149 Kalam In Marathi – 149 IPC In Marathi : नमस्कार मित्रांनो, 149 कलम म्हणजे काय? या बद्द्ल संपूर्ण माहिती सांगणार आहे म्हणून पोस्ट पूर्ण वाचा जेणेकरून तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती मिळेल आणि पोस्ट आवडल्यावर तुमच्या मित्रांना शेयर करायला विसरु नका धन्यवाद..

149 कलम म्हणजे काय 149 Kalam In Marathi
(149 कलम म्हणजे काय 149 Kalam In Marathi)

149 कलम म्हणजे काय? 149 Kalam In Marathi | 149 IPC In Marathi

१४९. समान उद्दिष्ट साधण्यासाठी केलेल्या अपराधाबद्दल बेकायदेशीर जमावाचा प्रत्येक सभासद दोषी असणे.

बेकायदेशीर जमावाच्या कोणत्याही सभासदाकडून त्या जमावाचे समान उद्दि्ट साधण्यासाठी एखादा अपराध केला जातो; तसेच तो अपराध घडणे संभवनीय आहे याची त्या जमावातील सभासदांना जाणीव होती आणि जर अपराध घडला, तरप्रत्येक सभासद त्या अपराधाबद्ल दोषी असतो.

टीप १ : कलम १४६ दंगा म्हणजे काय याची व्याख्या सांगत आहे. सर्व टीपा (कलम १४६ ते १४९) सभासद अगर एखादा सभासद बळाचा वापर करतो अगर हिंसाचार करतो, तर देंगा झाला असे म्हणतात. बळ्ळाचा वापर मनुष्याविरुद्ध होतो, तर हिंसाचार मिळकतीविरुद्ध
होतो. दंग्यात माणसांना जखमा होतात, मारले जाते, अगर स्थावर जंगम मिळकताचे नुकसान आग लावणें-पाडणे अपक्रिया वरगैरे होते. दंगा घडण्याकरिता मुळात बेकायदेशीर जमाव (कलम १४१) असणे आवश्यक आहे. पाहा : सुप्रीम कोर्ट केस A.I.R. RR48 S. C. Y49 = 34X CrL.J. Ę9.

टीप २ : दंगा घडताना जर आत्मसंरक्षणाचा अधिकार वापरला असेल, तर तो दंग्याचा अपराध होणार नाही. पाहा : सप्रीम कोर्ट A.I.R. १७६ S. C.

टीप ३ : ज्या वेळी दोन विरुद्ध गटांत दंगल घडते त्या वेळी त्या दोन गटाना एकत्र बेकायदेशीर जमाव म्हणणे योग्य नाही. त्यामुळे एकत्र केस खटला चालणे योग्य नाही. कारण कलम १४१ अन्वये समान उद्देश म्हणता येणार नाही. म्हणून प्रत्येक गटाची स्वतंत्र केस चालेल. पाहा : ‘चंद्रा भुय्या (१८९२) २० Cal. ५३७.

टीप ४: दंगा घडल्यास शिक्षा दोन प्रकारच्या आहेत. जर दंगा निःशस्त् असेल म्हणजे सभासदांकडे हत्यारे वगैरे नसतील तर शिक्षा कलम १४७ आणि जर सशस्र घातक शख्तेर जवळ असतील, तर कलम १४८ लागते. जर दंगा घडताना काही सभासद सशस्त्र असतील आणि काही निःशख्त्र असतील तर त्याप्रमाण कलम १४८ आणि १४७ लागतात. पाहा : केिस ‘बरेद्र १९७८ Cr.L.J. Noc. ९० (Gau. )

टीप ५ : कलम १४९ संयुक्त जबाबदारीचे त्त्व [IONT-LIABILITY] विशद करीत आहे. एकाच्या कृत्याकरिता इतर सर्व सभासद त्याचअपराधाकरिता सारखेच जबाबदार असतात. कलम-३४ चे तत्त्व येथे लागू पडते; पण थोड्या फरकाने. कारण कलम ३४ मध्ये सामाईक इरादा [INTENTION] तर येथे कलम १४९ मध्ये सामाईक उद्देश [OBJECT] असतो. कलम ३४ मध्ये आधीपासून सामाईक इरादा- तयारी असते. तर १४९ मध्ये सामाईक उद्देश अचानक तयार होतो.(स्पष्टीकरण कलम १४ १ च्या शेवटी दिलेले आहे.) दोन्नही कलमांत साम्य आहे [RESEMBLANCE); पण ती अगदी तंतोतंत सारखी नाहीत.

