरीक्षण केले की, पोलीस तपास दंडाधिकाच्याकडे पोलिसांनी अहवाल दाखल करणे, दंडाधिकान्यांनी न्यायालयीन कोठडी देणे ह्या सर्व बाबींचा अर्थ गुन्ह्माची दखल घेतली आहे, असा होत नाही. त्यामुळे या टप्यावर केंद्र शासनाची परवानगी घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. (पाहा : कर्नाटक राज्य वि. UrtT t. Ig RooG Cr.L.J. %o4 SC)

(२) कामगार आणि भांडवलदार यांच्यात द्वेषभाव निर्माण होईल असे वाटणारा लेख आरोपीने प्रसिद्ध केला. अलाहाबाद उच्च न्यायालयाने असे म्हटले की, आरोपीचे हे कृत्य के १५३- अ प्रमाणे शिक्षापात्र नाही. कारण या कलमाखाली धर्म, वंश, भाषा इत्यादी कारणांनी विगवेगळ्या भाषिक गर्टामध्ये। धर्मामध्ये तेढ निर्माण करणे किंवा वैरभाव वाढविणे इ. गोष्टी घडण्याची GIT. (918I: 9 Cr.L.J.9oAlI)

(३) मात्र मझूर सईद खान वि. महाराष्ट्र राज्य ही केस त्या दृष्टीने महत्त्वाची आहे. ‘शिवाजी इस्लामिक भरत खंडातील हिंदू राजा’ है प्रो. जेम्स लेन यांचे पुस्तक के. १५३ आणि क. १५३-अ या कलमाखाली कारवाईपात्र झाले. या पुस्तकातील काही लिखाण भारतातील काही गटांमध्ये आणि समाजामध्ये तेद वाढविणे, वैरभाव /द्रेषभाव निर्माण करते, असा आरोपीवर ठपका ठेवण्यात आला. सर्वाच्च न्यायालयाने या पुस्तकाचा सखोल अभ्यास करून असे म्हटले आहे की, पुस्तकाचा लेखक हा अमेरिकितील एका महाविद्यालयाचा धारमिक अभ्यास’ ह्या विभागाचा प्रमुख असून निष्णात प्राध्यापक आहे. त्याने हे पुस्तक अनेक भारतीय इतिहासकारांशी सल्लामसलत करून लिहिले आहे. ते ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने अमेरिकेत छापले व भारतामध्ये त्याचे पुनर्मुद्रण झाले. हे प्रकाशन एक अद्वितीय काम आहे व त्यात कोणाबद्दलही द्वेषभावना नाही. त्यामुळे हा दावा एका प्रसिद्ध लेखकाची व प्रकाशकाची प्रतिमा कलंकित करण्याचा प्रयत्न करणार आहे असे म्हणणे योग्य नाही म्हणून तो फेटाळण्यात 4 318. (YI8T : AIR R0 o 9 SC Ro 9)

#TAGS: ipc 153b in marathi, 153 कलम म्हणजे काय, 153 कलम, कलम 153 अ मराठी, कलम 153 ब, कलम 153 मराठी, 153 अ कलम, 153A IPC In Marathi, IPC 153b In Marathi.