टीप ६ : समान उद्दिष्ठ याचा अर्थ घडलेल्या अपराधाशी त्याचा अत्यंत निकटचा संबंध पाहिजे. समान उद्दिष्ठ याचा अर्थ समान उद्देश साध्य करण्याकरिता असा घेणे आहे असे मतप्रदर्शन सुप्रीम कोर्टानि ‘मिझाजी’ या केसमध्ये १९५९ (१) ९४० केलेले आहे. सामाईक समान उद्िष्ट एक नसेल, तर अलग अलग शिक्षा वेगळ्या कलमाखाली होतात. पाहा : ‘सुरतलाल वि. मध्यप्रदेश सरकार’ A.R. १९८२ S.
C. R?% = 32R Cr.L.J. 499.

टीप ७ : जर समान उद्धि्ट शाबित झाले, तर प्रत्येक सभासदाने कार्य काय कृत्य केले याचा पुरावा आवश्यक नाही, तर कलम १४९ चा वापर करून सर्वाना एकत्र शिक्षा देता येते. पाहा : ‘तुकाराम’ A.IR. १९८२ S.C. ५९; तसेच ‘गुजरात राज्य वि. नगीनभाई’ १९८३०rL.J. १११२ S.C., तसेच ‘दलिपसिंग’ १९८६ CrLJ.

टीप ८: केवळ गुन्ह्याच्या जागी अारोपी हजर होते म्हणजे तो सभासद नसतो, तर प्रत्यक्षात सामाईक उद्देशात सहभागी होता है दाखवावे लागते. पाहा : ‘मुसाखान 2896 Cr.L.J. R3<9 S.C.

टीप ९: पूर्वतयारी नसताना अचानक दंगल झाली, सामाईक उद्देश शाबित झाला नाही, तर प्रत्येकाच्या कृतीबद्दल स्वतंत्र शिक्षा होते. पाहा : ‘उत्तर प्रदेश सरकार वि. जी. एन. गुप्ता १९७४ Cr.L.J. ६ S. C.

टीप १०: शिक्षा कलम १४७-१४८ असून, सयुक्त जबाबदारी धरण्याकरिता कलम १४९ पण लावले जाते. उदा.- दग्यात एखाद्या सभासदाने खून केला, तरी बाकी सभासद ३० २-१४९ सारखेच जबाबदार असतात. कार्यप्धती : कलम १४७- १४८ दखलपात्र, जामीनपात्र, प्रथमवर्ग न्यायाधीशापुढ्े चालणारा अपराध- बिगर समजुतीचा. कलम १४९ मूळ गुन्हा जसा असेल त्याप्रमाण दखलपात्र-अदखलपात्र वगेरे आहेत.
समान उद्देश (क. १४९) यावरील सर्वोच्च न्यायालयाचा निवाड़ा : (१) समान उद्देश ठरविण्यासाठी कोणतेही पक्के निकष नाहीत. त्यामुळे
परिस्थितिसापेक्ष निकष ठरविले पाहिजेत. ते जमावाचे स्वरूप, जवळ बाळगलेली हत्यारे, सदस्यांची अगोदरची व नंतरची वागणूक, त्याचप्रमाणे घटना घडल्यानंत्रचे दृश्य यावरून ठरविता येईल. (पाहा : चरणसिंग वि. 3at IEY TG ?O o Cr.L.J. E333 SC) सर्वोच्च न्यायालयाने हीच बाब पुन्हा भारग्गवराम वि. किरळ राज्य २००४ CrL.J. ६४६ SC या केसमध्ये अधोरेखित केली आहे. क. १४९ मधील ‘समान उद्देश’ याचा अर्थ हेत् साध्य करण्याकरिता असलेला समान उद्श असाच घेण्यात यावा.

(२) युनुस वि. मध्यप्रदेश राज्य (२० ० ३CrL.J. ८१७SC) या केसमध्ये सर्वॉच्च न्यायालयाने म्हटले आहे की, आरोपी हा घटनास्थळी हजर
होता व तो बेकायदेशीर जमावाचा सद्स्य होता हे सिद्ध झालेले आहे. त्यामुळे त्याला क. १४९ खाली शिक्षा देण्यात यावी, कारण जरी त्याने समान उद्देश साध्य होण्यासाठी कोणतीही कृती केलेली नसली तरी तो बेकायदेशीर जमावाचा सदस्य होता है लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

(३) आरोपी व इतरांनी खुन करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर जमावजमविला आणि ते तक्रारदाराच्या घरी गेले व घरात घुसून त्याच्यावर त्यांनी हल्ला केला. सहा दिवसांनंतर तो मृत्य पावला, ज्यावेळेस घरात त्याच्याकवर हल्ला होत होता त्यावेळी अपील करणारा बाहेर उभा होता व त्या हल्ल्यातहा भाग घेतला नाही. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत म्हटले आहे की, जरी अपील करणारा/रे बाहेर असले आणि हाणामारीत समील झाले नसले तरी त्यंना क. ३५२ (फौजदारी बलप्रयोग) व क, १४९ प्रमाणे शिक्षा होईल. मात्र क. ३२६ (घातक हत्यारांनी दुखापत कराणे) व १४९ प्रमाणे कारवाई होणार नाही. (पाहा : भीमराव वि. महाराष्ट् राज्य २०० ३CrL.J, २५६६ sC)

(४) तरुणांचा एक ग्रुप सहलीसाठी १९९४ मध्ये मनालीला गेला होता. तेथे त्यांनी ग्रुप फोटो काढले. ते फोटो अनिलकुमार ऊरफ बाबू याच्याकडे होते. तो त्याच्या मित्रांना ते फोटो देण्यास तयार नव्हता. त्यावरून त्याच्यात २ गट तयार झाले. अनिलकुमारची बाजू घेणारा एक गट आणि अन्य दसरा गट. एके दिवशी एका एसटीडी बूथजवळ् हे दोन्ही गट समोरासमोर आले आणि आपसांत मारामारी करू लागले. ही भानगड एकदाची मिटवूनच टाकू असा दोन्ही गटानी पवित्रा घेतला. अनिलकुमारने कृपाणाने हरबन्सवर हल्ला केला, तर राकेश कुमारला विशाल शर्मने कृपाणाने छातीत भोसकले. परिणामतः दोषेही ठार झाले. आरोपींवर क. ३०२ व क. १४९ प्रमाणे खटला चालला. अपीलात उच्च न्यायालायाने असे म्हटले की, आरोपी एसटीडी बुथजवळ् समान उद्देशाने जमलेले नव्हते. केवळ एकदम मारामारी झाल्यामुळे (पूर्वनियोजित व समान उद्देशाने नव्हे) ही घटना घडली. त्यामुळे शिक्षा क. ३०२/ १४९ प्रमाणे न देता, सर्वोच्च न्यायालयाने क. ३०२ (खुनास शिक्षा) व कलम ३४ प्रमाणे शिक्षा देण्यात यावी, हे पंजाब उच्च न्यायाचे मत ग्राह्म धरले. SC ?%?o) (पाहा : पंजाब सरकार वि. संजीवकुमार आणि अन्य AIR २००७ समान साध्य)

(५) कलम ३४ आणि कलम १४९ यामधील फरक (समान हेतू व वरील दोन्ही कलमांमधील फरक समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
सर्वच्व न्यायालयाने चितरमल वि. राजस्थान सरदार AIR २००३SC ७९६ केसमध्ये खालील निरीक्षणे नोंदविलेली आहेत. १. कलम ३४ चा वापर कमीतकमी २ व्यक्तीचे बाबतीत, १४९ चा वापर किमान ५ व्यक्तीसाठी असतो. २. दोन्ही कलमांत संयुक्त प्रत्यक्ष जबाबदारीचे (Joint Constructive तर क. Liability) त्व असले तरी क. ३४ मरधील तरतुदी ह्या क. १४९ पेक्षा अधिक व्याप्त आहेत. ३. क. ३४ कोणताही विशिष्ट हेत् स्पष्ट करीत नाही. कोणताही हेतू असू् शकतो. कलम १४९ मरधील उद्देश क. १४१ मध्ये नमूद केल्याप्रमाणे समान उ्देश असतो. हा बेकायदेशीर जमाव’ असतो. ४. क, ३४ फौजदारी कृत्यावर भर देत नाही. तर क. १४९ मध्ये बेकायदेशीर जमावाच्या प्रत्येक सदस्याला माहिती असते की, घडणारे कृत्य समान फोजदारी उद्दिष्ट साध्य करण्यासाठीच आहे. ५. क. ३४ हो पुराव्याबाबतचा एक नियम म्हटला पाहिजे. त्यात वेगळा गुन्हा असत नाही. क. १४९ मध्ये विशिष्ट गुन्हा असतो. (पाहा : राजेश गोविंद जागेशा वि. महाराष्र शासन (१९९९) ८ SCC ४२८) आणि (ओमप्रकाश वि. उत्तरप्रदेश AIR १९५६sC २४१)

६. क. ३४ चा उपयोग करताना शारीरिक आणि मानसिक या दोन्हींचाविचार केला जातो व ते दोन्हीही गुन्ह्याचे घटक असतात, तर क. १४९ फक्त मानसिकतेवरच भर देते असे नाही प्रत्यक्ष कृतीमध्ये/ कृत्यामध्ये सदस्याने भघेतलाच पाहिजे.

७. क. १४९ खाली दिलेली शिक्षा क. ३४ मधील शिक्षेस बदलू शकते. मात्र याउलट घडत नाही. (पाहा : छित्तरमल वि. राजस्थान राज्य AIR २००३ SC ७९६ आणि २००६ SCI ३२४ रबिन्द्र मेहतो वि. झारखंड राज्य)

(६) बेकायदेशीर जमाव याचा अर्थ व निर्धारण नियम : कलम १४१ नुसार बेकायदेशीर जमाव म्हणजे ५ किंवा अधिक व्यक्तींचा जमाव. त्यांच्यामध्ये आगळीक वकिंवा फौजदारीपात्र अतिक्रमण किंवा अन्य अपराध करण्याचा समान उदेश असावा. कलम १४२ चे आधारतत्त्व असे आहे की, ज्या कारणांमुळे कोणताही जमाव बेकायदेशीर ठरतो त्या कारणांची जाणीव असतानाजो कोणी त्या जमावात थांबून राहतो किंवा सामील होतो तो बेकायदेशीर जमावाचा सदस्य असतो. यापैकी प्रमुख घटक म्हणजे त्या जमावातील लोकांनी कलम १४९ च्या एका किंवा दुसच्या भागामध्ये विनिर्दिष्ट केलेला अपराध करण्यासाठी तयार केलेला समान उद्देश होय. (पातहा : अकबर शेख वि. पश्चिम बंगाल राज्य २० ०९ ७ SCC ४९५) (७) सतबीरसिंग वि. उत्तर प्रदेश राज्य (२००९) १ ३ SCC ও९० या केसमध्ये आरोपी १ ते ७ यानी मयत १ व २ यांच्यावर हल्ला केल्याचा अरोप असून, त्यामुळे त्या व्यक्तींचा मृत्यू झाला होता व त्यात एक साक्षीदारही जखमी झाला होता. आरोपी ५ ते ७ यांच्या संबंधात कोणतीही उघड कृती केल्याचा आरोप नव्हता व म्हणून समान उद्देश सिद्ध इझाला नाही म्हणून क. १४९ चा आधार घेता येणार नाही. वेगकवेगळी शख्त्े असलेले सर्व आरोपी घटना घडली त्याठिकाणी गेले आणि एका व्यक्तीला ठार मारण्याचा हेतू जाहीर करून ते निघून गेले. म्हणून समान उद्देश सिद्ध होतो.

#tags: 149 कलम म्हणजे काय, 149 Kalam In Marathi, 149 IPC In Marathi.